मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

सूर्य-बुधाच्या कृपेने या दोन राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य; ऑगस्ट महिना आहे त्यांच्यासाठी खास

सूर्य-बुधाच्या कृपेने या दोन राशीच्या लोकांचे चमकेल भाग्य; ऑगस्ट महिना आहे त्यांच्यासाठी खास

ऑगस्ट महिन्यात अनेक राशींच्या आर्थिक समस्या दूर होण्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुला होईल. ऑगस्ट महिन्यात बुध आणि सूर्याचे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते, त्याविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 जुलै : ऑगस्ट (2022) महिना ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने खास आहे. या महिन्यात अनेक राशींच्या आर्थिक समस्या दूर होण्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुला होईल. ऑगस्ट महिन्यात बुध आणि सूर्याचे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया या दोन ग्रहांचा राशींवर काय परिणाम होईल-

सिंह राशीच्या लोकांना आता निराश होण्याची नाही गरज -

सिंह राशीच्या लोकांचे भाग्य आता बलवान होणार आहे. 17 ऑगस्टपासून तुमची एकामागून एका संकटातून मुक्ती होईल. सिंह राशीचा शासक ग्रह सूर्य देव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीच्या लोकांना सूर्य स्वतःच्या राशीत आल्याने मोठा फायदा होईल.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

सूर्याची राशी बदलणार -

17 ऑगस्ट रोजी सकाळी 07:14 वाजता सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचा राशी बदल खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळू शकते.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

कन्या राशीत बुधाचे संक्रमण-

कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात ऑगस्ट महिना आनंद आणू शकतो. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 01:55 वाजता बुधाचे संक्रमण होईल. या संक्रमणामध्ये बुध कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. बुध स्वतःच्या राशीत आल्याने या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची वाणी सतत गोड राहील.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark