सिंह 23 जुलै - 21 ऑगस्ट

Share: Facebook Twitter Linkedin
सिंह रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी आहे साक्षात सूर्य. त्यामुळे सहाजिकच या राशीच्या गुणधर्मांमध्ये तेजस्वी, ताकदवान, प्रतिष्ठा, आत्मविश्वास, स्वाभिमान, ऐट आणि धैर्य हे येतातच.

सिंह राशीचं चिन्ह: : या राशीचं चिन्ह आहे ऐटबाज वनराज सिंह. चिन्हाप्रमाणेच राशीचे लोक खूप कणखर आणि धीट असतात.

सिंह राशीच्या व्यक्तींची शारीरिक ठेवण: : या राशीच्या व्यक्तींचा मेंदू मॉडिफाइड असतो. दिसायला डोकं जरासं मोठं. सिंह राशीच्या व्यक्तींचा चेहरा, डोळे रेखीव असतात. डोळ्यात चमक असते आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक असतं. त्यांचा आवाज खर्जातला किंवा धीरगंभीर असतो आणि त्यामुळे त्यांना ऐकणं सुखकर असतं.

सिंह राशीचं व्यक्तिमत्त्व: : सिंह राशीच्या लोकांना एकूणच जीवनाकडून खूप अपेक्षा असतात. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा प्रेमात अपयश येतं. या राशीचे लोक आशावादी असतात आणि महत्त्वाकांक्षीसुद्धा. ते त्यांचं काम खूप नेटाने करतात आणि कधी कुणाचा दुःस्वास, तिरस्कार करत नाहीत.

सिंह राशीच्या व्यक्तींचे छंद: : झोपणे, सिनेमा पाहणे, काही वस्तू जमवणे, छान छान कपडे घालणे आणि खाबूगिरी या सिंह राशीच्या व्यक्तींचे सर्वांत आवडते छंद असतात. आणि ते या गोष्टी खूप गांभीर्याने करतात बरं का!.

सिंह राशीचे स्वभावदोष: : असं म्हणतात की सिंह राशीचे लोक स्वतःच्या अतिविचारी स्वभावामुळेच कधीकधी संकट ओढवून घेतात. कारण वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते बराच वेळ पुढचा-मागचा विचार करण्यातच घालवतात. तसंच ते खूप चटकन चिडतात किंवा वैतागतात.

सिंह राशीच्या व्यक्तींचं शिक्षण आणि व्यवसाय: : सिंग राशीच्या लोकांना वैद्यकीय क्षेत्रांत - पेडिअॅट्रिक्स आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांच्या क्षेत्रात रस असतो. तसंच सिंहेच्या लोकांना साहित्य, पत्रकारिता, राजकारण, विज्ञान, ज्योतिषशास्त्र या विषयातही यश मिळू शकतं. याशिवाय धातू आणि खड्यांशी संबंधित व्यवसायांमध्ये त्यांना यश मिळू शकतं.

सिंह राशीच्या लोकांचं प्रेमजीवन: : सिंह राशीसाठी प्रेम हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. खूप अवघड परिस्थितीचा सामना केल्यानंतरच त्यांना प्रेमाचा अनुभव येतो. त्यांचा चांगलं जेवण, चांगला ड्रेसिंग सेन्स आणि सभ्य वर्तणूक असणाऱ्यांवरच जीव जडतो.

सिंह राशीच्या व्यक्तींचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन: : सिंह राशीच्या लोकांचं लग्न जमण्यात अडचणी येण्याची शक्यता असते. पण एकदा लग्नगाठ बांधली गेली की नशीब उजळतं. सिंह राशीच्या व्यक्ती आईच्या खूप जवळ असतात.

सिंह राशीच्या व्यक्तींची मैत्री: : सिंह राशीच्या व्यक्ती मेष, कर्क, मिथुन, वृश्चिक, धनु, कन्या आणि मीन राशीच्या लोकांशी छान मैत्री करू शकतात. पण तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांचा त्यांना धोका वाटतो.

सिंह राशीचा भाग्यांक : 1 आणि 4

सिंह राशीचा लकी रंग: : सोनेरी, लाल आणि क्रीम कलर

सिंह राशीचा भाग्यदिन: : रविवार

सिंह राशीला लाभणारं रत्न: : माणिक

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील खाणे - पिणे टाळा. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांची मदत होईल. म

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10