आज रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021. आज प्रबोधिनी एकादशी. कार्तिकी एकादशी. आज चंद्र 10 वाजेपर्यंत कुंभ राशीत असून त्यानंतर मीन राशीत प्रवेश करणार आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडी होतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुरु महाराज मकर या नीच राशीतून कुंभ राशीत 20 नोव्हेंबर रोजी प्रवेश करणार आहेत. तसेच 16 नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक या मंगळाच्या राशीत प्रवेश करणार आहे. बाकी शुक्र धनु, तर बुध मंगळ तुला राशीत आहेत. राहू वृषभ अणि केतू वृश्चिकेत आहे. शनि मकर राशीत असणार आहे. या आठवड्यात तुलसी विवाह असून त्रिपुरी पौर्णिमा 19 नोव्हेंबर रोजी असेल. चातुर्मास समाप्ती होईल. पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.
मेष
राशीच्या अष्टमात प्रवेश करणारा रवि केतू सोबत आरोग्य चिंता निर्माण करेल. विचार नकारात्मक आणि विरक्ती कडे झुकतील .अनाहूत चिंता, हुरहुर, प्राण्यां पासून भीती असा हा सप्ताह अतिशय काळजीपूर्वक राहण्याचा आहे. पूर्वार्ध व्यय चंद्र अणि अष्टमात रवि यातून त्रासदायक जाईल. जोडीदाराची चिंता वाटेल. शुक्राचे पाठबळ आहे. गुरु सुद्धा साथ देईल. कठीण समय लवकरच सरेल .पौर्णिमा अनुकूल. सप्ताहात मिश्र फळ मिळेल.
वृषभ
राशीच्या सप्तम स्थानात येणारा रवी केतू सोबत आहे. वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण करणार नाही ना इकडे लक्ष द्या. षष्ठ स्थानातील बुध मंगळ काही अॅलर्जी सदृश विकार निर्माण करतील. त्वचेचे विकार सुद्धा होऊ शकतात. अष्टमात शुक्र खर्चाचे प्रमाण वाढते ठेवेल. आर्थिक बाजु चांगली राहील. पौर्णिमा परदेश प्रवास, मौजमजा यासाठी अनुकूल. उत्तरार्ध चांगला जाईल.
मिथुन
हा सप्ताह मिथुन व्यक्तींना फारसा अनुकूल नाही. षष्ठ स्थानात येणारा रवि केतू रोग ,कर्ज ,शत्रू या बाबतीत काही घडामोडी करेल. अजूनही अष्टम शनीची चिंता आहेच. पण आता अनुकूल होणारा गुरू सर्व चिंता हरण करेल. सप्तम शुक्र वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण आणेल. रखडलेले व्यावसायिक निर्णय होतील. आर्थिक लाभ मिळेल. पौर्णिमा शुभ. सप्ताह मध्यम असेल.
कर्क
हा सप्ताह कर्क राशीच्या व्यक्ती साठी शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देणार आहे. आर्थिक स्थिती ठीक राहील. चतुर्थ स्थानात असलेले मंगळ बुध आईशी मतभेद निर्माण करतील. रक्तदाब असणार्यांनी सावध राहावे. पित्त प्रकृती वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. पंचमात येणारा रवि केतू संतती संबंधी समस्या निर्माण करेल. पौर्णिमा गृह सौख्याच्या पर्वाची. सप्ताह मिश्र फळ देईल.
सिंह
राशी स्वामी रवि केतू सोबत वृश्चिक राशीत येणार आहे. घर अणि कुटुंब याबाबत सावधगिरीचा इशारा आहे. काही कार्यालयीन घडामोडी होतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. संतती सुख चांगले राहील. पूर्वार्ध जरा त्रासाचा जाईल. पौर्णिमा शुभ असून प्रवास योग, गाठीभेटी होतील. सप्ताहात अनुकूल राहील.
कन्या
तृतीय स्थानात प्रवेश करणारा रवि धैर्य आणि पराक्रमाची वाढ करेल. अचानक आत्मविश्वास वाढेल. भावंडाची साथ लाभेल.मात्र त्याबाबत काही चिंता सतावू शकते. चतुर्थ स्थानात आलेला शुक्र गृह सौख्यात वाढ करेल. स्वभाव तेजस्वी होईल. राग मात्र आवरा. संतती चिंता आता कमी होईल.पौर्णिमा आर्थिक लाभाची. सप्ताह अनुकूल आहे.
तुला
राशीतील बुध मंगळ आणि वृश्चिक राशीत आलेला केतू रवि आर्थिक क्षेत्रात भरघोस मदत करतील. कुटुंब सुख लाभेल. थोडे कटू बोलणे टाळा. डोळ्याचे त्रास संभवतात .मात्र गुरू शनि मदत करतील. आईचे स्वास्थ्य जपा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अष्टमात राहू अजूनही सावधगिरीचा इशारा देत आहे. राशीतील पौर्णिमा लाभाची.
वृश्चिक
16 तारखेला राशीत येणारा रवि केतू अनिश्चित वातावरण निर्माण करेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुक्र कुटुंबात प्रवास योग , आनंदाचे क्षण आणेल. कुठूनतरी अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्य घडेल .अनेक मोठ्या व्यक्ती भेटतील. व्ययस्थ मंगळ बुध कायदा पाळा, प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे. पौर्णिमा खर्चाची.
धनु
राशीतील शुक्र सौंदर्य बहाल करेल तर व्यय स्थानात प्रवेश करणारा रवि केतू आरोग्य समस्या निर्माण करेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख भरपूर लाभेल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा. गुरु कृपेचा लाभ होईल. पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर काही लाभ होतील. सप्ताह मिश्र फळ देणारा ठरेल.
मकर
राशीत भ्रमण करीत असलेला गुरू आता स्थानाबदल करेल. दशमातील मंगळ बुध रवि काही महत्त्वाचा बदल, नवीन संधी
कार्यक्षेत्रात मिळवुन देतील. तुमचे महत्त्व वाढेल. रवि लाभ स्थानात गेल्यावर त्याचे लाभ मिळतील. मन स्थि…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.