...आणि अजितदादा गार्ड ऑफ ऑनर न घेताच निघून गेले, VIDEO

...आणि अजितदादा गार्ड ऑफ ऑनर न घेताच निघून गेले, VIDEO

बैठकीला पोहोचले असता अजित पवार जसे गाडीतून उतरले आणि पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी सज्ज झाले.

  • Share this:

औरंगाबाद, 09 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा मुलगा आणि बहिणीवर इन्कम टॅक्स विभागाने (Income Tax Department) कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अजित पवार चिंतातूर झाले आहे. आज औरंगाबादच्या (aurangabad) दौऱ्यावर आले असताना पत्रकारांना टाळत अजितदादांनी पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर (God of Honor) घेण्याचे टाळले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहे. यावेळी औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर अजित पवार मराठवाडा विभागीय बैठकीला पोहोचले. बैठकीला पोहोचले असता अजित पवार जसे गाडीतून उतरले आणि पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी सज्ज झाले.

पण, अजितदादा जसे गाडीतून उतरले तसे थेट बैठकीकडे जाण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी आणि सचिवाने गार्ड ऑफ ऑनर घ्यायचा राहिला, अशी आठवण करून दिली, पण नाही म्हटलं ना, असं म्हणत अजितदादा थेट बैठकीला रवाना झाले. अजितदादांचं हे रुप पाहून गॉड ऑफ ऑनर देण्यासाठी सज्ज झालेले पोलीसही गोंधळात पडले. अजितदादा निघून गेल्यामुळे पोलिसांनीही आपल्या पथकाला थांबण्याची सूचना केली.

Vodafone Recruitment: Vodafone मध्ये या पदांसाठी इंजिनीअर फ्रेशर्सना मोठी संधी

दरम्यान, आजच्या या बैठकीत मराठवाड्यात पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती अजित पवार जाणून घेणार आहे. ही बैठक रात्री 10 वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलतील अशी शक्यता आहे.

Published by: sachin Salve
First published: October 9, 2021, 7:57 PM IST
Tags:

ताज्या बातम्या