Home /News /aurangabad /

पाण्यासाठी दोन जावांमधील वाद गेला विकोपाला; एकीचा विहिरीत आढळला मृतदेह, औरंगाबादेतील घटना

पाण्यासाठी दोन जावांमधील वाद गेला विकोपाला; एकीचा विहिरीत आढळला मृतदेह, औरंगाबादेतील घटना

Crime in Aurangbad: फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. याठिकाणी शेतीला पाणी देण्याच्या कारणातून दोन जावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे.

    खामगाव, 07 फेब्रुवारी: फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. याठिकाणी शेतीला पाणी देण्याच्या कारणातून दोन जावांमध्ये कडाक्याचं भांडण (hassle between two sister in law) झालं आहे. हा वाद विकोपाला गेल्यानं एका महिलेनं विहिरीत उडी (woman jump into well) घेऊन थेट आपला जीव दिला आहे. जावांमधील कडाक्याच्या वादानंतर एकीचा विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून वडोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दुर्गाबाई बखळे असं मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष) येथील रहिवासी आहेत. घटनेच्या दिवशी (5 फेब्रुवारी) दुर्गाबाई यांचा आपल्या जाऊबाईसोबत शेतीला पाणी देण्यावरून वाद झाला होता. हा वाद शेतातील विहिरीजवळ सुरू होता. दरम्यान दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात दुर्गाबाई यांनी जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी एका तरुणाने विहिरीत उडी घेतली. पण तो दुर्गाबाईंचे प्राण वाचवू शकला नाही. हेही वाचा- जिवाच्या आकांताने ओरडत होता तरुण तरीही टोळकं करत राहिले वार, औरंगाबादेतील थरकाप उडवणारी घटना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. दुसरीकडे, मृत दुर्गाबाई यांच्या माहेरच्या मंडळींनी वडोद पोलीस ठाण्यात आरोपी महिला आणि तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाईकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. हेही वाचा-रुग्ण बनून आले अन् गळ्याला लावला चाकू;भल्या पहाटे डॉक्टरसोबत घडला विचित्र प्रकार शेवटी शवविच्छेदन झाल्यानंतर वडोद पोलिसांनी मृत दुर्गाबाई बखळे यांच्या भावाच्या फिर्यादीवरून विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वडोद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास वडोद पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news

    पुढील बातम्या