Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य: मागे राहिलेली सगळी कामं या आठवड्यात होतील पूर्ण; असा जाईल तुमचा आठवडा

साप्ताहिक राशीभविष्य: मागे राहिलेली सगळी कामं या आठवड्यात होतील पूर्ण; असा जाईल तुमचा आठवडा

हा सप्ताह अनेक ग्रहांच्या स्वराशित उच्च अवस्थेत असल्याने धन दायक व शुभ असेल. पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.(लग्नानुसार)

    आज दिनांक ३१ जुलै २०२२ रविवार. श्रावण शुक्ल तृतीया..ह्या आठवड्यात होणाऱ्या महत्वाच्या घटना आणि ग्रहस्थिती जाणून घेऊया.दिनांक ३१ रोजी बुध आपल्या मित्रराशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करेल.शुक्र मिथुन राशीत असून दिनांक ६ रोजी कर्क राशीत प्रवेश करेल.गुरू मीन राशीत उच्च अवस्थेत आहे.शनि मकर राशीत वक्री तर सुर्य कर्क राशीत आहे. राहू केतू मेष व तुला राशीत असतील.चंद्र सप्ताहाच्या सुरवातीला सिंह राशीत शुभ असून दिनांक रोजी २ ऑगस्ट रोजी नागपंचमी असेल .हा सप्ताह अनेक ग्रहांच्या स्वराशित उच्च अवस्थेत असल्याने धन दायक व शुभ असेल. पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.(लग्नानुसार) मेष राशी स्थानात असणारा मंगळ राहू प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवीत आहे. डोळे लाल होणे, दुखणे ,रक्त दाब या समस्या होऊ शकतात. दाताची दुखणी होतील. मंगळ राहू जोडीदाराची काळजी घ्या,गैरसमज व कलह टाळा असे सुचवीत आहे. सर्वार्थाने सांभाळून राहावे असा संकेत देत आहे. वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. जपून राहावे. कार्यक्षेत्रात होणाऱ्या उलढाली चकित करतील.शुभ चंद्र घरात आनंदी वातावरण ठेवेल. संतती आनंदी राहील. शुभ शुक्र आर्थिक स्थिती मजबूत करेल. सप्ताह शुभ आहे . वृषभ राशीचया व्यय स्थानातून जाणारा राहू मंगळ ही एक प्रकारची कठीण स्थिती आहे. स्थानबदल होऊ शकतो. मानसिक ताण वाढेल .तृतीय स्थानातील रवि मोठ्या व्यक्तीकडून लाभ मिळवून देईल. भाग्य स्थानातील शनि धार्मिक आस्था निर्माण करील.शुभ चंद्र खरेदीचे योग आणेल.बहीण भाऊ भेटतील. काही महत्वाचे निर्णय घ्याल .एकूण सप्ताहात आनंदी वातावरण राहिल. आर्थिक नुकसान होऊ शकते. सप्ताह मध्यम. मिथुन आर्थिक लाभ, मित्र मैत्रिणींची भेट, प्रवास असा हा आठवडा आनंदात जाईल. धन स्थानात रवि बुध आर्थिक भरभराट करतील.राहू मंगळ युती मात्र सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. मेष राशीत राहू संततीसंबंधी शुभ समाचार देईल. कार्यक्षेत्रात अतिशय महत्वाची व्यक्ती भेटेल.तुमचा अधिकार वाढेल.जबाबदारी देखील वाढेल. शिव आराधना करावी. एकूण सप्ताह शुभ जाईल . कर्क धनस्थानातील चंद्र आर्थिक, मानसिक पातळीवर आनंदी ठेवेल.व्ययस्थानात रवि परदेश संबंधी कामे करायला मदत करेल. तुमचे नाव होईल.दशमस्थनात राहू मंगळ कार्यक्षेत्रात बदल करेल. राहत्या घरात देखील बदल होण्याचे संकेत आहेत. सप्तम शनि जोडीदाराची काळजी घ्यावी ,कलह करू नये असे सुचवीत आहे. राशीत येणारा शुक्र शुभ घटनांची चाहूल देईल . सप्ताह आनंदात जाईल. सिंह राशीच्या व्यय स्थानात बुध रवि परदेशातून उत्तम लाभ मिळण्याचे संकेत देत आहे. पोटासंबंधी तक्रारी असतील तर काळजी घ्या. गुडघेदुखी त्रास देईल .भाग्य स्थानात राहु मंगळ धार्मिक आस्था डळमळीत करेल. वडिलार्जित संपत्ती संबंधी विवाद होतील. चंद्र गृहसौख्य निर्माण करेल.वैवाहिक जीवन ठीक असेल . सप्ताह मिश्र फळ देईल. कन्या राशीच्या व्यक्तींच्या प्रकृतीच्या तक्रारी मध्ये वाढ होईल. कमरेचे , दातांचे विकार त्रास देतील. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग आणेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.स्त्रियांनी विशेष करून सांभाळून असावे .संसर्ग जन्य रोगांपासून सावधान. सप्तम गुरू आणि दशम शुक्र ही ग्रह स्थिती व्यवसाय आणि जीवनात शुभ समाचार देईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल .मामा कडून काही चांगली बातमी कळेल. सप्ताह शुभ जाईल . तुला सप्तम स्थानातील राहू मंगळ जोडीदाराला जपा, गैरसमज टाळा.इतके दिवस तुम्ही विचित्र,निदान न होणाऱ्या दुखण्यानी त्रस्त झाले असाल तर आता त्यातून मुक्ती मिळेल. हा बदल तुम्हाला निश्चित सुखावह राहील. वैवाहिक जीवनात वादळ येण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी पासून सावध रहा. रवि कार्यक्षेत्रात चांगला बदल घडवेल .ह्या काळात अनेक बदल होतील.सप्ताह मध्यम फळ देणारा ठरेल. वृश्चिक शैक्षणिक लाभ,उच्च शिक्षणासाठी परदेश यात्रा असा हा सप्ताह शुभ फळ देणारा आहे.राशीतून बाहेर पडलेला केतू प्रकृती संबंधी तक्रारी निर्माण करेल. राहू मंगळ शत्रूवर विजय मिळवून देईल . गुरू घरासाठी शुभ असून अनेक बदल होतील .नवीन वास्तू होईल. प्रवासाचे योग येतील. मात्र सांभाळून रहा.शनि वक्री आहे .नुकसानीचे योग .सप्ताह लाभदायक ठरेल. सार्वजनिक जीवनात यश मिळेल. सप्ताह शुभ. धनु चतुर्थ गुरू घरामध्ये मोठे बदल घडवेल. नवीन गृह प्रवेश होऊ शकतो वाहन खरेदी कराल. पंचम स्थानात प्रवेश करणार राहू मंगळ संततीकडे लक्ष द्या असे सांगत आहे.उच्च शिक्षणासाठी चांगला काळ.नवविवाहित जोडप्यांना गोड बातमी मिळू शकते .पण काळजी घ्या.आर्थिक देणेघेणे टाळा. मोठे व्यवहार लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. सप्ताह शुभ. मकर शनि थोडे अडथळे निर्माण करीत आहे. मात्र स्वभाव पराक्रमी आणि तापट झाला असून टोकाचे निर्णय घेऊ नये. चतुर्थात मंगळ राहू स्थान बदल नक्की घडवून आणेल. घर, वाहन या संबंधी दुरुस्ती निघेल.आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज टाळा.घरात काही कार्य होतील .पंचमी सुमारास काही घटना घडतील. सप्ताह आनंदात जाईल. कुंभ व्यय स्थानातील शनि कायद्याचे भय निर्माण करील.आर्थिक अडचणी जाणवतील.प्रकृती जपा. मीनेचा गुरू कुटुंबात शुभ घटना घडतील असे सुचवीत आहे. तृतीय स्थानात राहू मंगळ व भाग्यात केतू धार्मिक निष्ठा वाढवेल . बहीण भावामध्ये गैरसमज होऊ देऊ नका. पराक्रमात वाढ करेल. सप्ताह प्रकृती चिंतेत जाऊ शकतो. मीन राशीत आलेला गुरू तेजस्वी व्यक्तिमत्व बहाल करेल.कुटुंब स्थानात राहु मंगळ आहे. कुटुंबात काही गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. अचानक कुठूनतरी धन प्राप्ती होईल. राहू मंगळ मित्र मंडळी पासून सावध राहण्याचे संकेत देत आहेत . संततिकडे लक्ष असू द्या .प्रवास योग येतील.सप्ताह मिश्र फळ देणारा ठरेल . शुभम भवतू !!
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Astrology and horoscope

    पुढील बातम्या