Home /News /aurangabad /

औरंगाबादेत मध्यरात्री हत्येचा थरार; 9 जणांच्या टोळीकडून तरुणाचा खेळ खल्लास

औरंगाबादेत मध्यरात्री हत्येचा थरार; 9 जणांच्या टोळीकडून तरुणाचा खेळ खल्लास

Murder in Aurangabad: शनिवारी मध्यरात्री हत्येची एक थरारक घटना औरंगाबादेतील मिसरवडी येथे घडली आहे. येथील नऊ जणांच्या टोळीनं एका 25 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे.

    औरंगाबाद, 16 जानेवारी: शनिवारी मध्यरात्री हत्येची एक थरारक घटना औरंगाबादेतील (Aurangabad) मिसरवडी येथे घडली आहे. येथील नऊ जणांच्या टोळीनं एका 25 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या (Brutal murder) केली आहे. हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृताच्या भावानं सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नऊ जणांविरोधात हत्येचा गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. या  घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हसन साजिद पटेल असं हत्या झालेल्या 25 वर्षीय युवकाचं नाव आहे. तो औरंगाबादेतील मिसरवडी येथील रहिवासी असून प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. दरम्यान, काल रात्री नऊच्या सुमारास तो घराबाहेर पडला होता. तो एका पान टपरीजवळ उभा होता. यावेळी याठिकाणी आलेल्या नऊ जणांच्या टोळीनं हसनला बेदम मारहाण केली. तर एकाने हसनवर चाकुने सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होती की, हसनचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे. हत्येची ही घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हेही वाचा-दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत 3 वृद्धांचा खून करून केलं आगीच्या हवाली तालेब सुलतान चाऊस, सुलतान चाऊस, नासेर सुलतान चाऊस, अली सुलतान चाऊस, नासीर अब्दुल पटेल, रहीम अन्सारी, मुसा शेख, रियाज उर्फ डॉन, आणि आखेफ उर्फ गोल्डन युनूस कुरेशी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहे. संबंधित आरोपींनी जुन्या वादाच्या कारणातून ही हत्या केल्याची संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मृत हसनवर आरोपी तालेब चाऊस याने चाकुने वार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हेही वाचा-70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना या प्रकरणी पोलिसांनी मृत हसनच्या भावाच्या फिर्यादीवरून संबंधित नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पान टपरीसमोर उभं असताना, भररस्त्यात ही हत्येची घटना घडल्याने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Murder

    पुढील बातम्या