मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशीभविष्य: शुक्राचा राशीबदल 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; असा जाईल तुमचा संपूर्ण आठवडा

साप्ताहिक राशीभविष्य: शुक्राचा राशीबदल 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; असा जाईल तुमचा संपूर्ण आठवडा

चंद्रआठवड्याच्या सुरवातीला मीन राशीत असून शुभ फल देईल. या आठवड्यात शुक्राचा राशीबदल झाला असून शुक्र कर्क राशीत तर मंगळ वृषभ राशीत आहे

चंद्रआठवड्याच्या सुरवातीला मीन राशीत असून शुभ फल देईल. या आठवड्यात शुक्राचा राशीबदल झाला असून शुक्र कर्क राशीत तर मंगळ वृषभ राशीत आहे

चंद्रआठवड्याच्या सुरवातीला मीन राशीत असून शुभ फल देईल. या आठवड्यात शुक्राचा राशीबदल झाला असून शुक्र कर्क राशीत तर मंगळ वृषभ राशीत आहे

आज दिनांक १४ऑगस्ट २०२२ वार रविवार.तिथी श्रावण कृष्ण तृतीया. या सप्ताहात होणारे महत्वाचे गोचर म्हणजे सूर्य आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल.. शनि मकर राशीत असेल . गुरू मीन राशीत आहे.. बाकी ग्रहस्थिती मेष राशीत राहू ,तुलेत केतू ,बुध सिंह राशीत भ्रमण करतील. चंद्रआठवड्याच्या सुरवातीला मीन राशीत असून शुभ फल देईल. या आठवड्यात शुक्राचा राशीबदल झाला असून शुक्र कर्क राशीत तर मंगळ वृषभ राशीत आहे . दिनांक १८ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तसेच भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.पाहूया या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या दशम स्थानातील शनि प्रगतीचे नवीन सुंदर मार्ग दाखवेल.उच्च पदावर असलेल्या व्यक्ती भेटतील सरकार दरबारी असलेल्या कामाची दखल घेतली जाईल . शुक्र देखील आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देईल. हा आठवडा घरामध्ये विशेष दुरुस्ती, खरेदी,सजावट यातून गडबडी चा जाईल.मातृ पितृ सुख मिळेल. आर्थिक आघाडीवर जपून रहा. सप्ताह शुभ आहे. वृषभ राशीतील मंगळ कार्यक्षेत्रात मोठी संधी मिळवून देईल.आत्तापर्यंत असलेले नकारात्मक विचार आता संपतील . नवीन निर्मितीची चाहूल लागेल. गुरू अजून अकराव्या घरात आहे. उत्तम लाभ मिळतील. वाहन सांभाळून चालवावे. स्त्री रोग संबंधी काही समस्या असतील तर वेळीच लक्ष द्या. धार्मिक आस्था वाढेल.सप्ताह सुखद आहे. मिथुन राशीच्या अष्टम स्थानात असलेले शनि महाराज काही अलर्जी सदृश विकार निर्माण करतील.वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील.पण निभावून घ्याल. द्वितीय स्थानात आलेला सूर्य धार्मिक अधिष्ठान निर्माण करेल.उच्च पदस्थ व्यक्तींची भेट होईल.आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. कुटुंबात वाढ होण्याचे संकेत आहेत. खर्च भरपूर होईल. सप्ताह मिश्र फळ देईल. कर्क सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र भ्रमण मीन राशीतून होईल.मानसिक अस्वस्थता , शारीरिक कष्ट कमी होतील. तुमचे वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण होईल. शुक्र नातेवाईक भेट,आर्थिक उलाढाल घडवून आणेल.वक्री गुरू मदत केली नाही तरी कष्ट देणार नाही. प्रकृतीकडे लक्ष द्या.सप्ताह चांगला जाईल. सिंह षष्ठ स्थानात शनि आणि अष्टम गुरू काहीसे नकारात्मक परिणाम देतील. संतती साठी खर्च कराल.त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. छातीसंबंधी विकार असतील तर काळजी घ्या.मन पूर्वार्धात थोडे अशांत राहील.मात्र नंतर काही शुभ घटना घडेल. खर्च कराल. सप्ताहात चिंतेचे वातावरण राहील. कन्या सूर्य गोचर कन्या राशीला नोकरी मिळवून देण्यास मदत करेल. सामाजिक जबाबदारी पार पाडली जाईल .संतती साठी योग्य निर्णय घ्याल. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संधी मिळतील.वाचन आणि लिखाण कराल.घर आणि कार्य क्षेत्रात भरपूर काम करावे लागेल. एकूण सप्ताह आनंदात जाईल. तुला चंद्राचे भ्रमण शष्ठ स्थानातून कौटुंबिक क्षेत्रात नवी जबाबदारी घ्यावी लागेल .व्यवसाय उत्तम राहिलं. काही कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. पोटासंबंधी विकार असतील तर वेळीच काळजी घ्या. संततीला भरघोस यश मिळेल. शुभ वार्ता कानी पडतील. सामाजिक क्षेत्रात मोठी कामगिरी कराल. आठवडा शुभ आहे. वृश्चिक आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होईल. काही कौटुंबिक समस्या निर्माण होतील.सावध राहा.प्रकृती अजूनही थोडी नाजूक राहील.जास्त दगदग करू नका.सप्तम मंगळ आहे वैवाहिक जीवन तणावपूर्ण राहील. बाहेर जाण्याचे योग येतील.काही उंची वस्तूची खरेदी कराल.संतती सुख भरपूर मिळेल. संमिश्र काळ. धनु चतुर्थ गुरू आणि सहाव्या घरात मंगळ कौटुंबिक गाठी भेटी घडवेल. नवनवीन ओळखी होतील. त्यातून काही जोड्या देखील जुळतील .आर्थिक दृष्ट्या सांभाळून राहण्याचा काळ आहे.कुटुंबात काही अप्रिय घटना घडू शकतात. जपून मार्ग काढा. गुरू बल आहे.भावंडं आनंदात असतील.त्यांची भरभराट होण्याचे योग आहेत. महत्वाचा आठवडा आहे. मकर स्वस्थनातील शनि तुम्हाला नकारात्मक विचार देइल.. कारण नसताना उदास वाटणे ,निराशा जाणवणे असे परिणाम होतील.काही संक्रमक दुखणी त्रास देऊ शकतात.आर्थिक आवक नेहमीपेक्षा जास्त असेल. जोडीदार आनंदी असेल . दवाखाना,औषध,यावर खर्च होण्याची शक्यता आहे. उत्तरार्ध सांभाळून राहण्याचा आहे. कुंभ व्ययात आलेला शनि कुंभ व्यक्तीसाठी विशेष बातमी घेऊन येईल.द्वितीय गुरू वक्री आहे विवाहाचे प्रस्ताव येतील. गुरू महाराज ते पार पडण्यास मदत करतील. तुमच्या साठी ही वेळ कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक देणेघेणे टाळा. नुकसान संभवते. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल.सप्ताह शुभ आहे. मीन मान सन्मान , सामाजिक जबाबदारी, धार्मिक कार्यक्रम असा हा आठवडा तुमच्यासाठी आनंदाचा ठरेल.संतती आनंदात असेल. तुम्हाला आता थोडे मोकळे वातावरण मिळावे असे प्रयत्न कराल. कार्यालयीन क्षेत्रात यश मिळेल.दिवस आनंदात जातील. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या