• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • दिवाळीनंतरचा पहिला आठवडा कसा जाईल; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य!

दिवाळीनंतरचा पहिला आठवडा कसा जाईल; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य!

आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 आज कार्तिक शुक्ल तृतीया. सूर्याचे भ्रमण विशाखा नक्षत्रातून होणार असून मंगळ अणि बुध सोबत तूला राशीत भ्रमण करणार आहे.

 • Share this:
  आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 आज कार्तिक शुक्ल तृतीया. सूर्याचे भ्रमण विशाखा नक्षत्रातून होणार असून मंगळ अणि बुध सोबत तूला राशीत भ्रमण करणार आहे. शुक्र धनु  तर गुरू अणि शनि मकर राशीत आहेत. राहू वृषभ तर केतू भ्रमण वृश्चिक राशीत होईल. पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी स्वामी मंगळ तुला ह्या शुक्राच्या राशीत शत्रू बुध अणि सूर्या सोबत आहे. थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील. पती पत्नी मध्ये जोरदार  मतभेद होतील. बोलण्यावर ताबा ठेवावा. सुरवातीला  चंद्र भ्रमण शुभ असुन वैचारिक बैठक ,भाग्य उत्तम राहील. उत्तरार्ध जरा जपून.  शुक्र भाग्योदय करणारा ठरेल. सप्ताह अनुकूल आहे. वृषभ राशी स्वामी शुक्र हा अष्टमात भ्रमण करीत आहे. अचानक मोठे आर्थिक लाभ संभवतात.  मात्र काळजीपूर्वक रहा. प्रगतीच्या नवीन संधी येतील. षष्ठ स्थान जागृत असून सर्दी, पडसे सतत राहील. सप्ताहाची सुरुवात मंद झाली तरी उत्तरार्ध अनुकूल राहील. मिथुन राशी स्वामी बुध हा तूला या शुक्राच्या राशीत मंगळ रवि सोबत पंचमात आहे. संतती संबंधी शुभ घटना घडतील. मात्र त्यांच्याशी वाद करू नका .शैक्षणिक क्षेत्रात भरघोस यश मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. भरपूर आनंद देणारा हा आठवडा आहे. प्रकृतीची कुरकुर सुरू राहील. जपून रहा. कर्क राशी स्वामी चंद्र हा सप्ताहाच्या सुरवातीला षष्ठ स्थानात असून प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मधुमेही व्यक्तीनी जपून राहावे. शत्रू वर नजर ठेवुन रहा. संतती संबंधी काही चिंता उत्पन्न होईल. मंगळ बुध रवि चतुर्थ स्थानात घरासंबंधी बोलणी वास्तु प्रवेश आदी घटना घडतील. गृह सजावट, उंची वस्तूची खरेदी असा हा शुभ सप्ताह आहे. सिंह तुमचा राशी स्वामी रवि तृतीय स्थानात मंगळ आणि बुध ग्रहांच्या सोबत आहे  अतिशय  तेजस्वी व्यक्तिमत्त्व असेल. वाणी आणि संभाषण चातुर्य कमालीचे वाढेल. प्रवास योग नक्की येतील. पंचमात शुक्र संतती साठी शुभ फळ देईल. गुरु शनि नोकरीत उत्तम संधी मिळवुन देणार आहेत. सप्ताहात चंद्र भ्रमण प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे. कन्या राशी स्वामी बुध तुला राशीत खर्चिक असतो. त्यात मंगळ अणि रवि सोबत आहेत. खर्च बेताने करा. गुरु कृपेचा लाभ घ्या. मुलांची काळजी करू नका. त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. घरात सौंदर्य पूर्ण सजावट कराल. मेजवानी आयोजित कराल. एकूण सप्ताहात प्रसन्न करणारे ग्रहमान आहे. तुला राशी स्वामी शुक्र धनु राशीत बहिण भावाशी संबंध सुधारण्यासाठी मदत करेल. कलाकारांना शुभ फळ देणारा ठरेल. कुठल्या तरी कलेमध्ये रुची वाढेल. प्रवास योग येतील. घरांमधे समारंभ होईल. राशीतील ग्रह स्वभाव जरा आक्रमक करतील. सप्ताहाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. वृश्चिक राशी स्वामी मंगळ तुला राशीत सूर्य बुधा सोबत व्यय स्थानात भ्रमण करीत आहे. खर्च  कायद्याची भीती, दंड, दवाखान्यात जाण्याची शक्यता असा हा सप्ताह आहे. मात्र शुक्राचे धन कुटुंब वाणी स्थानातील भ्रमण अतिशय शुभ असून आर्थिक स्थिती मजबूत होईल.  मेजवानी आयोजित कराल. एकूण पूर्वार्ध आर्थिक भरभराटीचा आहे. धनु राशी स्वामी गुरू अनेक आर्थिक लाभ मिळवुन देण्यास सज्ज आहे. कुटुंबात शुभ प्रसंगाची चाहुल लागेल. लाभ स्थान जागृत आहे. मित्र मैत्रिणींसोबत आनंदात वेळ घालवा  उत्तान लाभ मिळतील. राशीतील शुक्र उत्तम कपडे, दागिने यावर खर्च करेल. सप्ताहाची सुरवात शुभ असुन आनंदात वेळ जाईल. मकर राशी स्वामी शनि गुरू सोबत असुन वैचारिक बैठक मजबूत होईल. व्यय स्थानात शुक्र भरपूर खर्च करेल. दशमातील अनेक ग्रह ऑफिस मध्ये जास्तीचे काम,देईल. महत्त्वाचे निर्णय  होतील. तसेच घरातील अनेक कामात तुमची  साथ आवश्यक ठरेल. पूर्वार्ध फार अनुकूल नसून चन्द्र भ्रमण व्यय स्थानात आहे. खर्चात कपात करा. उत्तरार्ध अनुकूल. कुंभ राशी स्वामी शनि व्ययस्थानात गुरू सोबत असुन भाग्य स्थानातील ग्रह  प्रवासाचे योग आणतील. भावंडाची गाठभेट होईल. त्यांच्या सोबत वेळ आनंदात जाईल. लाभ स्थानातील शुक्र स्त्री वर्गाकडून लाभ मिळवून देईल.  व्यवसाय असणार्‍यांना आर्थिक लाभ संभवतात. उत्तरार्ध अनुकूल आहे. मीन राशी स्वामी गुरू लाभ स्थानात असून संतती संबंधी  शुभ समाचार मिळतील. ईश्वरी उपासना करावी. नोकरीमध्ये उत्तम संधी येतील. दशमातील शुक्र लाभ देणारा आहे. मात्र अष्टमात मंगळ प्रवास योग आणेल. जपुन रहा. प्रकृतीची काळजी घ्या  पूर्वार्ध अनुकूल आहे. शुभम भवतु!!
  Published by:Meenal Gangurde
  First published: