मीन 20 फेब्रुवारी - 20 मार्च

Share: Facebook Twitter Linkedin
मीन रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

मीन राशीचा स्वामी आहे गुरू ग्रह. या राशीच्या लोकांची मानसिकता अध्यात्मिकतेकडू झुकणारी असते. निःस्वार्थी स्वभाव आणि आत्मिक समाधानाच्या दिशेने मोक्षाकडे त्यांचा प्रवास सुरू असतो. स्वतःच्या आदर्शवत जगात राहण्याची त्यांची इच्छा असते.

मीन राशीचं चिन्ह: : मीन राशीचं चिन्ह आहे मासा. माशासारखेच या राशीचे लोक शांत, संयमी आणि सहृदय, परोपकारी असतात. दुसऱ्यांविषयी त्यांना कणव वाटते आणि त्यांच्या आविर्भावातून ते दिसतं. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे मीनेचे लोक लोकप्रिय असतात.

मीन राशीच्या लोकांची ठेवण: : मीन राशीच्या लोकांची सरासरी उंची असते. या राशीचे लोकही बर्‍याचदा किंचित लठ्ठ असतात. तसेच, त्यांचे डोळे खूप सुंदर आहेत.

मीन राशीचं व्यक्तिमत्त्व: : मीन राशीचं व्यक्तिमत्त्व थोडं गूढ असतं. अध्यात्मिकतेकडे झुकलेलं व्यक्तिमत्त्व असतं. या राशीचे लोक यशस्वी विद्वान म्हणून नावारूपालासुद्धा येऊ शकतात.

मीन राशीचे छंद: : मीन राशीच्या लोकांचे सौंदर्यविचार उदात्त असतात. एखाद्या परिस्थितीचा अंदाज बांधण्यात ते प्रवीण असतात आणि बदलंना सहज आणि चटकन सामोरे जातात..

मीन राशीचे स्वभावदोष: : मीन राशीच्या व्यक्ती काहीशा आळशी वाटू शकतात. याशिवाय त्या थोड्या भित्र्या असतात. दुसऱ्यावर चटकन विश्वास ठेवणे आणि वास्तवाकडे काणाडोळा करणं हे त्यांचे स्वभावदोष आहेत.

मीन राशीच्या व्यक्तींचं शिक्षण व्यवसाय: : मीन राशीच्या व्यक्ती कला, संगीत, साहित्यविषयक अभ्यासात असतील तर ते मोठी उंची गाठतात. याउलट मीन राशीच्या लोकांना व्यवसायात रस नसतो. लपलेली जागा, गुपितं शोधण्यात त्यांना जास्त रस असतो.

मीन राशीच्या व्यक्तींचं प्रेमजीवन: : मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात प्रेमाला मोठं स्थान असतं. प्रेमाशिवाय त्यांना आयुष्य निरर्थक वाटतं. बऱ्याचदा मीनेच्या व्यक्ती परिपक्व, विचारी माणसाच्या प्रेमात पडतात.

मीन राशीच्या व्यक्तींचं कौटुंबिक, वैवाहित आयुष्य: : मीन राशीसाठी कन्या राशीचे जोडीदार परफेक्ट मॅच ठरतात. मीनेच्या लोकांचं वैवाहिक आयुष्य अविवाहित पूर्वायुष्याच्या तुलनेत अधिक सुख-समृद्धीने भरलेलं असतं.

मीन राशीच्या व्यक्तींचे मित्र: : मीन राशीच्या व्यक्तींची मेष, कर्क, सिंह, धनु राशीच्या लोकांशी चांगली मैत्री होते. दुसरीकडे वृषभ, मिथुन, कन्या आणि तुला राशीशी यांचे वैचारिक मतभेद असतात.

मीन राशीचा भाग्यांक: : 3/7

मीन राशीचा लकी रंग: : पिवळा

मीन राशीचा भाग्यदिन: : गुरुवार

मीन राशीला लाभणारं रत्न: : पुखराज

श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आजचा पूर्ण दिवस आपणास अनुकूल आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदित व प्रसन्न व्हाल. आर्थिक क्षेत्रात सुद्धा लाभ होईल. मित्र व सगेसोयरे यांच्या भेटीने

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:56 to 12:36

यमगंड:15:57 to 17:38

गुलिक काळ:07:35 to 09:15