Home /News /astrology /

वार्षिक राशीभविष्य 2022: या राशीला साडेसाती असली तर हे वर्ष देणार शुभ फळ

वार्षिक राशीभविष्य 2022: या राशीला साडेसाती असली तर हे वर्ष देणार शुभ फळ

कुंभ राशीची साडेसाती सुरू झाली आहे. पण या वर्षात (New Year 2022 horoscope) कुंभेच्या व्यक्तींची भरभराट होणार आहे. चांगलं फळ देणारं हे वर्ष आहे.

नवं वर्ष सुरू झाल्यापासून (New Year 2022) आपण दररोज एका राशीचं वार्षिक राशीभविष्य (Horoscope 2022) पाहात आहोत. दैनंदिन राशीभविष्याप्रमाणे हे वार्षिक राशीभविष्य तुमच्या ग्रहस्थितीवरून दिलं जातं. प्रत्येक राशीत वर्षभराच्या काळात काही ना काही ग्रहबदल होत असतात. ते तुमच्या राशीला फलदायी की  राशीसाठी हानीकारक हे सांगणारं आणि कुठला काळ सुखाचा जाईल याची कल्पना देणारं हे वार्षिक भविष्य. आता राशीचक्रातली अकरावी रास कुंभविषयी जाणून घेऊ. कुंभेच्या व्यक्तींचा स्वभाव अधिक प्रभावी  होईल राशी चक्रातील अकराव्या राशीचा स्वामी शनि असून वायू तत्त्व आहे. 2022 ची सुरवात ही राशीतील गुरूच्या आशीर्वादाने झाली आहे. आधीच कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या समतोल, अभ्यासू आणि कणखर असतात. राशीतील गुरू मुळे स्वभाव  भारदस्त, गंभीर अणि बुद्धिमान होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. एप्रिलनंतर भरभराट एप्रिल नंतर गुरू मीन राशीत जाईल. हा काळ आर्थिक भरभराटीचा आहे. पूर्वजांची संपत्ती, घर आणि दागदागिने परंपरेने चालत येतील. आर्थिक स्थिती मध्ये उत्तम सुधारणा होईल. कुटुंबात वाढ होईल. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. हा काळ अतिशय शुभ राहील. मार्च नंतर होणारे राहू भ्रमण तुमच्या तृतीय स्थानात होईल. साडेसातीतही शुभ वर्ष पराक्रम आणि चिकाटी वाढेल. परस्पर संवाद ,बहिण भावंडाशी सौहार्द वाढीस लागेल. तुमचे बुद्धी चातुर्य कमालीचे वाढेल. प्रवास घडतील. एप्रिल नंतर शनि आपल्या लाडक्या कुंभ राशीत प्रवेश करेल. वायू तत्त्व शनिला अनुकूल असते.प्रगल्भ, बुद्धिवादी आचरण राहील. संतती संबंधी काही शुभ घटना घडतील. पुढची अडीच वर्ष राशीत राहणारा शनि सर्व तर्‍हेने शुभफल देणारा ठरेल. एकूण हे वर्ष साडेसाती असली तरीही शुभ असून शनि उपासना करावी.
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या