कन्या 22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर

Share: Facebook Twitter Linkedin
कन्या रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी आहे बुध. या राशीचे लोक सर्वसाधारणपणे खूप मेहनती आणि हुशार असतात. गरजवंतांना मदत करण्यासाठी ते मागेपुढे पाहात नाहीत. संवादावर विश्वास असणारे आणि कुठल्याही परिस्थितीत संयमी राहून दुसऱ्यांना मदत करणारे हे कन्या राशीचं वैशिष्ट्य आहे.

कन्या राशीचं चिन्ह: : या राशीचं चिन्ह हातात फुलाची दांडी घेतलेली मुलगी आहे. कन्या राशीचिन्हाचं हे प्रतीक मानवतेचंही प्रतीक मानलं जातं. म्हणूनच परोपकारी व्यक्ती, गरज असेल तेव्हा मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्ती कन्या राशीच्या असतात.

कन्या राशीची शारीरिक ठेवण: : कन्येच्या लोकांचे हात बाकदार आणि रुंद असतात. अंगठा थोडासा बुटका असतो. या राशीच्या लोकांना बऱ्याचदा पाठ, मान, खांदा आणि गालावर तीळ असू शकतात.

कन्येचं व्यक्तिमत्त्व: : कन्या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व गूढ असतं. ते त्यांच्या सोयीने गोष्टी वळवण्यात वाकबगार असतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे आणि सोयीप्रमाणे काम करणं ते पसंत करतात. यामुळे बऱ्याचदा ते आळशी असल्याचा गैरसमज पसरू शकतो.

कन्या राशीच्या व्यक्तींचे छंद: : या राशीच्या व्यक्तींचा निसर्गाशी खूप जवळचा संबंध असतो. त्यामुळे या राशीतल्या अनेकांना बागकाम आवडतं. याशिवाय वाचन, लिखाण, सुलेखन, पाककला आणि अनेक गोष्टींचे त्यांना छंद असतात.

कन्या राशीचे स्वभावदोष: : कन्या राशीचे लोक थोडे स्वार्थी वाटू शकतात. दुसऱ्यांची टिंगल करायला त्यांना आवडतं आणि त्यात त्यांना मजा येते. उत्साह आणि घाईगडबडीसाठीही कन्येचे लोक ओळखले जातात. यामुळे बऱ्याचदा ते त्यांचं काम पूर्ण करण्यात अपयशी ठरतात.

कन्या राशीच्या व्यक्तींचं शिक्षण आणि व्यवसाय: : कन्या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष रुची असते. यामुळे ते अकॅडेमिक्समध्ये चांगलं यश मिळवतात. व्यापार-उद्योगाचा विचार केला, तर कन्येचे लोक चांगले प्रशासक होऊ शकत नाहीत. त्यामुळे व्यापारातसुद्धा चांगला जम बसणं अवघड असतं.

कन्या राशीचं प्रेमजीवन: : कन्या राशीचे लोक आपल्या जोडीदाराला प्रसन्न ठेवण्यासाठी काहीही करू शकतात. ते कुठलाही त्याग करायला तयार असतात. स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आनंदाचा विचार ते आधी करतात.

कन्या राशीचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन: : कन्या राशीचा विवाह मकर आणि वृश्चिक राशीच्या व्यक्तींशी झाला तर जास्त आनंददायी ठरतो. कन्या राशीचं वैवाहित जीवन तर शांततामय होतं. ते इतरांपेक्षा त्यांच्या कुटुंबाला प्राधान्य देणारे असतात. पण तरीही स्वतःच्याच घरात त्यांना पुरेसा मान मिळत नाही.

कन्या राशीच्या व्यक्तींचे मित्र: : कन्या राशीचं वृश्चिक, तूळ आणि मकर राशीचं जमू शकतं. इतर राशींशी जुळणाऱ्या मैत्रीचा विचार केला तर सहजी मतभेद संभवतात.

कन्या राशीचा भाग्यांक : 9

कन्या राशीचा लकी रंग: : हिरवा, नारिंगी, पिवळा आणि पांढरा

कन्या राशीचा भाग्यदिन: : बुधवार

कन्या राशीला लाभणारं रत्न: : मोती आणि पाचू

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा