मिथुन 22 मे - 21 जून

Share: Facebook Twitter Linkedin
मिथुन रास- वैशिष्ट्ये, वर्तणूक आणि व्यक्तिमत्व

मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ग्रह. हे लोक स्वभावतःच चतुर, हजरजबाबी असतात. सर्व गोष्टींबद्दल त्यांना कुतूहल असतं. आपण नेटके आणि बुद्धिमान दिसावं याकडे त्यांचा कल असतो आणि त्यासाठी ते ओळखले जातात. कुठल्याही सार्वजनिक , सामाजिक कार्यक्रमात मिथुनेच्या व्यक्ती उठून दिसतात.

मिथुन राशीचं चिन्ह: : मिथुन राशीचे चिन्ह ‘जुळे’ चेहरे. चिन्हाप्रमाणेच या राशीचा स्वभाव मैत्रिपूर्ण असतो. व्यक्तिमत्त्व आकर्षक असतं. तसंच या राशीचे लोक बुद्धिमान असतात त्यांच्यात वाक् चातुर्य असतं.

मिथुन राशीचं व्यक्तित्व: मिथुन राशीचे लोक सामान्यत: : सरासरीपेक्षा उंच असतात. या व्यतिरिक्त, या राशीच्या लोकांची नजर तीक्ष्ण असते. केसांची घनता कमी असते, पातळ, लांब नाक, लांब हात आणि हनुवटी ही वैशिष्ट्यं आहेत. या राशीचे लोक निर्भय आणि सरळ भाषेत बोलण्यासाठी ओळखले जातात.

मिथुन स्वभाव: : मिथुन राशीचे लोक मुळात फारसे धीट नसतात. ते चंचल असतात. पण त्यांचं व्यक्तिमत्त्व लोभस असतं. या राशीच्या लोकांची राजकारणात चांगलीच पकड असते. मिथुनेचे लोक धार्मिक स्वभावाचे असतात आणि त्यांना दानधर्म, देणग्यांमध्ये अधिक रस असतो आणि ते जे काही करतात त्याकडेही अधिक लक्ष केंद्रित करतात.

मिथुन मूळ लोकांचे छंद: : मिथुन राशीच्या लोकांना प्रवास करायला आवडतो. भरतकाम, पुस्तके वाचणे, चित्रपट पहाणे आणि इतर बऱ्याच गोष्टी आवडतात. लोकांचं लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी खूप प्रयत्न करतात. तथापि, एकदा ते मिळवलं की मग दुर्लक्ष करतात.

मिथुन राशीचे स्वभादोष: : मिथुन राशीचे लोक थोडे फारसे धीट नसतात. शिवाय ते फारसा साधक आणि बाधक विचार न करताच बर्‍याच गोष्टींमध्ये गुंततात. एकदा गोंधळ झाला, की मग ते काम पूर्ण न करताच मध्येच सोडून देतात.

मिथुन व्यक्तींचं शिक्षण आणि व्यवसाय: : मिथुन राशीला अनेक विविध विषयांची थोडीथोडी माहिती असते. त्यांचं ज्ञानभांडार खूप व्यापक असतं. जर नोकरी करणाऱ्या मिथुनेच्या तुलनेत विचार केला तर व्यवसायात पडलेल्या मिथुनेच्या व्यक्तींना तितकंसं यश मिळत नाही. म्हणूनच, शक्यतो नोकरी करा आणि आरामदायी आयुष्य जगा, असा सल्ला दिला जातो.

मिथुन व्यक्तींचं प्रेमजीवन : : मिथुन राशीचे लोक कला, संगीत आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांशी संबंधितांकडे त्वरित आकर्षित होतात. ते स्वभावतः थोडे निष्काळजी असतात, त्यामुळे बऱ्याचदा प्रेमात अपयशी ठरतात.

मिथुन व्यक्तींचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन: : मिथुन व्यक्ती एका वेळी एकापेक्षा अधिक लोकांच्या प्रेमात अडकण्याची चूक करतात. म्हणूनच त्यांचं प्रेम यशस्वी होऊ शकत नाही. होय, ते आपल्या नातेवाईकांना आणि कुटुंबातील सदस्यांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे येतात; परंतु त्याची योग्य किंमत त्यांना मिळत नाही.

मिथुनचे मित्र: : मिथुन राशीच्या लोकांची वृषभ, कन्या, सिंह आणि तुला या राशीच्या लोकांशी चांगली मैत्री जमते. पण त्यांना कर्क राशीच्या लोकांपासून सावध राहायचा सल्ला दिला जातो.

मिथुन राशीचा भाग्यांक : : 5

मिथुन राशीचा लकी रंग: : पिवळा आणि केशर

मिथुन राशीचा भाग्यदिन: : बुधवार

मिथुन राशीचं लाभणारं रत्न: : पाचू

आज आपले शारीरिक आरोग्य चांगले राहिल्याने मन सुद्धा प्रसन्न राहील. काल्पनिक जगात वावरताना नवनवीन गोष्टींचा अनुभव घ्याल. साहित्य व कला क्षेत्रात आपण एखादी नवनिर्मिती करून दाखवाल. विद्यार्थ

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वज्र

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:36

गुलिक काळ:14:17 to 15:58