मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope: सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश; ग्रहस्थितीनुसार तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope: सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश; ग्रहस्थितीनुसार तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope: सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश; ग्रहस्थितीनुसार तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope: सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश; ग्रहस्थितीनुसार तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope: या सप्ताहात होणारे महत्वाचे ग्रह गोचर म्हणजे बुध वृश्चिक राशीत असून सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश झाला आहे. मंगळ मिथुन राशीत वक्री असून शनि मकर राशीत उच्च अवस्थेत असेल. या ग्रह स्थितीनुसार पाहूया बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक २० नोव्हेंबर २०२२,वार रविवार. या सप्ताहात होणारे महत्वाचे ग्रह गोचर म्हणजे बुध वृश्चिक राशीत असून सूर्याचा अनुराधा नक्षत्रात प्रवेश झाला आहे. मंगळ मिथुन राशीत वक्री असून शनि मकर राशीत उच्च अवस्थेत असेल. शुक्र वृश्चिक तर राहू मेष व केतू तुला राशीत आहे. आहेत. गुरू मीन राशीत असून दिनांक २३ रोजी मार्गी होईल . याच दिवशी कार्तिक अमावस्या असून चंद्राचे भ्रमण सप्ताहाच्या सुरवातीला कन्या राशीतून असेल. उत्तरार्ध वृश्चिक राशी साठी महत्वाचा असून चतुर्ग्रही योग बनेल. या ग्रह स्थितीनुसार पाहूया बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य.

मेष

राशीच्या तृतीय स्थानात राशी स्वामी मंगळ वक्री आहे .सामाजिक बंधन पाळा असे संकेत देत आहे. परदेश गमन,प्रवास सन्मान मिळेल. पराक्रमात वाढ होईल .तुमच्या हाताने काही भरीव कामगिरी होईल. राशीच्या षष्ठात चंद्र सुरवातीला अनुकूल नाही. रवि बुध शुक्र अष्टम स्थानात प्रकृतीची काळजी घ्या असे सुचवीत आहे .व्यवसाय, जोडीदाराला शुभ काळ. मार्गी गुरू परदेश संबंधी लाभ दायक घटना घडवील. स्त्रीवर्गाची मदत मिळेल. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. सप्ताह अनुकूल.

वृषभ

व्यय राहू आणि सप्ताहाच्या सुरवातीला पंचम स्थानात असणारा चंद्र संतती सुख, प्रवास योग दर्शवित आहे. लाभ स्थानातील मार्गी गुरू कार्यक्षेत्रात लाभ मिळवून देईल . संतती प्राप्तीचे मार्ग सुकर होतील. अधिकारी व्यक्तींची गाठभेट होईल. लेखक पत्रकार व्यक्तींना उत्तम काळ आहे .भाग्य साथ देईल. सुर्य आणि शुक्र एकत्र आहेत . वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रवास कराल. सप्ताह चांगला.

मिथुन

ग्रह संकेत ओळखून अनावश्यक धाडस टाळा. कार्यक्षेत्रात मंगळ शुभ समाचार देईल . मार्गी शनि अष्टम स्थानात आहे शनि माहात्म्य किंवा सुंदरकांड वाचणे योग्य असेल. दशम स्थानातील मार्गी गुरू अधिकारी व्यक्तीकडून लाभ मिळवून देईल. कला क्षेत्रात चांगली कामगिरी कराल.व्यय राहू परदेश संबंधी शुभ समाचार देईल.सप्ताह उत्तम फळ देईल.

कर्क

सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण चर्चेत असाल. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी डगमगू नका. व्यय मंगळ असून सध्याचा काळ हा आपला नाही. आहे ते टिकवून ठेवण्याची गरज आहे. जोडीदार जरा आक्रमक होण्याची शक्यता आहे. राशीतील ग्रह व्यवसाय वृद्धी करतील. संतती सुख मिळेल .सप्ताह एकूण मध्यम आहे.

सिंह

सप्ताहाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे

चंद्र कन्या राशीतून भाग्यकरक घटनांची

सुरवाीपासूनच चाहूल देईल. वैवाहिक जीवनासाठी महत्वाचा आठवडा आहे.

अधिकरप्राप्ती होईल. व्यवसायात उत्तम संधी मिळेल .शत्रू पराजित होतील. बदल घडून येणार आहे. चतुर्थातील ग्रह घर वाहन सुख देतील.अष्टम गुरू सावध गिरी बाळगा असा इशारा देत आहे आनंदात दिवस घालवा.

कन्या

सप्तम स्थानातील मार्गी गुरू विवाहा साठी शुभ असून नवीन प्रस्ताव येतील. संतान चिंता दूर होईल .धार्मिक बाबतीत शुभ फळ मिळणार असून आर्थिक लाभ होतील. व्यवसाय धंद्यासाठी अनुकूल घटना घडतील. तृतीय शुक्र आर्थिक भरभराट होईल. भाग्य आणि धर्म दोन्ही क्षेत्र शुभ फळ देतील . उत्तरार्ध शुभ जाईल.

तुला

चंद्राचे भ्रमण व्यय व राशी स्थानातून होत आहे .गृह क्षेत्रात नवी जबाबदारी घ्यावी लागेल .काही कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक दृष्ट्या हा सप्ताह अतिशय खर्चिक ठरेल.पण प्रप्ती देखील होईल. अमावस्येच्या आसपास प्रकृतीची काळजी घ्या. भाग्यातील मंगळ प्रवास योग आणेल. संततीला भरघोस यश मिळेल.नोकरी मध्ये शुभ वार्ता कानी पडतील.आठवडा शुभ आहे.

वृश्चिक

शनि भावंडांशी काही तणाव निर्माण करील.मात्र फारशी हानी न करता त्यातून मार्ग काढतील. घर आणि वाहन घेण्या संबंधी हालचाल कराल. त्यात नक्की यश मिळेल. प्रकृती जपणे गरजेचे आहे. मनाला आनंद मिळेल अश्या घटना घडतील .राशीतील अमावस्या जपून राहण्याचे संकेत देत आहे. जोडीदाराला अधिकार प्राप्ती होईल.संतती प्राप्ती साठी अनुकूल काळ.आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. योग आणि व्यायाम करा. सप्ताह मिश्र फळ देईल.

धनु

आर्थिक ताणतणाव ,कौटुंबिक अडचणी याने त्रस्त व्हाल. प्रवास आणि त्यातून होणारे नुकसान देणारा आठवडा आहे . बंधू भेट संभवते. चतुर्थ स्थानात मार्गी गुरू घरा बाबत शुभ फळ देईल. वैवाहिक जीवनात कुरबुरी असतील. संततीच्या सुखाची कामना कराल. वाहन योग येतील . शत्रू पराजित होतील. आठवडा फलदायी ठरेल.

मकर

राशीत मार्गी शनि ताण निर्माण करेल. शनि मंगळ षडाष्टक योगाचे प्रभाव दिसून येतील. मार्गी गुरू आकस्मिक फळ देण्यास तयार आहे. बंधू भगिनी साठी उत्तम काळ. परदेश गमन संबंधी काही निर्णय घ्याल. प्रवास योग येतील. शुक्र बुध रवि कुटुंबात वाढ करेल. सप्ताह आनंदात घालवा.

कुंभ

व्यय स्थानात आलेला मार्गी शनि कुंभ व्यक्तीसाठी मोठ्या खर्चाची बातमी घेऊन येईल. मात्र मार्गी गुरू पैतृक संपत्ती मिळवुन देईल .कौटुंबिक समारंभ ठरतील. गुरू महाराज ते पार पडण्यास मदत करतील. तुमच्या साठी वेळ कायदा सुव्यवस्था राखण्याची आहे. कुठल्याही प्रकारचे आर्थिक देणेघेणे टाळा. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. सप्ताह शुभ आहे.

मीन

सप्ताहाची सुरवात गुरूच्या मार्गी झाल्यामुळे अत्यंत शुभ होईल .शनि परदेश गमनाचे मार्ग मोकळे करील. लाभ दायक काळ असून सर्व मार्गांनी सावध राहून व्यवहार करा. .धार्मिक बाबीत खर्च होईल. भाग्यातील चतुर्ग्रही योग शुभ फल देईल. संतती आणि विवाह यासाठी उत्तम काळ सुरू होत आहे सप्ताह मिश्र फळ देईल .

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya