मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope : कसा जाणार तुमचा आठवडा; पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope : कसा जाणार तुमचा आठवडा; पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार तुचं साप्ताहिक राशीभविष्य.

या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार तुचं साप्ताहिक राशीभविष्य.

या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार तुचं साप्ताहिक राशीभविष्य.

आज दिनांक 17 जुलै 2022. वार रविवार. तिथी आषाढ कृष्ण पंचमी. या आठवड्यातील होणारे ग्रह गोचर म्हणजे दिनांक 17 रोजी रवी बुधाचा सकाळी कर्क राशीत प्रवेश. सूर्यासोबत बुधादित्य राजयोग करेल. गुरू मीन राशीत विराजमान असतील. मेष राशीत राहू आणि तूळ राशीत केतू गोचर झाले आहे. शनी मकर राशीत असून चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र मिथुन राशीत असेल. या ग्रहस्थितीनुसार पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. (लग्नानुसार)

मेष

राशीत प्रवेश केलेल्या राहूमुळे मेष व्यक्ती काहीसे अहंकारी होतील. मन विचलित राहिल. शिव आराधना करावी. दशम स्थानातील शनी कार्यक्षेत्रात अनेक संधी, उपलब्ध करून देण्यात मदत करतील. शुक्र उच्च फळ देईल. गुरू धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आणेल. सप्तम केतू जोडीदाराच्या प्रकृतीविषयी आशंका निर्माण करेल. परदेशसंबंधी कागदपत्र बनतील. एकूण आठवडा हा मीन चंद्र प्रवेशातून लाभ देणारा ठरेल.

वृषभ

राशीच्या व्यय स्थानात राहू आणि षष्ठ केतू आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल. तृतीय रवी बुध स्त्रीवर्गाकडून लाभ मिळवून देईल. भावंडांचे सुख मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी व्यक्ती त्रासदायक ठरू शकते. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. अधिकारी व्यक्तीची भेट होईल. सप्ताह उत्तम फळ देणारा ठरे .

मिथुन

सूर्य बुध भ्रमण धन स्थानात झाले आहे. अतिशय शुभ असा हा बदल आहे .पंचम केतू संततीसंबंधी वार्ता देईल. नवीन कला शिकण्याची इच्छा होईल. दशमातील गुरू परदेश प्रवास, धार्मिक आणि भाग्यकारक घटना घडवून आणेल. रवी-बुध अधिकार प्राप्ती करून देतील. फक्त सावध रहा. सप्ताह उत्तम जाईल.

कर्क

राशीत प्रवेश केलेले रवी-बुध कार्य स्थळ किंवा घरात बदल घडवून आणेल. एखादी नवीन व्यक्ती अडथळे आणेल. भाग्यातील गुरू शुभ असून वडिलांकडून लाभ देइल. प्रवास योग आनंद देतील.  शनी मकर राशीत निघाला आहे. वर्ष हे शुभ संकेत घेऊन येईल. जोडीदाराची काळजी घ्या. चंद्र भ्रमण घरामध्ये काही विशेष घटना घडवेल. सप्ताह शुभ.

सिंह

राशी स्वामी रवी बुधासोबत व्यय स्थानात असून राज योग होत आहे. आर्थिक लाभ होतील. पोटाचे त्रास होऊ शकतात. चंद्र भ्रमण शुभ असून जवळपास प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात काही बदल संभवतात. जोडीदाराला काही मोठे लाभ होऊ शकतात. लवकरच आयुष्यात बदल घडण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात काम करत रहाल. सप्ताह शुभ.

कन्या

हा सप्ताह सर्व दृष्टीने संथ आणि काही विशेष न घडता जाईल. रोजची काम कंटाळवाणी वाटतील. आर्थिकदृष्ट्या मात्र आठवडा चांगला जाईल. जवळपास फिरायला जाण्याचे योग येतील. संतती ही तुमची प्राथमिकता असेल. सप्तम गुरू तुम्हाला विवाह योग आणेल. चर्चा होईल. विजय तुमचाच होणार आहे. काळजी घ्या. सप्ताह अनुकूल.

तूळ

षष्ठ स्थानातील गुरू प्रवास, घरासाठी काही खर्च असा योग आणेल. अविवाहित व्यक्तींना आकर्षक व्यक्ती भेटेल. संतती सुख मिळेल. राशीतील केतू स्वभावात बदल घडवेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी घर आणि वाहन यासंबंधी नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक दृष्ट्या सप्ताह अनुकूल राहिल.

वृश्चिक

षष्ठ राहू आणि व्यय केतू गोचर परदेशसंबंधी घडामोडी घडतील. संतती सुख लाभेल. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने आता काळ बरा आहे. नवीन घर, वाहन यासंबंधी लवकर निर्णय घ्या. काहीही अनावश्यक खर्च करू नका. चंद्र भ्रमण पंचम स्थानात आहे. मुलांची काळजी घ्या. सप्ताह मध्यम.

धनु

या आठवड्यात गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल पण अनेक मार्गांनी पैसा येईल. चतुर्थ गुरू, अष्टम सूर्य बुध शुभ असून आर्थिक वाढ करतील. पराक्रम आणि चिकाटीने तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवाल. सप्ताहात अनेक शुभ फल मिळतील.

मकर

चतुर्थ स्थानात आलेला राहू हा स्थान परिवर्तन, घरामध्ये मोठे बदल करण्यासाठी अनुकूल आहे. रवी बुध नवीन अधिकारी व्यक्तीची भेट घडवेल. महत्त्वाचे फोन, निरोप येतील. वाणी तेजस्वी होईल. शनी प्रकोप आता काहीसा कमी होईल. आर्थिक लाभ, कुटुंबात वाढ संभवते. सप्ताह आनंदी जाईल.

कुंभ

तृतीय राहू आणि भाग्यात केतू तुम्हाला पराक्रमी बनवेल. भावंडांशी संबंध ताणले जातील. धार्मिक आस्था वाढतील. राशीचे धन स्थानातील गुरू स्वभावात सौम्यता आणील. षष्ठ स्थानात येणारा बुध काही घटनांचे संकेत देईल. आर्थिक लाभ होतील. प्रकृतीचे त्रास जाणवतील. जपून रहा. सप्ताह मिश्र फळ देईल.

मीन

राशी स्वामी गुरू उदित आहे. एकूण शरीर तेजस्वी होईल. सूर्य बुध डोळ्याची काळजी घ्या, अधिकारी व्यक्तींना नाराज करू नका असं सुचवत आहे. सध्याचा काळ हा बदलांचा आहे. कुठलेही निर्णय घाईने घेऊ नका. विशेषतः नोकरी संबंधी सावध रहा. आर्थिक स्थिती ठिक राहिल. एकूण सप्ताह मध्यम जाईल.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs