Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य: येणाऱ्या आठवड्यात होतील का तुमची IMP कामं? जाणून घ्या तुमचं भविष्य

साप्ताहिक राशीभविष्य: येणाऱ्या आठवड्यात होतील का तुमची IMP कामं? जाणून घ्या तुमचं भविष्य

या आठवड्यात शुक्राचा राशीबदल होणार आहे. शुक्र मेष राशीत दिनांक २३ रोजी प्रवेश करेल .पाहूया या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य.

आज दिनांक २२ मे २०२२ वार रविवार.तिथी वैशाख कृष्ण सप्तमी /अष्टमी. या सप्ताहात होणारे महत्वाचे गोचर म्हणजे सूर्याचा रोहिणी नक्षत्रात होणारा प्रवेश. शनि कुंभ राशीत असेल . गुरू मंगळ, शुक्रासोबत मीन राशीत आहेत.. बाकी ग्रहस्थिती मेष राशीत राहू ,तुलेत केतू बुध वृषभ राशीत भ्रमण करतील. चंद्रआठवड्याच्या सुरवातीला कुंभेत असून शुभ फल देईल. या आठवड्यात शुक्राचा राशीबदल होणार आहे. शुक्र मेष राशीत दिनांक २३ रोजी प्रवेश करेल .पाहूया या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या लाभ स्थानातील शनि लाभाचे नवीन सुंदर मार्ग दाखवेल.उच्च पदावर असलेल्या व्यक्ती भेटतील सरकार दरबारी असलेल्या कामाची दाखल घेतली जाईल .व्यय शुक्र गुरू देखील आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देईल. हा आठवडा घरामध्ये विशेष दुरुस्ती, खरेदी,सजावट यातून गडबडी चा जाईल.मातृ पितृ सुख मिळेल. सप्ताह शुभ आहे. वृषभ राशीतील सूर्य कार्यक्षेत्रात मोठी संधी मिळवून देईल.आत्तापर्यंत असलेले नकारात्मक विचार आता संपतील . नवीन निर्मितीची चाहूल लागेल. मंगळ अजून अकराव्या घरात आहे. उत्तम लाभ मिळतील. वाहन सांभाळून चालवावे.स्त्री रोग संबंधी काही समस्या असतील तर वेळीच लक्ष द्या.धार्मिक आस्था वाढेल.सप्ताह सुखद आहे. मिथुन राशीच्या भाग्य स्थानात असलेले शनि महाराज काही अलर्जी सदृश विकार निर्माण करतील.वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील.पण निभावून घ्याल.व्ययात आलेला सूर्य धार्मिक अधिष्ठान निर्माण करेल.उच्च पदस्थ व्यक्तींची भेट होईल.आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. कुटुंबात वाढ होण्याचे संकेत आहेत.सप्ताह मिश्र फळ देईल. कर्क सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र भ्रमण कुंभ राशीतून होईल.मानसिक अस्वस्थता ,शारीरिक काध्ट्रहतील. वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. मंगळ शुक्र नातेवाईक भेट,आर्थिक उलाढाल घडवून आणेल.आठवा गुरू मदत केली नाही तरी कष्ट देणार नाही. प्रकृतीकडे लक्ष द्या.सप्ताह चांगला जाईल. सिंह सप्तम स्थानात शनि आणि अष्टम गुरू जोडीदाराला संधी मिळवून देतील. संतती साठी खर्च कराल.त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. छातीसंबंधी विकार असतील तर काळजी घ्या. मन पूर्वार्धात थोडे अशांत राहील.मात्र नंतर काही शुभ घटना घडेल.सप्ताहात आनंदाचे वातावरण राहील. कन्या आज होणारे सूर्य गोचर कन्या राशीला नोकरी मिळवून देण्यास मदत करेल. सामाजिक जबाबदारी पार पाडली जाईल .संतती साठी योग्य निर्णय घ्याल.शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी मिळतील.वाचन आणि लिखाण कराल. घर आणि कार्य क्षेत्रात भरपूर काम करावे लागेल. एकूण सप्ताह आनंदात जाईल. तुला चंद्राचे भ्रमण पंचम स्थानातून शिक्षण क्षेत्रात नवी जबाबदारी घ्यावी लागेल . काही कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. पोटासंबंधी विकार असतील तर वेळीच काळजी घ्या. संततीला भरघोस यश मिळेल. शुभ वार्ता कानी पडतील. सामाजिक क्षेत्रात मोठी कामगिरी कराल.आठवडा शुभ आहे. वृश्चिक आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल. काही कौटुंबिक समस्या निर्माण होतील.सावध राहा.प्रकृती अजूनही थोडी नाजूक राहील.जास्त दगदग करू नका. वैवाहिक जीवन आनंदात राहील.बाहेर जाण्याचे योग येतील.काही उंची वस्तूची खरेदी कराल.संतती सुख भरपूर मिळेल.उत्तम काळ. धनु चतुर्थ मंगळ शुक्र तुम्हाला आकर्षक व्यक्तिमत्व देतील.नवनवीन ओळखी होतील. त्यातून काही जोड्या देखील जुळतील .आर्थिक दृष्ट्या सांभाळून राहण्याचा काळ आहे.कुटुंबात काही अप्रिय घटना घडू शकतात. जपून मार्ग काढा.गुरू बल आहे.भावंडं आनंदात असतील.त्यांची भरभराट होण्याचे योग आहेत. महत्वाचा आठवडा आहे. मकर राशी च्या धन स्थनातील शनि तुम्हाला नकारात्मक विचार देतील. कारण नसताना उदास वाटणे , निराशा जाणवणे असे परिणाम होतील.काही संक्रमक दुखणी त्रास देऊ शकतात.आर्थिक आवक नेहमीपेक्षा जास्त असेल.मात्र दवाखाना,औषध,यावर खर्च होण्याची शक्यता आहे. उत्तरार्ध सांभाळून राहण्याचा आहे. कुंभ राशीत आलेला शनि कुंभ व्यक्तीसाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. विवाहाचे प्रस्ताव येतील. गुरू महाराज ते पार पडण्यास मदत करतील. तुमच्या साठी ही वेळ कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक देणेघेणे टाळा.नुकसान संभवते. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल.सप्ताह शुभ आहे. मीन मान सन्मान , सामाजिक जबाबदारी, धार्मिक कार्यक्रम असा हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाचा ठरेल.संतती आनंदात असेल. तुम्हाला आता थोडे मोकळे वातावरण मिळावे असे प्रयत्न कराल. कार्यालयीन क्षेत्रात यश मिळेल.दिवस आनंदात जातील. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या