कुंभ 21 जानेवारी - 19 फेब्रुवारी

Share: Facebook Twitter Linkedin
कुंभ रास - वैशिष्ट्यं, वर्तणूक आणि व्यक्तिमत्त्व

कुंभ राशीचा स्वामी आहे शनि. या ग्रहाच्या अधिपत्यामुळे कुंभ राशीचे लोक आयुष्य शिस्तीत जगतात, पण त्यात स्वातंत्र्यही असतं. त्यांच्या वागण्या बोलण्यात मार्दव असतं. कुंभ राशीचे लोक सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ ठरू शकतात. ते महान शोधही लावू शकतात.

कुंभ राशीचिन्ह: : कुंभ राशीचं चिन्ह आहे हातात पाण्याचा मोठा माठ घेतलेली व्यक्ती. समाजासाठी, लोकांसाठी काही मोठं काम करण्यासाठी कुंभ व्यक्ती उत्सुक असतात. पण त्याच वेळी ते इतरांपासून स्वतःला अलूफ ठेवायचा प्रयत्न करतात. कुठलीही सामाजिक किंवा भावनिक गुंतवणूक त्यांना नको असते.

कुंभ राशीच्या व्यक्तींची ठेवण: : कुंभ राशीच्या व्यक्ती लांबसडक आणि उभट ठेवणीच्या असतात. चेहरा सर्वसाधापणपणे मोठा असतो आणि मान, पाठ, पोट, कंबर, मांड्या आणि पाय लांब असतात.

कुंभ राशीचं व्यक्तिमत्त्व: : कुंभ राशीच्या बहुतेक व्यक्ती अंतर्मुख असतात. लोकांशी गप्पा मारायला ते लाजतात. पण त्यांची आंतरिक ताकद आणि इच्छाशक्ती दांडगी असते.

कुंभ राशीच्या व्यक्तींचे छंद: : कुंभ राशीच्या व्यक्तींना साधारणपणे प्रवासाची आवड असते. फोटोग्राफी, कथावाचन, वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे दगड, खडे गोळा करणं हे त्यांचे छंद असतात. शिवाय सुट्टी आनंदात घालवणं आवडतं आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचंसुद्धा वेड असतं.

कुंभ राशीचे स्वभावदोष: : कुंभ राशीच्या व्यक्ती कुठल्याही एका व्यक्तीला सर्वस्व देऊ शकत नाहीत. ते खूप लवकर कंटाळतात आणि सतत नवा जोडीदार, नवं काही शोधत राहतात.

कुंभ राशीचं शिक्षण-व्यवसाय: : कुंभ राशीच्या व्यक्ती बुद्धिमान असतात. त्यामुळे विज्ञान, संशोधन क्षेत्रात त्यांना गती असते. शिवाय ज्योतिषशास्त्र, गूढ विज्ञान, पारंपरिक औषधी, तत्त्वज्ञान, मेडिसीन, कॉम्प्युटर इत्यादी क्षेत्रातही त्यांना यश आणि समृद्धी मिळू शकते.

कुंभ राशीचे प्रेमजीवन: : प्रेमाचा विषय येतो तेव्हा कुंभेच्या व्यक्ती कल्पनेत रमतात. त्यातच अधिक उत्तेजित होतात. प्रेम द्यायला त्यांच्या हृदयाचं दरवाजे कायम उघडे असतात आणि कुंभेच्या व्यक्तीना त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच उस्फूर्त प्रेमाची अपेक्षा असते.

कुंभ राशीच्या व्यक्तींचं कौटुंबिक आणि वैवाहित जीवन: : कुंभ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराने नियम आणि शिस्तीत राहावं असं वाटत असतं. ते स्वतः सरळमार्गी असतात. ते एक उत्तम जीवनसाथी होऊ शकतात.

कुंभ राशीच्या व्यक्तींचे मित्र: : वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींशी कुंभेच्या व्यक्तींचे मैत्रीपूर्ण संबंध असतात. त्याच वेळी मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशींच्या व्यक्तींपासून मात्र त्यांना धोका असतो.

कुंभ मूळसाठी लकी क्रमांक : 8

कुंभ राशीचा लकी रंग: : जांभळा, काळा आणि गडद निळा

कुंभ राशीचा भाग्यदिन: : शनिवार

कुंभ राशीला लाभणारं रत्न: : नीलम

आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारण राहील. खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाहेरील खाणे - पिणे टाळा. कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांची मदत होईल. म

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10