Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य: चलबिचल मनाला शांती मिळेल; खर्च वाढतील; कसा जाईल तुमचा आठवडा? वाचा सविस्तर

साप्ताहिक राशीभविष्य: चलबिचल मनाला शांती मिळेल; खर्च वाढतील; कसा जाईल तुमचा आठवडा? वाचा सविस्तर

सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र कुंभ राशीत शनि चंद्र विष योग निर्माण करेल.या सर्व ग्रहस्थिती नुसार पाहूया बारा राशींचे साप्ताहिक भविष्य.

आज दिनांक १९ जून २०२२. वार रविवार. आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी.या सप्ताहात होणाऱ्या महत्वाच्या ग्रह बदलांकडे बघता अतिशय महत्वाचा असा हा आठवडा असणार आहे. बलशाली शनि कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहे.गुरू मीन राशीत स्वगृही बलवान आहे.नुकतेच सूर्याचे मिथुन राशीत पदार्पण झाले असून आता गुरू आर्द्रा ह्या राहुच्या नक्षत्रात प्रवेश करेल. शुक्र वृषभ राशीत उच्च असून बुध ही तिथेच असेल. मंगळ दिनांक २६ रोजी मेष ह्या स्वतःच्या राशीत प्रवेश करेल.राहू केतू मेष व तुळेत असणार आहेत. मंगळ मेषेत अंगारक योग निर्माण करेल . सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र कुंभ राशीत शनि चंद्र विष योग निर्माण करेल.या सर्व ग्रहस्थिती नुसार पाहूया बारा राशींचे साप्ताहिक भविष्य. मेष राशीतील राहू हा काही अंशी स्वभावात अहंकार आणेल.मन थोडेसे चलबिचल राहील.मात्र लग्न शुभ कर्तरी योगात आहे.शुक्र व गुरू शुभ फल देण्यास तयार आहेत. उत्तम व्यक्तिमत्व ,प्रभावशाली बोलणे याने तुमची छाप पडेल.दागदागिने उंची वस्त्र खरेदी कराल.धर्म स्थळांच्या यात्रा ,परदेशप्रावस होईल.बंधू भगिनींना शुभ काळ.शनि मित्र मैत्रिणीकडून लाभ मिळवून देईल.सप्ताह सुरवातीला काहीसा संथ वाटेल. उत्तरार्ध आनंदी जाईल. वृषभ राशीत प्रवेश केलेला शुक्र सर्वार्थाने शुभ असून आयुष्यातील अनेक रंग भेटतील.उंची वस्त्र,आभूषण ,गृहसौख्य तसेच सुंदर व्यक्तिमत्व प्राप्त होईल. संतती सुख मिळेल. दशम स्थानात वक्री शनि कार्यक्षेत्रात जपून राहण्याचे संकेत देत आहे.आई वडिलांच्या प्रकृतीला जपा.आर्थिक दृष्ट्या शुभ काळ आहे. परदेश संबंधी घटना घडतील.सप्ताह उत्तम जाईल. मिथुन राशीच्या व्यय स्थानातील शुक्र अवस्तव खर्च करायला लावेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील.शनीचा अष्टम स्थानाकडे प्रवास जपून राहण्याचे संकेत देत आहे.  राशीतील सूर्य अधिकारी व्यक्तीची भेट करून देईल .तेज प्रदान करेल.शनि धार्मिक कार्यात सहभाग, किंवा लांबचे प्रवास योग आणेल. सप्ताहाची सुरवत काहीशी नकारात्मक होईल मात्र नंतर उत्तम फळ मिळेल. कर्क या आठवड्यात अष्टम शनीचा प्रकोप काहीसा कमी होईल. भाग्यातील गुरूची उत्तम साथ आता कर्क व्यक्तींना मिळेल. विवाहाचे प्रस्ताव यायला सुरवात होईल. परदेश संबंधी बोलणी,कागदपत्र तयार करण्यास उत्तम काळ आहे.कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. डोळ्याची काळजी घ्या.सुर्वे काहीशी अशुभ झाली तरी नंतर आठवडा शुभ फळ देईल. सिंह राशी स्वामी रवि मिथुन राशीत असून लाभाचे अनेक मार्ग प्रशस्त करेल. गुरू कृपा कमी आहे. जप व दान करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येतील. त्यांचा फायदा घ्या. धर्मा विषयी अनास्था निर्माण होऊ देऊ नका. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज टाळा. सप्ताहाच्या उत्तरार्धात अनुकूल घटना घडतील. कन्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक अश्या योग आणि ध्यान यांचा आयुष्यात समावेश करा. अष्टम मंगळ राहू कमरेचे त्रास देतील.किंवा अचानक उद्भवणारी दुखणी त्रस्त करतील. गुरूबळाची साथ आहे. जोडीदार प्रसन्न राहिलं.काहीतरी शुभ कार्यक्रम जोडीने कराल. संतातीचिंता वाटेल.भाग्यातील उच्च शुक्र तेजस्वी घटना घडवेल.तुमचा सर्वत्र नाव लौकीक वाढेल.उत्तम सप्ताह. तुला राशी स्वामी शुक्र अष्टमात ही फारशी अनुकूल परिस्थिती नाही.प्रकृती जपा. मधुमेही व्यक्तींनी काळजी घ्या.गुरू बल कमी आहे.जपून असा.संतती कडे काटेकोर लक्ष असू द्या.जोडीदाराशी सांभाळून राहा .गैरसमज वाढण्याचे संकेत आहेत.राशीतील केतू स्वभावात विरक्ती आणेल.नामजप आणि दान याने फायदा होईल.सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळाचा मेष राशीत होणारा प्रवेश हा महत्वाचा बदल आहे.रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सावध राहा.शत्रू पिडा होईल. गृह सौख्य,मातृ पितृ सुख यात कमी येईल. मात्र गुरू कृपा सर्व संकटातून मार्ग काढेल .जोडीदार आनंदी राहील.वैवाहिक सुखाचे नवीन पर्व सुरू होईल.सप्ताहाची सुरवात मध्यम राहील. धनु राशी स्वामी गुरू मीन राशीत गृह सौख्य,नवीन वास्तू,वाहन सुख देईल.शुक्र षष्ठात मधुमेही व्यक्तींनी जपून राहण्याचे संकेत देत आहे.बहिण भावंडांशी मतभेद किंवा गैरसमज टाळा. चुकीचे बोलणे घात करेल. जोडीदाराला अधिकार प्राप्ती होईल.व्यवसाय उत्तम राहिलं.सप्ताहाची सुरवात काहीशी संथ होईल. मकर राशी कडे निघालेले शनि महाराज पुन्हा अडचणीची वाट दाखवतील.आर्थिक व्यवहार जपून करा.शेअर बाजारात नुकसान होईल.भाऊ बहिणींना सुखद काळ.धार्मिक स्थळांचे प्रवास होतील. संतती काही कलाक्षेत्रात चमकेल.शत्रू पासून सावध रहा. घरामध्ये कटकटी पासून जपा. सप्ताह मध्यम राहील. कुंभ राशी स्वामी शनी वक्री अवस्थेत काहीशी नकारात्मक मानसिकता करेल.आर्थिक नुकसान होईल.मात्र दूरच्या प्रवासाचे बेत ठरू शकतात.त्यात भरपूर खर्च कराल.पैतृक संपत्तीचा लाभ होईल. संतती शिक्षण क्षेत्रात उत्तम चमकेल.एकूण सप्ताहात उत्तरार्ध शुभ जाईल. मीन राशीतील गुरू ,व्यय शनि द्विधा मनस्थिती करेल. आर्थिक उलाढाली होतील.मंगळ कर्ज देऊ किंवा घेऊ नका असे सुचवीत आहे. कुटुंबात कलह होईल.मात्र अनेक कलाकारांना हा आठवडा उत्तम जाईल.यश मिळेल.नाव होईल.कमरेच्या दुखण्या पासून जपून रहा. सप्ताहात नुकसानीचा योग आहे.काळजी घ्या. शुभम भवतू!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या