• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • साप्ताहिक राशीभविष्य: 5 राशींवर राहूचा प्रभाव तर उत्तरार्धात दिसतील अमावास्येचे परिणाम

साप्ताहिक राशीभविष्य: 5 राशींवर राहूचा प्रभाव तर उत्तरार्धात दिसतील अमावास्येचे परिणाम

जुलै महिन्यात जन्म घेतलेले लोक डोक्यापेक्षा मनाने विचार करणारे असतात.

जुलै महिन्यात जन्म घेतलेले लोक डोक्यापेक्षा मनाने विचार करणारे असतात.

राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहेत. पण राहुचा प्रभाव बऱ्याच राशींना जाणवेल... चांगला आणि वाईटही. अमावास्या कर्केसाठी जपून राहण्याचा संकेत देणारी आहे. वाचा आठवडा कसा जाईल?

  • Share this:
आज दिनांक 1 ऑगस्ट रविवार आषाढ कृष्ण नवमी. या आठवड्यात गुरू कुंभ राशीत वक्री अवस्थेत असून शनि मकर राशीत भ्रमण करीत आहे. मंगळ शुक्र सिंह राशीत असून रवी बुध कर्क राशीत भ्रमण करीत आहेत. राहू वृषभ राशीत तर केतू वृश्चिकेत असणार आहेत. या ग्रहस्थिती नुसार पाहूया साप्ताहिक  भविष्य. मेष राशीच्या धनस्थानातील राहू अचानक पैतृक संपत्ती संबंधी काही लाभ मिळवून देईल. चतुर्थ स्थानातील रवि बुध घराविषयी शुभ घटना, नवीन वास्तू संबंधी निर्णय असा संकेत देत आहेत. गुरुकृपा राहील. पंचमातील मंगळ शुक्र  संतती चिंता दर्शवतो. पण अध्यात्मिक प्रगती होईल. उत्तरार्ध अमावस्येच्या प्रभावातून मानसिक ताण दर्शवतो. आठवडा शुभ आहे. वृषभ राशीतील राहू प्रत्येक बाबतीत संभ्रमात टाकेल. स्वभावात थोडा दिखावा,अभिमान वाढीस लागेल. तृतीय स्थानातील सूर्य बुध बहिण भावंडाची मदत मिळवून देण्यासाठी चांगले फळ देतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश. घरासाठी नवीन वस्तू, खर्चात वाढ असा हा आठवडा आहे. उत्तरार्धात अमावस्येच्या दूषित प्रभावातून प्रवासात त्रास संभवतो. मिथुन व्यय स्थानातील राहू परदेशी जाण्याची संधी  मिळवून देईल. कुटुंबासाठी खर्च करायला तुम्ही तयार राहाल. वाणी मध्ये माधुर्य येईल. आकर्षणात वाढ होईल. भाग्य स्थानातील गुरू संतती कारक असून पराक्रमाची वाढ करणारा आहे. उत्तरार्धात अमावस्येच्या वाईट प्रभावातून आर्थिक हानी, शारीरिक त्रास संभवतात. शनीची उपासना करावी. कर्क राहू लाभ मिळवून देण्यास तत्पर आहे  पण अष्टमात गुरू प्रगतीला विरोध करीत आहे. राशीतील रवि बुध शनिच्या प्रतियोगात असल्यामुळे वडील आणि करिअर यासंबंधी काळजी राहील. कुटुंबात मतभेद, खर्चात वाढ करणारा हा आठवडा आहे. महिला वर्ग सहकार्य करणार आहे. उत्तरार्धात होणारी अमावास्या अत्यंत जपून राहण्याचे संकेत देत आहे.गुरूची उपासना करावी. सिंह दशमातील राहू  कार्यक्षेत्रातील अडचणी, बदल यासाठी सक्रीय आहे. व्ययस्थानातील सूर्य बुध खर्चात, कायदे संबंधी अडचणीत वाढ दर्शवत आहे. प्रकृती सांभाळा. राशीतील मंगळ शुक्रवार स्वभाव थोडा आक्रमक करतील  पण धाडस आणि पराक्रमाची वाढ होईल. गुरुकृपा विवाह जुळवून देण्यास अनुकूल आहे .अमावस्येच्या सुमारास नुकसान संभवते. कन्या भाग्य स्थानात असलेला राहू धार्मिक अनास्था, दाखवतो  ,व्यय स्थानातील मंगळ  काही तपासण्या, प्रकृतीची कुरबूर सुरू ठेवेल. कर्क राशीत सूर्य बुध लाभ मिळवुन देईल. पोटाचे विकार त्रास देतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. लाभ होतील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आर्थिक बाजु ठिक आहे. अमावास्या संतती चिंता दर्शवत आहे. सावध रहा. तुला राशीच्या अष्टमात राहू, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल .पैतृक संपत्ती संबंधी काही चिंता राहील. दशमातील रवि बुध कार्य क्षेत्रात काही शुभ घटना घडतील. किंवा त्यापासून कीर्ती मिळेल. मोठे काम पार पाडाल. अडचणी जरूर येतील. तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत आनंदात दिवस जाईल. आर्थिक नियोजन नीट करा. आध्यात्मिक प्रगती होईल. अमावस्येच्या सुमारास वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. वृश्चिक व्यवसाय धंद्यात नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा आठवडा आहे. जोडीदाराला महत्व द्या, त्यांचा सल्ला घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहील. तृतीय स्थानात शनि आणि भाग्य स्थानातील रवि बुध  वडील  व्यक्तींकडून लाभ होतील. नवीन संधी मिळतील . नोकरीमध्ये शुभ काळ. अमावास्या मात्र प्रवासात  जपून रहा असे संकेत देत आहे. धनु षष्ठ राहू आणि अष्टमात सूर्य प्रकृती थोडी नाजूक होईल. पोटाचे त्रास होतील . धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख, आर्थिक लाभ याबाबत जरा चिंता राहील. उत्तरार्ध अमावस्येच्या प्रभावातून मानसिक ताण, शारीरिक त्रास, वाहन भय  दर्शवित आहे. पण गुरुकृपा सर्व संकटाचे निवारण करेल. मंगळ शुक्र प्रवासाचे योग आणतील. पण एकट्याने प्रवास टाळा. मकर पंचमस्थ राहू यावर्षी संतती संबंधी चिंता दाखवत आहे. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. अधिकारी वर्ग मदत करतील.आर्थिक बाजू उत्तम राहील. जोडीदाराची साथ लाभेल. मात्र अष्टमात मंगळ एखादी शस्त्रक्रिया, तपासण्या, असा संकेत देत आहे. कुटुंबात मतभेद होतील. अमावस्येच्या सुमारास जोडीदाराची काळजी घ्या. खर्च वाढतील. कुंभ राशीतील गुरू  मंगळाच्या प्रतियोगात असल्यामुळे काही चांगले प्रस्ताव आणील. त्याचा फायदा घ्या. शनि उपासना करावी. चतुर्थ स्थानातील राहू  व दशमातील केतू घर आणि व्यवसाय याबाबतीत बदल घडवतील. इच्छा असली तर नवीन घराचा योग आहे. संतती संबंधी काही शुभ समाचार मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश. अमावास्या शत्रू पिडा व नुकसान दर्शवते आहे. मीन तृतीय राहू पराक्रमाची वाढ करेल. हातून काही मोठी कामे होतील. पंचमात सूर्य बुध संतती संबंधी शुभ समाचार मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक बाजु चांगली राहील. प्रकृती थोडी नाजूक राहील. उत्तरार्ध अमावस्येच्या प्रभावातून तणावाचा जाईल. बारावा गुरू धार्मिक,कौटुंबिक बाबी वर खर्च करील. गुरूची उपासना फल देणारी ठरेल. शुभम भवतु!!
First published: