कर्क 22 जून - 22 जुलै

Share: Facebook Twitter Linkedin
कर्क रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

कर्क राशीवर चंद्राचं राज्य असतं. या राशीचे लोक त्यांच्या कुटुंबाशी आप्तांशी मनापासून जोडलेले असतात. ते स्वभावतःच अत्यंत संवेदनशील आणि भावनिक असतात. तथापि, राग किंवा चटकन मूड बदलण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे या व्यक्ती उद्धट वाटू शकतात आणि यातूनच त्यांच्या वर्तणुकीत दोष आढळायला लागतात.

कर्क राशीचं चिन्ह: : या राशीचं प्रतीक आहे खेकडा. म्हणूनच या राशीच्या व्यक्ती खूप संवेदनशीलता, थोड्या घाबरट आणि नाजूक आणि दयाळू-परोपकारी या भावनांनी भारलेल्या असतात. चंद्राला मनावर अधिराज्य करणारा म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच कर्क राशीच्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या मनातले विचार, भावना समजू शकतात, त्या व्यक्तीने जाहीरपणे न दाखवताही कर्केच्या लोकांना त्याचा अंदाज येतो.

कर्क राशीच्या व्यक्तींची ठेवण: : कर्क राशीच्या व्यक्ती सर्वसाधारण उंचीच्या असतात. कर्केच्या व्यक्तींची बोटं जाड असतात आणि तळहात अगदी मऊ. कर्केच्या अनेक व्यक्तींमध्ये डोक्यावर तीळ किंवा जखमेसारख्या खुणा आढळतात.

कर्क राशीचे व्यक्तिमत्त्व: : कर्क राशीच्या व्यक्तींचा निर्धार मोठा असतो. पण त्याच वेळी या व्यक्ती कमकुवत देखील असतात. आधी सांगितल्याप्रमाणे, या व्यक्ती निसर्गातः बर्‍याच भावनिक असतात आणि त्यात त्यांना इतर लोकांच्या जीवनात काय चाललंय याकडे लक्ष द्यायची सवय असते. त्यांनी एखादं काम हाती घेतलं की ते तडीस नेतात.

कर्केच्या व्यक्तींचे छंद: : काही कर्कराशीचे लोक दानधर्म, देणग्या देणं, समाजकल्याण संस्थांशी काम करण्यात आणि परोपकारात धन्यता मानतात. काही जण अशा कामांना प्राधान्य देतात ज्यामुळे त्यांना आत्मिक आनंद आणि समाधान मिळेल.

कर्क राशीचे स्वभावदोष: : कर्क राशीच्या व्यक्तीच्या जवळचा मित्र त्याच्या किंवा तिच्या विरोधात गेला तर त्याच्याकडे दुर्लक्ष करायलादेखील ही रास मागेपुढे पाहात नाही. त्यांच्या स्वत:च्या काही विचित्र इच्छा असतात, अगदी लहान मुलांसारख्या. जेव्हा त्या पूर्ण होताना दिसत नाहीत, तेव्हा त्यांची चिडचिड होते.

कर्क राशीच्या व्यक्तींचं शिक्षण व्यवसाय: : कर्केच्या लोकांना तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, अभिनय, नर्सिंग, कायदा, अभियांत्रिकी, ज्योतिष, गणित, शिक्षण यासारख्या क्षेत्रात विशेष रस आणि गती असते. त्यांचा मानसिक श्रम करण्यावर विश्वास आहे, म्हणून कोणत्याही क्षेत्रातल्या व्यवसायात किंवा नोकरीत चांगलं यश मिळवू शकतात.

कर्कराशीचं प्रेमजीवन: : जेव्हा प्रेम आणि नातेसंबंधांचा विचार केला जातो तेव्हा कर्कराशीचे लोक एकदम गंभीर होतात. प्रेमात कुठलीही कमतरता त्यांना खपत नाही. पण हेच अतिप्रेम कधीकधी त्यांच्या पतनाला कारण ठरू शकतं. म्हणूनच अशा प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला कर्केच्या व्यक्तींना दिला जातो.

कर्केच्या व्यक्तींचं कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन: : कर्क राशीच्या व्यक्ती सहसा कोणत्याही बाबतीत जोडीदाराचा हस्तक्षेप सहन करत नाहीत. ते मूळातच नात्यात प्रामाणिक आणि विश्वासू असतात. पण हाच स्वभाव त्यांच्या कमाई करण्याच्या आणि श्रीमंत होण्याच्या मार्गात आड येऊ शकतो. कर्केचे पुरुष घरात काहीसे बायकोचं सगळं ऐकणारे असतात. त्यामुळेच कदाचित अशा व्यक्तींच्या घरात सहसा भांडणं आणि मतभेद होत नाहीत.

कर्क राशीच्या व्यक्तींचे मित्र: : कर्क राशीच्या व्यक्तींची तूळ, मीन, वृश्चिक आणि कन्या राशीच्या व्यक्तींशी मैत्री होऊ शकते. पण दुसऱ्या कर्केच्याच व्यक्तीशी मात्र त्यांची जिव्हाळ्याची मैत्री होऊ शकत नाही.

कर्क राशीचा भाग्यांक : 2 आणि 7

कर्क राशीचा लकी रंग: : पांढरा, फिकट निळा आणि क्रीम कलर

कर्क राशीचा भाग्यदिन : सोमवार

कर्क राशीला लाभणारं रत्न: : मोती

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील खाणे - पिणे टाळा. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांची मदत होईल. म

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10