वृश्चिक 24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर

Share: Facebook Twitter Linkedin
वृश्चिक रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व :

वृश्चिक राशीचा स्वामी आहे लालबुंद मंगळ. याच्यामुळेच या राशीच्या व्यक्तींमध्ये धीरगंभीर, निर्भय, निग्रही, तर कधीकधी आडमुठा आणि भावनिक स्वभाव येतो. सर्वसाधारणपणे वृश्चिक व्यक्तींकडे दुर्लक्ष करणं त्यांचं म्हणणं गंभीरपणे न घेणं इतरांना परवडत नाही. स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणाऱ्या आणि स्वतःच्या नशिबावर आणि भाग्यावर नियंत्रण असणाऱ्या म्हणून या व्यक्ती ओळखल्या जातात.

वृश्चिक राशीचिन्ह : : विषारी जनावर विंचू - हे या राशीचं चिन्ह. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो. अत्यंत परोपकारी विचारातून ते संवाद साधतात आणि दयाळू असतात.

वृश्चिक व्यक्तींची शारीरिक ठेवण : : वृश्चिक व्यक्तींचे तळहात सपाट असतात आणि अरुंद पण लांबसडक असतात. बोटं जाड असतात आणि अंगठा छोटा. हे हट्टी आणि चिकाटीचं प्रतीक आहे.

वृश्चिक व्यक्तिमत्त्व : : वृश्चिक राशीचे लोक संवेदनशील असतात. मोठं यश मिळवतात. या व्यक्ती फार पारंपरिक किंवा चाकोरीबद्ध नसतात. त्या महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांना आव्हानं पेलायला आवडतं.

वृश्चिक व्यक्तींचे छंद : : वृश्चिक राशीच्या व्यक्तींना महागड्या गाड्यांचं वेड असतं. तसंच दागिन्यांचीही आवड असते. वृश्चिक व्यक्तींना वाचनाची आणि त्यातही रोमँटिक कादंबऱ्या आणि क्राइम थ्रिलर्स वाचायला आवडतात.

वृश्चिक राशीचे स्वभावदोष : : वृश्चिक राशीच्या लोकांचा सर्वांत मोठा दोष म्हणजे ते आतलं धैर्य उघडपणे दाखवण्यास घाबरतात. वरवर शांत दिसत असले तरी या लोकांच्या मनात बदला घेण्याची खुमखुमी असते आणि जेव्हा वेळ येते तेव्हा ते थेट शत्रूवर तुटून पडण्यास कचरत नाहीत.

वृश्चिक राशीचे शिक्षण व्यवसाय: : वृश्चिक राशीच्या लोकांना वैद्यकीय, ज्योतिष, विज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य आणि राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता मोठी असते. व्यवसायांचा विचार केला तर वैद्यकीय उपकरणं, इलेक्ट्रिकल्स वगैरे खरेदी विक्रीच्या व्यवसायात यांना चांगला जम बसवता येतो.

वृश्चिक लोकांचं प्रेमजीवन : : राशीचक्रातली ही आठवी रास प्रेमासाठी आतुर असते. आपण करतो तसं प्रेम जसंच्या तसं आपल्याला मिळावं अशी त्यांची अपेक्षा असते. एकाच वेळी ते खूप रोमँटिक असतात आणि भावनिकही होतात.

वृश्चिक राशीचं कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्य : : वृश्चिक राशीच्या लोकांना आपल्या जोडीदाराकडून सर्वोत्तम समाधानाची अपेक्षा असते. त्यांच्या अपेक्षेएवढं प्रेम जोडीदाराने नाही दिलं तर नातं तोडायचाही विचार वृश्चिकेचे लोक करू शकतात. याच स्वभावामुळे आपले आप्त आणि नातेवाईक यांच्याबरोबरसुद्धा त्यांचा जिव्हाळा टिकू शकत नाही.

वृश्चिक राशीचे मित्र: : कर्क, सिंह, मेष, मकर आणि मीन या राशींशी वृश्चिक राशीचं चांगलं जमू शकतं. पण मिथुन आणि कन्या राशीच्या मैत्रीपासून सावध राहावं.

वृश्चिक राशीचा भाग्यांक : 9

वृश्चिक राशीचा लकी रंग: : लाल आण बेज कलर

वृश्चिक राशीचा भाग्यदिन: : मंगळवार

वृश्चिक राशीला लाभणारं रत्न: : पोवळे

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा