VIDEO : ना पैसे ना गाडी, मागितलं भलतंच काही; नवरदेवाच्या अजब मागणीमुळे नवरीनं मोडलं लग्न

VIDEO : ना पैसे ना गाडी, मागितलं भलतंच काही; नवरदेवाच्या अजब मागणीमुळे नवरीनं मोडलं लग्न

नवरदेवाच्या (Groom) मागण्या ऐकून नवरीनं (Bride Refuse to Marry) लग्नाला नकार दिला आहे. ही घटना औरंगाबादमधील आहे.

  • Share this:

औरंगाबाद 23 जुलै : अशा अनेक घटना समोर येत असतात, ज्यात मुलगा-मुलगी आणि घरच्यांची पसंती होऊन लग्न (Marriage) जमतं. अगदी सगळं ठरलेलं असतं. मात्र, अचानक काहीतरी विचित्र घडतं आणि ऐनवेळी हे लग्न रद्द होतं. बऱ्याचदा यात हुंडा (Dowry) हे महत्त्वाचं कारण असतं. असंच काहीसं एक प्रकरण आता औरंगाबादमधून (Aurangabad) समोर आलं आहे. यात नवरदेवाच्या (Groom) मागण्या ऐकून नवरीनं (Bride Refuse to Marry) लग्नाला नकार दिला आहे.

बोरिंग सेक्स लाईफला कंटाळून महिलेनं पतीला सोडलं; दुसऱ्यासोबत केलं लग्न मात्र...

लग्नात हुंडा मागणे बेकायदेशीर असले तरी आजही अनेक ठिकाणी सर्रास हुंडा किंवा किंमती वस्तू मागितल्या जातात आणि वधुपिता ते देतोही. नाशिकच्या एका मुलाचे औरंगाबादेतील एका मुलीसोबत लग्न ठरलं. या दोघांचा साखरपुडाही झाला. या घटनेतील नवरदेवाचं नाव आहे अशोक चराटे. सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं, मात्र लग्न जवळ येताच मुलानं अजब मागणी केली.

कोर्टाच्या आदेशानंतर पत्नीच्या इच्छेनुसार घेतले गंभीर रुग्णाचे स्पर्म; पण...

या नवरदेवानं मुलीच्या वडिलांकडे 10 लाख रोकड, 21 नखी जिवंत कासव आणि काळा लाब्रा डोर जातीच्या कुत्रा, अशी मागणी केली. या अजब मागणीमुळे मुलीचे वडील चक्रावले. मात्र, नवरी मुलीला या अजब मागणीची माहिती मिळताच तिने क्षणाचाही विलंब न करता या लग्नास नकार दिला. हे लग्न मोडण्यासोबतच तिनं नवरदेवाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली.

Published by: Kiran Pharate
First published: July 23, 2021, 2:09 PM IST

ताज्या बातम्या