मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

जामिनावर बाहेर येताच कुख्यात गुन्हेगाराला भररस्त्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटना

जामिनावर बाहेर येताच कुख्यात गुन्हेगाराला भररस्त्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटना

 वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने लुटमार केली. त्न्यात त्याची जामिनावर सुटका केली

वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने लुटमार केली. त्न्यात त्याची जामिनावर सुटका केली

वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने लुटमार केली. त्न्यात त्याची जामिनावर सुटका केली

    सचिन जिरे, प्रतिनिधी औरंगाबाद, 28 एप्रिल : ऐतिहासिक नगरी असलेल्या औरंगाबाद (aurangabad ) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. जामिनावर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाला भर रस्त्यावर लोखंडी रॉड आणि दांड्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कुख्यात गुन्हेगार  प्रविण साबळे उर्फ पऱ्या हा जामिनावर सुटून बाहेर आला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर चार ते पाच जणांनी भर रस्त्यावर त्याच्यावर हल्ला केला. दुचाकीचे शॉकअप रॉड, दांड्याने त्याला बेदम मारहाण केली. यात डॉ.आंबेडकर चौकात तो कितीतरी वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. बुधवारी दुपारी आंबेडकर चौकात ही घटना घडली. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (LIC IPO साठी पॉलिसी धारकांना विशेष डिस्काउंट! मिळवण्यासाठी आहेत ‘या’ 5 अटी) कुख्यात गुंड पऱ्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने लुटमार केली. त्न्यात त्याची जामिनावर सुटका केली. बुधवारी तो पुन्हा आंबेडकरनगरमध्ये जाताच जुन्या वादातून चार ते पाच जणांनी त्याला बेदम मारहाण सुरू केली. यात तो रक्तबंबाळ झाला. ('सोनू तू खूप बदललीस..'तारक मेहता फेम निधीच्या ग्लॅमरस फोटोंवर युजर्सच्या कमेंट्) त्यानंतर हल्लेखोरांनी त्याला तसेच सोडून पळ काढला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर विव्हळत होता. लोकांनी एकच गर्दी झाली होती. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती कळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पऱ्या बेशुद्ध असून घाटीत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या