Home /News /aurangabad /

औरंगाबाद: 'तुला माझ्यासारखे हजार मिळतील पण...' Instagram वर स्टोरी ठेवून तरुणाने केला भयावह शेवट

औरंगाबाद: 'तुला माझ्यासारखे हजार मिळतील पण...' Instagram वर स्टोरी ठेवून तरुणाने केला भयावह शेवट

Suicide in Aurangabad: औरंगाबाद येथील हर्सूल तलावात उडी घेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आत्महत्या (17 years old minor boy commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद, 04 जानेवारी: औरंगाबाद (Aurangabad) येथील हर्सूल तलावात उडी (Jump into harsul lake) घेत एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आत्महत्या (17 years old minor boy commits suicide) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना फोन करून आपल्याला धोका मिळाला असल्याचं मित्रांना सांगितलं होतं. त्यानंतर संबंधित तरुणानं इन्स्टाग्रामवर स्टोरी (Put instagram story and suicide) ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अग्निशमन दलाने गेली पाच दिवस हर्सूल तलावात शोधमोहीम राबवल्यानंतर, संबंधित मुलाचा मृतदेह आढळला आहे. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कुणाल काकासाहेब देहाडे असं आत्महत्या केलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचं  नाव असून तो राम नगर परिसरातील मुकुंदवाडी येथील रहिवासी आहे. मृत कुणाल याने बारावीपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. तर त्याचे वडील कंत्राटदार असल्याने गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या वडिलांना कामात मदत करत होता. त्याला दोन मोठे भाऊ देखील आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास कुणाल घराबाहेर पडला होता. यावेळी त्यानं आपल्या वडिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दुचाकीवरून सोडलं. त्यानंतर तो तिथून दुचाकी घेऊन निघाला. हेही वाचा-VIDEO: खुल्लम खुला प्यार करेंगे, औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर कपलचा KISSING सीन यानंतर त्याने मित्र मैत्रिणींना कॉन्फरन्स कॉल करून संवाद साधला. मला धोका मिळाला असून मी मुकुंदवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी जात असल्याची माहिती कुणालने आपल्या मित्रांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या कुणालच्या मित्रांनी तात्काळ त्याच घर गाठून कुणालबाबत चौकशी केली. पण कुणाला घरी नव्हता. त्यामुळे त्यांनी मुकुंदवाडी रेल्वे रुळाकडे धाव घेतली. पण तिथेही कुणाल नव्हता. यानंतर कुणालने पुन्हा फोन केला आणि मी मुकुंदवाडी येथे नसून हर्सूल तलावावर आलो आहे, अशी माहिती दिली. हेही वाचा-Kolhapur: 'आमचं प्रेम कुणाला कळलंच नाही', सुसाईड नोट लिहून कपलने संपवलं जीवन तसेच 'मी आता तलावात उडी घेत असून हा माझा शेवटचा कॉल असेल,' असं सांगितलं. यानंतर मित्र परिवाराने तात्काळ हर्सूल तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी कुणालची दुचाकी आढळून आली. तर त्याची चप्पल पाण्यात तरंगताना आढळली. कुणालने उडी घेतल्याचं कळताच मित्रांनी हर्सूल तलावावरील सुरक्षारक्षक राजेश गवळे यांना घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांसह अग्निशामक दलाला पाचारण केलं. हर्सूल तलावात पाच दिवस शोधकार्य केल्यानंतर अखेर कुणालचा मृतदेह आढळून आला आहे. हेही वाचा-मरणानंतर एकत्र झालेच; कपलने Whatsapp स्टेटस ठेवून लव्ह स्टोरीचा केला The End आत्महत्या करण्यापूर्वी कुणालने 'आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, पर उन हजारों मे हम नही' अशी इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली होती. कुणालने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हर्सूल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Aurangabad, Crime news, Suicide

पुढील बातम्या