Home /News /aurangabad /

लेकीचं लग्न आनंदात पार पडलं, पण वडिलांचा मृतदेह तलावात आढळल्यानं औरंगाबाद हादरलं

लेकीचं लग्न आनंदात पार पडलं, पण वडिलांचा मृतदेह तलावात आढळल्यानं औरंगाबाद हादरलं

मंगलकार्य घरी पार पडलेलं असताना घडलेल्या या प्रकारामुळं दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा प्रकार औरंगाबादच्या वाळूज महानगरात घडला आहे. साजापूरच्या (Sajapur Aurangabad) तलावात मुलीच्या पित्याचा मृतदेह आढळला.

    औरंगाबाद, 23 फेब्रुवारी : मुलीचं लग्न आनंदात पार पडलं, दोन्ही कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना अचानक मुलीच्या वडिलांचा मृतदेह सापडल्यानं (Fathers body found) खळबळ उडाली असून घडलेल्या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. मंगलकार्य घरी पार पडलेलं असताना घडलेल्या या प्रकारामुळं दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हा प्रकार औरंगाबादच्या वाळूज महानगरात घडला आहे. साजापूरच्या (Sajapur Aurangabad) तलावात मुलीच्या पित्याचा मृतदेह आढळला. समीर चांदशाह असे मृत व्यक्तीचं नाव आहे. मृत समीर हे पत्नी शाहिनबी आणि मुलगा साहिल आणि मुलगी सानिया यांच्यासह साजापुरात वास्तव्यास होते. समीर हे मुळात चांदवड जिल्हा नाशिकचे असून साजापुरात कामानिमित्त आले आणि स्थायिक झाले. ते वाहनचालक असून विविध कामं करून आपल्या कुटुंबाचा उदर्निवाह करतात. त्यांनी आपल्या मुलीचे सानियाचे लग्न समीर शेख या तरुणाशी 18 फेब्रुवारी रोजी लावून दिलं. नंतर मुलीच्या सासरी रिसेप्शन कार्यक्रम असल्यामुळं समीर चांद शाह कुटुंब मुलीच्या सासरी ढोरकीनला या गावी रविवारी गेले होते. नंतर सगळे परत आले. लग्नातील धावपळीचा थकवा असल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईक झोपी गेले. हे वाचा - औरंगाबादेत शिवसेना आमदाराकडून भावजयीस बेदम मारहाण, धक्कादायक कारण आलं समोर सकाळी पाहिले असता समीर चांद शाह हे घरात नव्हते. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर फोन लावला पण त्यांचा फोन लागत नव्हता. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला. तरीही ते सापडले नाहीत. मंगळवारी साजापूरच्या तलावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचे काही लोकांनी वाळूज पोलिसांना सांगितलं. अग्निशमन दलाच्या मदतीनं मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतदेहाजवळील कागदपत्रावरून ते समीर शाह असल्याचे समजले. हे वाचा - औरंगाबाद : मुलाने आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं; त्यानंतर जे घडलं समीरच्या कुटुंबियांना हे समजतातच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे सासर आणि माहेरच्या गावात शोककळा पसरली आहे. समीर यांच्याबाबत नेमकं काय झालं या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. वाळुंज पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंदवले असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Aurangabad News

    पुढील बातम्या