धनू 23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर

Share: Facebook Twitter Linkedin
धनु रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

गुरू ग्रह हा धनू राशीचा स्वामी आहे. या राशीच्या व्यक्ती प्रभावी, तेजस्वी आणि येणाऱ्या दिवसांबद्दल बऱ्याच आशावादी असतात. धनु राशीच्या लोकांचा धार्मिक कल अधिक असतो आणि ते खूप बुद्धिमान असतात. या राशीचा फॅशन सेन्स सर्वसाधारणपणे चांगला असतो. धनु राशीचे लोक प्रामाणिक आणि एकनिष्ठ असतात.

धनु राशीचं चिन्ह: : धनु राशीचं चिन्ह आहे अश्व-मानव. शरीराचा मागचा भाग घोड्याचा आणि पुढचा भाग धनुर्धारी पुरुष असं हे थोडं वेगळं राशीचिन्ह. धनुधारी पुरुषाचा भाग हे या राशीच्या व्यक्तींचा अध्यात्माकडे असलेला ओढा व्यक्त करणारे प्रतीक आहे.

धनु राशीच्या व्यक्तींची ठेवण: : धनु राशीचे लोक सामान्यतः मजबूत बांध्याचे असतात. त्यांचे केस चांगले असतात. डोळे तेजस्वी असतात. यामुळे ते आकर्षक दिसतात. या व्यक्तींचा आवाज खर्जातला असतो. त्यामुळे गर्दीत ते लक्ष वेधून घेतात..

धनु राशीचे व्यक्तिमत्त्व: : धनु राशीच्या व्यक्ती चटकन कुणावर किंवा कशावर विश्वास ठेवत नाहीत. प्रत्येक गोष्टीचं उपजत कुतूहल त्यांच्या मनात असतं, त्यामुळे ज्ञानार्जनासाठी ते कायम उत्सुक असतात. फार अवलंबून राहायला किंवा कुणामध्ये अडकून घ्यायला धनु राशीच्या व्यक्तींना आवडत नाही. स्वातंत्र्य त्यांना मनापासून आवडतं.

धनु राशीच्या व्यक्तींचे छंद: : धनु राशीच्या लोकांना जन्मजात पुस्तकांचा छंद असतो. पुस्तक आणि कादंबऱ्या वाचणे हाच त्यांचा आवडता उद्योग. एक दिवस टीव्हीवर झळकावं असं त्यांचं स्वप्न असतं आणि पर्यटनाशी संबंधित गोष्टीही त्यांना आवडतात.

धनु राशीचे स्वभावदोष: : धनु राशीच्या व्यक्तींना चटकन राग येतो. या राशीच्या लोकांना कौटुंबिक बंध फारसे जपता येत नाहीत. धनु राशीचे लोक उधळपट्टी करणारेही किंवा भरपूर पैसा खर्च करणारे असू शकतात.

धनु राशीचे शिक्षण आणि व्यवसाय: : धनु राशीच्या व्यक्तींना मेडिकल सायन्स, खगोलशास्त्र, विज्ञान, व्यवस्थापन या क्षेत्रांची आवड असते. धनु राशीचे लोक चांगले ह्युमन रिसोर्स मॅनेजर, स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणारे, शिक्षक आणि राजकारणीही होऊ शकतात.

धनु राशीचं प्रेमजीवन: : धनु राशीचे लोक उत्साही, प्रेमळ आणि मौजमजा आवडणारे असतात. या राशीच्या व्यक्तींमध्ये रोमँटिक आणि नाट्यमय गुण असतात. धनु राशीच्या काहींना लग्न म्हणजे छंद वाटू शकतो आणि ते त्यांचं नशीब आजमावून पाहण्यासाठी लग्न करतात.

धनु राशीचं कौटुंबिक आणि वैवाहित जीवन: : धनु राशीच्या व्यक्तींचं वैवाहित जीवन समृद्ध आणि सुखी असतं. ते प्रेमाचा स्वीकार करतात आणि सहजपणे त्याची परतफेडही करतात. काही धनु व्यक्तींचं लहानपण खूप कष्टात किंवा सोसण्यात गेलेलं असेल पण मोठे झाल्यावर या व्यक्तींना त्यांची जागा सापडते आणि ते सुखी होतात.

धनु राशीच्या व्यक्तींचे मित्र: : धनु राशीच्या व्यक्तींची मेष, सिंह आणि वृश्चिक राशीची मैत्री जमते. पण तूळ, मिथुन आणि सिंह राशींशी यांचा छत्तीसचा आकडा असतो.

धनु राशीचा भाग्यांक: : 3

धनु राशीचा लकी रंग: : पिवळा, फिकट आकाशी, फिकट हिरवा, गुलाही आणि जांभळा

धनु राशीचा भाग्यदिन: : गुरुवार

धनु राशीला लाभणारं रत्न: : पुखराज

आज आपले शारीरिक आरोग्य चांगले राहिल्याने मन सुद्धा प्रसन्न राहील. काल्पनिक जगात वावरताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य व कला क्षेत्रात आपण एखादी नवनिर्मिती करून दाखवाल. विद्यार्थ

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:36

गुलिक काळ:14:17 to 15:58