Home /News /astrology /

साप्ताहिक राशिभविष्य : शुभ आहे आठवडा पण अमावास्या काळात सांभाळून राहा

साप्ताहिक राशिभविष्य : शुभ आहे आठवडा पण अमावास्या काळात सांभाळून राहा

Weekly Horoscope : हा सप्ताह अनेक ग्रहांच्या स्वराशीत उच्च अवस्थेत असल्याने धनदायक आणि शुभ असेल.

आज दिनांक 26 जून 2022 रविवार. ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी. या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना आणि ग्रहस्थिती जाणून घेऊया. दिनांक 27 रोजी मंगळ आपल्या स्वराशीत म्हणजे मेष राशीत प्रवेश करेल. तिथं तो राहूसोबत अंगारक योग निर्माण करेल. शुक्र वृषभ राशीत उच्च असून गुरू मीन राशीत उच्च अवस्थेत आहे. शनी कुंभ राशीत वक्री तर सुर्य मिथुन राशीत आहे. बुध वृषभ तर राहू केतू मेष आणि तूळ राशीत असतील. चंद्र सप्ताहाच्या सुरुवातीला वृषभ राशीत शुभ आणि स्वगृही असून दिनांक 29 रोजी ज्येष्ठ अमावस्या असेल. हा सप्ताह अनेक ग्रहांच्या स्वराशीत उच्च अवस्थेत असल्याने धनदायक आणि शुभ असेल. पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.(लग्नानुसार) मेष राशी स्थानात प्रवेश करणारा मंगळ प्रकृतीची काळजी घ्यावी असं सुचवत आहे. डोळे लाल होणं, दुखणं, रक्तदाब या समस्या होऊ शकतात. कायदा पाळा. मंगळ राहू जोडीदाराची काळजी घ्या, गैरसमज आणि कलह टाळा असं सुचवत आहे. सर्वार्थाने सांभाळून राहावं असा संकेत देत आहे. वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. जपून राहावं. कार्यक्षेत्रात होणाऱ्या उलढाली चकित करतील. शुभ चंद्र घरात आनंदी वातावरण ठेवेल. शुभ शुक्र आर्थिक स्थिती मजबूत करेल. सप्ताह शुभ आहे . वृषभ राशीच्या व्यय स्थानातून जाणारा राहू मंगळ ही एक मोठी घटना आयुष्यात बदल करेल. स्थानबदल होऊ शकतो. मानसिक ताण वाढेल. धन स्थानातील रवी मोठ्या व्यक्तीकडून लाभ मिळवून देईल. भाग्य स्थानातील ग्रह धार्मिक आस्था निर्माण करतील. शुभ चंद्र खरेदीचे योग आणेल. बहीण-भाऊ भेटतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. एकूण सप्ताहात आनंदी वातावरण राहिल. अमावस्या काळात आर्थिक नुकसान होऊ शकते. सप्ताह मध्यम. मिथुन आर्थिक लाभ, मित्र मैत्रिणींची भेट, प्रवास असा हा आठवडा आनंदात जाईल. राहू मंगळ युती मात्र सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. मेष राशीत राहू संतती संबंधी शुभ समाचार देईल. कार्यक्षेत्रात अतिशय महत्त्वाची व्यक्ती भेटेल. तुमचा अधिकार वाढेल. जबाबदारी देखील वाढेल. अमावस्या काळात शिव आराधना करावी. एकूण सप्ताह शुभ जाईल. कर्क राशीतील चंद्र उत्तरार्धात मानसिक पातळीवर आनंदी ठेवेल. व्ययस्थानात रवी परदेशसंबंधी कामं करायला मदत करेल. तुमचं नाव होईल. दशम स्थानात येणारा राहू मंगळ कार्यक्षेत्रात बदल करेल. राहत्या घरातदेखील बदल होण्याचे संकेत आहेत. सप्तम शनी जोडीदाराची काळजी घ्यावी, कलह करू नये असं सुचवत आहे. अमावस्या व्यय आणि दडपणाखाली जाईल. सप्ताह आनंदात जाईल. सिंह राशीच्या लाभ स्थानात रवी उत्तम लाभ मिळण्याचे संकेत देत आहे. पोटासंबंधी तक्रारी असतील तर काळजी घ्या. गुडघेदुखी त्रास देईल. भाग्य स्थानात राहू मंगळ धार्मिक आस्था डळमळीत करेल. वडिलोपार्जित संपत्तीसंबंधी विवाद होतील. दशम चंद्र गृहसौख्य निर्माण करेल. वैवाहिक जीवन ठिक असेल. सप्ताह मिश्र फळ देईल. कन्या राशीच्या व्यक्तींच्या प्रकृतीच्या तक्रारीमध्ये वाढ होईल. कमरेचे विकार त्रास देतील. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग आणेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. स्त्रियांनी विशेष करून सांभाळून असावं. संसर्गजन्य रोगांपासून सावधान. सप्तम गुरू आणि भाग्यात शुक्र ही ग्रह स्थिती व्यवसाय आणि जीवनात शुभ समाचार देईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. मामाकडून काही चांगली बातमी कळेल. सप्ताह शुभ जाईल. तूळ सप्तम स्थानातील राहू मंगळ जोडीदाराला जपा, गैरसमज टाळा. इतके दिवस तुम्ही विचित्र, निदान न होणाऱ्या दुखण्यानी त्रस्त झाला असाल तर आता त्यातून मुक्ती मिळेल. हा बदल तुम्हाला निश्चित सुखावह राहिल. वैवाहिक जीवनात वादळ येण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी पासून सावध रहा. रवी कार्यक्षेत्रात चांगला बदल घडवेल. अमावस्या काळात अनेक बदल होतील. सप्ताह मध्यम फळ देणारा ठरेल. वृश्चिक शैक्षणिक लाभ, उच्च शिक्षणासाठी परदेश यात्रा असा हा सप्ताह शुभ फळ देणारा आहे. राशीतून बाहेर पडलेला केतू प्रकृतीसंबंधी तक्रारी दूर करेल. राहू मंगळ शत्रूवर विजय मिळवून देईल. चतुर्थ गुरू घरासाठी शुभ असून अनेक बदल होतील. नवीन वास्तू होईल. प्रवासाचे योग येतील. मात्र सांभाळून रहा. शनी वक्री आहे. नुकसानीचे योग. सप्ताह लाभदायक ठरेल. सार्वजनिक जीवनात यश मिळेल. अमावस्या शुभ. धनु चतुर्थ गुरू घरामध्ये मोठे बदल घडवेल. नवीन गृह प्रवेश होऊ शकतो, वाहन खरेदी कराल. पंचम स्थानात प्रवेश करणार राहू मंगळ संततीकडे लक्ष द्या असे सांगत आहे. उच्च शिक्षणासाठी चांगला काळ. नवविवाहित जोडप्यांना गोड बातमी मिळू शकते. पण काळजी घ्या. आर्थिक देणंघेणं टाळा. मोठे व्यवहार लांबणीवर टाकण्याचा निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी कराल. सप्ताह शुभ. मकर शनी थोडे अडथळे निर्माण करीत आहे. मात्र स्वभाव पराक्रमी आणि तापट झाला असून टोकाचे निर्णय घेऊ नये. चतुर्थात येणारा मंगळ राहू स्थान बदल नक्की घडवून आणेल. घर, वाहन यासंबंधी दुरुस्ती निघेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज टाळा. घरात काही कार्य होतील. अमावस्येच्या सुमारास काही घटना घडतील. सप्ताह आनंदात जाईल. कुंभ व्यय स्थानातील शनी कायद्याचे भय निर्माण करील. आर्थिक अडचणी जाणवतील. प्रकृती जपा. मीनेचा गुरू डोळ्यांची काळजी घ्या, असं सुचवत आहे. तृतीय स्थानात येणारा राहू मंगळ आणि भाग्यात केतू धार्मिक निष्ठा वाढवेल. बहीण भावामध्ये गैरसमज होऊ देऊ नका. पराक्रमात वाढ करेल. अमावस्या प्रकृती चिंतेची जाऊ शकते . मीन राशीत आलेला गुरू तेजस्वी व्यक्तिमत्व बहाल करेल. कुटुंब स्थानात राहु मंगळ प्रवेश करत आहे. कुटुंबात काही गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. अचानक कुठूनतरी धन प्राप्ती होईल. शनी मंगळ मित्रमंडळीपासून सावध राहण्याचे संकेत देत आहेत. संततीकडे लक्ष असू द्या. प्रवास योग येतील. सप्ताह मिश्र फळ देणारा ठरेल . शुभम भवतू !!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या