Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य: ज्येष्ठा गौरींच्या आगमनानं 'या' राशींचं चमकेल नशीब; होणार लाभच लाभ

साप्ताहिक राशीभविष्य: ज्येष्ठा गौरींच्या आगमनानं 'या' राशींचं चमकेल नशीब; होणार लाभच लाभ

सूर्य 16 September उत्तर रात्री कन्या ह्या आपल्या मित्र राशीत प्रवेश करेल. तिथे तो मंगळ आणि बुधा सोबत असेल. पुढचे दोन महिने या ग्रह स्थिती नुसार प्रत्येक राशीवर काय परिणाम होतील बघूया.

आज रविवार दिनांक 12 September 2021.आज भाद्रपद शुक्ल षष्ठी. आज ज्येष्ठा गौरी आवाहन आहे. चंद्र अनुराधा नक्षत्रात असेल. ह्या आठवड्यात दोन महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार आहेत  वक्री गुरू 14 September रोजी रात्रौ मकर राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तो वक्री शनि सोबत युती करेल. तसेच सूर्य 16 September उत्तर रात्री  कन्या ह्या आपल्या मित्र राशीत प्रवेश करेल. तिथे तो मंगळ आणि बुधा सोबत असेल. पुढचे दोन महिने या ग्रह स्थिती नुसार  प्रत्येक राशीवर काय परिणाम होतील बघूया. मेष राशीच्या दशम स्थानात प्रवेश करणारा गुरू  कार्यक्षेत्रात महत्त्वाचा बदल घडवून आणेल. काही महिन्यां पासून अडकलेली काम पूर्ण होतील. गुरू गृह स्वास्थ्य आणि वास्तु लाभ मिळवुन देईल. मात्र मकर राशीतील शनिच्या प्रभावा मुळे दिरंगाई होईल. धार्मिक कार्य घडेल. लोन किंवा पैश्याची देवाणघेवाण जरा जपून करा. जोडीदाराची सुंदर साथ लाभेल. मातृ पक्ष महत्त्वाचा ठरेल. उत्तरार्धात  चंद्र शनि भ्रमण  नकारात्मक प्रभाव  टाकेल. जपून रहा. वृषभ राशीच्या भाग्य स्थानात येणारा गुरू शनि योग धार्मिक कार्य घडवून आणेल. प्रवास योग येतील.उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध शनि चंद्र भ्रमण त्रासाचे ठरू शकते. वडीलांचे आरोग्य सांभाळा. संतती साठी काही महत्व पूर्ण घटना घडतील. षष्ठ स्थानात शुक्र मामा कडुन उत्तम लाभ मिळवुन देईल. लोन मिळेल. शत्रू पराजित होतील. आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. मिथुन ग्रह अत्यंत सांभाळून राहण्याचा संकेत देत आहेत .अष्टमात प्रवेश करणारा वक्री गुरू आणि शनि प्रकृती स्वास्थ्य जपा अशी सक्त ताकीद देत आहेत. गूढ शास्त्राची आवड निर्माण होईल. व्यय स्थानात राहू परिस्थितीत आणखी बिघाड करेल. कुटुंबाचे स्वास्थ्य जपा. कोणाशी वाद नको. मुले तुमच्या मनासारखी वागतील .त्यांची उत्तम प्रगती होईल  उत्तरार्धात आर्थिक ,नुकसान ,अनारोग्य यापासून जपा. चंद्र शनि विष योग करीत आहेत. गणरायाची प्रार्थना करून सकारात्मक रहा. कर्क राशीच्या सप्तमात होणारी गुरू शनि युती वैवाहिक जीवनात वादळ आणेल. अचानक येणारे  प्रस्ताव स्विकार करू नका. फसवणूक होऊ शकते. निर्णय पुढे ढकलणे योग्य. तृतीय स्थानात होणारे सुर्य भ्रमण पराक्रमाची वाढ करेल. बहिण भावाशी संबंध बिघडू देऊ नका.मधुर  बोलून  काम करा. गुरूची उपासना करावी. घरातल्या वस्तूंची दुरुस्ती किंवा खरेदी निघेल. आर्थिक स्थिती ठीक  .उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल. सिंह धन प्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील. मात्र मिळकत आणि खर्च याचा ताळमेळ असू द्या  बोलण्यावर ताबा ठेवा.तृतीय शुक्र अनेक कलाकार निर्माण करेल. कले मध्ये रुची वाढेल. प्रवास योग  येतील. षष्ठ गुरु शनि आर्थिक शारीरिक त्रास दर्शवतो. उत्तरार्धात चंद्र शनि भ्रमण  नकारात्मक प्रभाव टाकेल .प्रकृती जपा. काहींना भावंडाची साथ मिळेल. पूर्वार्ध अनुकूल. कन्या संतती चिंता थोडी कमी होईल.पंचम गुरु शनी संतती साठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ असून परदेश प्रवास संबंधी काही निर्णय घ्याल.राशीतील मंगळ सूर्य बुध रक्त विकार, त्वचा रोग  किंवा उष्णतेचे विकार देतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. आर्थिक लाभ होतील. उत्तरार्ध शनि चंद्र योगाचे परिणाम देईल.. तुला राशीतील  शुक्र तुम्हाला आनंदी ठेवेल. नवनवीन वस्तू खरेदी कराल. व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल. चैनीसाठी खर्च कराल. गुरु शनि प्रॉपर्टी संबंधी निर्णय घेण्यास मदत करतील. आईचे स्वास्थ्य जपा. कुटुंबात तणाव निर्माण होऊ देऊ नका.. काहींना अचानक आर्थिक नुकसान संभवते. अष्टम राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. श्री गणेशाचे पूजन करावे. वृश्चिक तृतीय स्थानात येणारा गुरू  विवाह योग आणेल. पण सांभाळून पुढे जा. फसवणूक होऊ शकते. प्रवास योग येतील. मित्र मैत्रिणींना भरपूर वेळ द्याल. पराक्रम अणि चिकाटी यात वाढ होईल. पोटा संबंधी विकार असतील तर दुर्लक्ष करू नका. जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नको. खर्च बेताने करा. मिश्र फळ देणारा सप्ताह. धनु राशीच्या धनस्थानातील गुरू  अचानक धन प्राप्तीचे योग आणेल. पैतृक संपत्ती संबंधी निर्णय होईल. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम कराल. नोकरीसाठी प्रयत्‍न केला तर यश मिळवून देणारा आठवडा आहे. महिला वर्ग खुश राहतील. मुलांसाठी शुभ फळ  मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रगती संथ गतीने सुरू राहील. उत्तरार्ध जपून राहण्याचा. मकर  वक्री गतीने राशीत प्रवेश करणारा गुरू शनि सोबत नीच भंग योग करेल. तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. संतती सुख चांगले  भाग्य स्थानातील सुर्य मंगळ  शुभ फळ देतील. उच्चीचा शुक्र कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. खर्चावर नियंत्रण असावे. गुरु उपासना करावी. कुंभ राशी च्या व्यय स्थानात येणारा गुरू स्वास्थ्य हानी करेल कोर्ट कचेरी मध्ये यश मिळू शकते. हॉस्पिटल मध्ये खर्च होईल. अष्टमात असलेले  रवि मंगळ बुध त्वचा, पोट यासंबंधी विकार निर्माण करतील. मात्र भाग्यात शुक्राचे भ्रमण अत्यंत शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. उत्तरार्ध प्रतिकूल. मीन राशी स्वामी गुरू  नीच अवस्थेत जाणार आहे.  आत्मविश्वास कमी होईल. कामात दिरंगाई, शिक्षणात अडथळा निर्माण होईल. व्यवसाय धंद्यात भागीदारी मध्ये सामंजस्य ठेवा. वाद नको. आर्थिक निर्णय लांबणीवर टाका. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. अष्टम शुक्र स्त्रियांनी जपून रहा असे सुचवत आहे.मिश्र फळ देणारा सप्ताह  आहे. शुभम भवतु!!
Published by:Atharva Mahankal
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या