मकर 23 डिसेंबर - 20 जानेवारी

Share: Facebook Twitter Linkedin
मकर रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

मकर राशीचा स्वामी आहे शनि. शनिच्या अधिपत्याखाली असल्याने या राशीचे लोक खूप शिस्तप्रिय असतात. एकदा एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण झाल्याशिवाय ते अजिबात थांबत नाहीत.

मकर राशीचिन्ह: : मकर राशीचं चिन्ह आहे मकर किंवा शिंगवाला बोकड. हिंदू पुराणांमध्ये मकर हा समुद्री प्राणी असल्याचाही उल्लेख आहे. या प्राण्याचा पुढचा भाग बकऱ्यासारखा आणि उरलेला एखादा मासा, मगरीसारख्या जलचरासारखा असतो ,मकर राशीच्या लोकांची ठेवण: मकर राशीचे लोक सडपातळ आणि कमी वजनाचे असतात. उंची सर्वसाधारण असते.

मकर राशीच्या लोकांची ठेवण: : मकर राशीचे लोक सडपातळ आणि कमी वजनाचे असतात. उंची सर्वसाधारण असते.

मकर राशीचे व्यक्तिमत्त्व: : मकर राशीच्या व्यक्ती आत्मकेंद्री असण्याची शक्यता असते. या राशीच्या व्यक्ती खूप हट्टी असतात. याशिवाय मकरेच्या व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी, गंभीर आणि कामाच्या बाबतीत खूपच झोकून देऊन काम करणाऱ्या असतात.

मकर व्यक्तींचे छंद: : मकर राशीच्या व्यक्तींची स्मरणशक्ती खूप चांगली असते. अर्थविषयक काही गोष्ट निघाली की त्यांचे डोळे आणि कान टवकारले जातात आणि ते खूप काळजीपूर्वक पावलं उचलतात. मकरेच्या व्यक्तींना त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य यांची जाण असते. त्यातूनच ते त्यांचं काम अत्यंत चिकाटीने आणि मन लावून करतात.

मकर व्यक्तींचे स्वभावदोष: : मकरेच्या व्यक्ती खूप लवकर वैतागतात. त्यांच्या वागण्यात थोडाफार उर्मटपणाही दिसतो. घाईघाईने काम करणं हासुद्धा त्यांच्या स्वभावाचा दोष मानला जातो.

मकर व्यक्तींचे शिक्षण आणि व्यवसाय: : मकर राशीच्या व्यक्तींचा शैक्षणिक क्षेत्राकडे ओढा असतो. या व्यक्ती अभ्यासात पुढे असतात. व्यवसायाचा विचार केला तर मकरेच्या व्यक्तींना विमा उद्योग, मशिनरी, काँट्रॅक्टिंग, इलेक्ट्रिसिटी, बेटिंग या क्षेत्रात यश मिळू शकतं.

मकर राशीचं प्रेमजीवन: : मकर राशीचे बहुतेक लेक प्रेमात भाग्यवान ठरतात. या राशीच्या व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला सर्वस्व अर्पण करणाऱ्या असतात. पण काही मकर व्यक्ती एकट्या राहतात.

मकर राशीचं वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन: : मकर व्यक्तींचं कौटुंबिक आयुष्य बरंच खाचखळग्यांचं असं अवघड असतं. त्यांना अनेक आव्हानं पेलावी लागतात. पण त्यांच्या वैवाहित आयुष्याचा विचार केला तर ते सुखी असतात, आनंदी असतात.

मकर राशीच्या व्यक्तींचे मित्र: : मकर राशीच्या व्यक्तींची तूळ, मिथुन, कन्या, वृषभ आणि कुंभ राशीच्या व्यक्तींशी मैत्री होते. कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीशी मात्र यांचं वैर असतं.

मकर राशीचा भाग्यांक: : 8

मकर राशीचा लकी रंग: : काळा

मकर राशीचा भाग्यदिन: : शनिवार

मकर राशीला लाभणारं रत्न: : नीलम

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील खाणे - पिणे टाळा. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांची मदत होईल. म

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10