मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /साधेपणाने वागलात तर दीर्घकाळ फायदा! कन्या राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

साधेपणाने वागलात तर दीर्घकाळ फायदा! कन्या राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

कन्या राशीचं वार्षिक राशीभविष्य

कन्या राशीचं वार्षिक राशीभविष्य

कल्पनेच्या राज्यातून वास्तवात काय चाललंय ते बघा. ऑफिसात किंवा घरात तुमच्या पाठीमागे काहीतरी घडेल आणि तुम्हाला त्याचा पत्ताही नसेल किंवा ते घडून गेल्यावर उशिराने तुम्हाला ते कळेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 01 जानेवारी : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून कन्या राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे.

    कन्या (Virgo) 

     

    जानेवारी :

    सर्वसाधारण : पुढच्या वर्षी काय करायचं याचे बेत तुम्ही तयार केले आहेत आणि दीर्घकाळापासून जे करायची तुम्हाला इच्छा होती ते आता करता येणार असल्याने तुम्ही खूप उत्सुक आहात. हे काम पूर्ण केल्यावर तुम्ही अधिकारपदावर पोहोचणार आहात. इतरांसाठीही वस्तुनिष्ठ बेत आखून ठेवल्यास त्यांनाही फायद्याचं ठरेल. भविष्याच्या पिशवीत तुमच्यासाठी अनेक गोष्टी आहेत आणि बहुधा गूड न्यूज असेल.

    रिलेशनशिप : तुम्ही सध्या नात्यात चांगल्या स्थितीत आहात. काही जणं नसत्या चौकशा करतील. पण एकदा तुम्ही वचनबद्द झाला असाल तर तुम्ही त्याला चिकटून राहिलं पाहिजे.

    करिअर : नव्या संधी सध्या बाजूला ठेवा. काही जण तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. साधेपणाने वागलात तर दीर्घकाळ फायदा होईल.

    लकी रंग : Magenta

    फेब्रुवारी :

    सर्वसाधारण : तुमचा जोडीदार प्रत्येकच बाबतीत तुमच्यावर वर्चस्व गाजवतोय आणि तुम्हाला बोलूच देत नाहीए असं तुम्हाला वाटू शकतं. कायदेशीर प्रकरणात तुम्हाला चांगला वकील मिळू शकेल आणि तुम्ही त्याच्यासोबतच काम करा. नवी प्रवेश किंवा काउन्सेलिंग घेण्याबाबत तुम्हाला वेळेत मदत मिळेल. खरेदी पुन्हा पुढे ढकलली जाईल.

    रिलेशनशिप : नात्यात नवं पण तात्पुरतं वळण येईल. आधीच तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीला माफ कराल. एकटे असाल तर तुमचा एकमेवाद्वितीय जोडीदार शोधा.

    करिअर : काम समजून घेण्यात तसंच नियोजनात बराच वेळ जाईल. प्रवासाला जाल त्यातून नव्या संधी मिळतील. सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींचा महिना कामात व्यस्त जाईल.

    लकी रंग : Sky Blue

    मार्च :

    सर्वसाधारण : तुम्हाला मदत हवी असेल तर ती मागा नाहीतर तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. तुमच्या कोशातून बाहेर पडून तुमची उद्दिष्टं निश्चित करा आणि मदत मिळवण्यासाठी ती व्यवस्थित समोरच्यापुढे मांडा. तुम्ही आयुष्यभर स्वावलंबी होण्याचा विचार करत राहिलात पण तुम्हाला प्रगतीसाठी मार्गदर्शनाची गरज आहे. काही उत्तम संधी आता तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, सज्ज रहा.

    रिलेशनशिप : रचनात्मक टीकेचे कायमच स्वागताय. पत्नीच्या आरोग्याची चिंता वाटेल. तुमच्या आधीच्या जोडीदाराशी भेट होण्याची दाट शक्यता आहे.

    करिअर : सध्या करिअर थोडं सावकाश सुरू आहे. सरकारी नोकर असाल तर तिथं अचानक काही बदल होतील. जर तुम्ही परदेशात असाल तर एक नवी आणि चांगली संधी तुमची वाट पाहतेय.

    लकी रंग : Canary Yellow

    एप्रिल :

    सर्वसाधारण : कल्पनेच्या राज्यातून वास्तवात काय चाललंय ते बघा. ऑफिसात किंवा घरात तुमच्या पाठीमागे काहीतरी घडेल आणि तुम्हाला त्याचा पत्ताही नसेल किंवा ते घडून गेल्यावर उशिराने तुम्हाला ते कळेल. तुम्ही अजूनही भावनिकदृष्ट्या खूप स्थिर आहात.

    रिलेशनशिप : जर एकटे असाल तर कुणीतरी नकळतपणे तुमच्यावर प्रेम करतंय. आताही तुम्हाला कुणी जोडीदार मिळेल असं तुम्हाला वाटत नाही. तुमचा खासगी रोमान्स संपून तुमचं चांगलं होणार आहे.

    करिअर : नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केला असेल तर तिथून फोन येतील. कामात लक्ष लागणार नाही. बदली होण्याची शक्यता असेल तर ती होईल.

    लकी रंग : Turquoise

    मे :

    सर्वसाधारण : साध्या गोष्टींतून तुमच्या कल्पनेपलीकडचा आनंद मिळेल. तुम्ही तुमचे पाया मजबूत करण्याचा प्रयत्न करताय. भविष्यासाठी तुम्ही भूतकाळातील गोष्टी आठवाल. तुमच्यासोबत दीर्घ काळ राहणाऱ्या नव्या मित्राची भेट होईल. एखादं पत्र, मेल तुम्ही शोधत होतात तो सापडेल.

    रिलेशनशिप : जोडीदाराबद्दल आधीसारखंच आकर्षण वाटेल. गोंधळाल पण तात्पुरतं. कुणीतरी हवहवंसं ऑनलाईन भेटेल.

    करिअर : तुम्ही मनाने खूपच उंच उडताय आता जमिनीवर यावं लागेल. हा काळ स्वत: ला शाबासकी देण्यासाठी वापरा. काही काळ कुठलीही बातमी न मिळणं ही पण चांगली बातमी असू शकते.

    लकी रंग : Lilac

    जून :

    सर्वसाधारण : तुम्ही जर घोळ घातला असेल तर तो स्वीकारून चूक मान्य करा आणि पुढे जा, तो लपवून एकदिवस त्या प्रकरणाचा स्फोट होण्याची वाट पाहू नका. तुम्हाला प्रवास आवडतो. येत्या महिन्यात तुमचे बेत वास्तवात आणण्याच्या काही संधी मिळतील.

    रिलेशनशिप : सध्या तुम्ही नात्याला न्याय देत नाहीए पण नकारात्मक विचार करण्यापेक्षा सुधारणा करा. तुमचा निष्काळजीपणा एखाद्या दिवशी तुमचा घात करेल.

    करिअर : आत्मविश्वास वाढेल आणि टिकेल. तुमच्या पदावर डोळा ठेऊन असलेली कंपनीतील व्यक्ती नोकरी सोडेल. तुमचं लवकरच कौतुक होईल.

    लकी रंग : Peacock Green

    जुलै :

    सर्वसाधारण : घरी किंवा ऑफिसात पाहुणे येण्याची शक्यता आहे. एक आठवडाभर तुम्ही अनेकदा पाहुण्यांचं आदरातिथ्य कराल. तुम्हाला मनाने पूर्वीपेक्षा अधिक सुसंघटित व्हायला हवं. अकाउंट्समध्ये थोडीशी चूकही नंतर भोवेल.

    रिलेशनशिप : सध्या ओढ लावणारा कालावधी आहे त्यामुळे संयमाने कुणाचीतरी वाट पहा. ब्रेकअपनंतर पुढे जाण्याचा निर्णय तुम्ही घ्याल.

    करिअर : अचानक आलेला फोन कॉल एखादी व्यवसायाची संधी घेऊन येईल. तुमच्या कंपनीकडून असलेल्या अपेक्षा कमी करा. अनपेक्षित व्यक्तीच्या मदतीने मार्ग सुकर होईल.

    लकी रंग : Salmon red

    ऑगस्ट :

    सर्वसाधारण : आत्मविश्वास आणि अतिआत्मविश्वास यात अगदी थोडा फरक असतो हे नुकत्याच घडलेल्या काही प्रसंगांतून तुमच्या लक्षात आलं असावं. याआधी तुम्ही अनेकदा मर्यादा सोडून वागला आहात. भूतकाळातील अनुभवांतून तुम्ही शिकायला हवं नाहीतर तुम्ही उद्धट आहात असंच लोक म्हणतील. लवकरच तुमच्या आवडीची गोष्ट मिळेल.

    रिलेशनशिप : काही गैरसमज होऊ शकतात. तुम्ही चूक स्वीकारा. पूर्वायुष्यातील कुणीतरी संवाद साधण्यासाठी परत जीवनात प्रवेश करेल.

    करिअर : करिअरमध्ये काही अडचणी येतील पण आत्मविश्लेषण, आत्मपरीक्षणही कराल. तुमच्या भविष्यातील बेतांबाबत एखाद्या तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्या. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण व्हाल.

    लकी रंग : Sapphire Blue

    सप्टेंबर :

    सर्वसाधारण : तुम्ही गढून जाऊन जे काम करताय त्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे. एकतर तुम्ही प्रोजेक्टचा व्यवस्थित गृहपाठ करून जा किंवा सावध रहा. कुणा भावनिक व्यक्तीला तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत पण तुम्हाला तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीए. लवकरच सुटी घ्याल.

    रिलेशनशिप : नियतीशी जुळवून घ्याल. तुमचा विश्वास असलेल्या जोडीदारासोबत राहिल्यास मनाला शांती मिळेल. तुम्ही माणसांशी बोलताना कंटाळता पण त्यांच कारण लवकरच शोधावं लागेल.

    करिअर : तुमच्या कल्पना आता सत्यात यायला हव्यात. ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल गॉसिपिंग सुरू असेल. कदाचित तुम्ही मॅनेजमेंटचे लाडके असाल पण इतर तुमचा मत्सर करतात.

    लकी रंग : Mocha

    ऑक्टोबर :

    सर्वसाधारण : कुठल्याही गोष्टीत तुमची चूक नसली तरीही काहीही चुकीचं झालं की तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. एकतर तुम्ही चुकीचा निर्णय घेता किंवा चुकीच्या व्यक्तीला माहिती देता त्यामुळे सगळं कोसळतं. चलाख मंडळी निसटतात आणि तुम्ही अडकता. स्वत: ला वेळ देऊन आपल्या मनाचं ऐकलंत तर ते दीर्घकालीन हिताचं ठरेल.

    रिलेशनशिप : तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं. विवाहित असाल तर काळ चांगलाय. एक विचित्र नातं स्वीकारावं असा आग्रह होईल पण तुम्ही टाळाल.

    करिअर : तुम्ही एखाद्याला मदत केली असेल पण तो ती विसरून जाईल. नवी कौशल्य शिकून घ्या. ऑफिसातील दबावामुळे काही दिवस वाया जातील.

    लकी रंग : Stone Grey

    नोव्हेंबर :

    सर्वसाधारण : थोडा धीर धरा, तुम्हाला हवं ते मिळेल. कर्म करायला चांगला काळ आहे. तुमचं आदर्श रूटिन पक्कं करा आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसाला त्याबद्दल सांगा. सरकारी कामं होतील. लवकरच प्रवासाला जाल.

    रिलेशनशिप : क्षुल्लक कारणावरून तुमचं आणि जोडीदाराचं भांडण होईल. कुणीतरी विक्षिप्त वागेल आणि नंतर पश्चात्ताप करेल. नात्याचा आदर करा.

    करिअर : तुमचा धंदा जोरात चालेल. तुम्ही स्टार्टअप सुरू केलं असंल तर नवे नियम येतील. वातावरणात नकारात्मकता जाणवेल. कुणालाही नोकरीवर ठेवण्याआधी त्या व्यक्तीची पक्की माहिती काढून घ्या.

    लकी रंग : Banana Yellow

    डिसेंबर :

    सर्वसाधारण : तुम्ही स्वप्न आणि कृती यांची गल्लत करताय. तुम्ही मोठी स्वप्नं पाहता पण ती पूर्ण करेपर्यंत तुम्हाला दम धरवत नाही आणि तुम्ही निराश होता. एखादी उत्तम कल्पना तुम्हाला सुचेल. महत्त्वाच्या गोष्टी मागे पडतील पण स्वत: ची काळजी घ्याल, तातडीची कामं कराल. जुना छंद नव्याने आठवेल.

    रिलेशनशिप : वैयक्तीक नातं धोक्यात आल्याने तुम्ही कुटुंबात चर्चेत रहाल. तुम्ही नुकतंच भेटलेल्या व्यक्तीबद्दल तुमची भावना जरा नकारात्मक होईल. छोटा प्रवास मन प्रसन्न करेल.

    करिअर : तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि भविष्यातील संधींची दारं उघडतील. तुमचा प्रभावही पडेल. आयटी क्षेत्रातील काहींना पट्कन नवा जॉब मिळेल.

    लकी रंग : Bronze

    First published:

    Tags: Horoscope, Rashibhavishya