मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशीभविष्य: मेषेसाठी आठवडा स्फोटक, सिंह, तूळच्या व्यक्तींनी गैरसमज टाळावेत

साप्ताहिक राशीभविष्य: मेषेसाठी आठवडा स्फोटक, सिंह, तूळच्या व्यक्तींनी गैरसमज टाळावेत

कारण शनिदेव कठोर परिश्रम करणार्‍यांवर लक्ष ठेवतात. तथापि, प्रेम आणि जीवनात अडचणी येऊ शकतात.

कारण शनिदेव कठोर परिश्रम करणार्‍यांवर लक्ष ठेवतात. तथापि, प्रेम आणि जीवनात अडचणी येऊ शकतात.

संकष्टी चतुर्थीपासून सुरू होणारा हा आठवडा तुम्हाला कसा जाईल? वाचा साप्ताहिक राशीभविष्य...

राआज रविवार दिनांक 24 ऑक्टोबर 2021. तिथी चतुर्थी. या आठवड्याच्या सुरवातीला  चंद्र मिथुन राशीत असेल. सूर्य मंगळ तुला राशीत, शनी गुरू मकर राशीत राहू वृषभ राशीत  अणि शुक्र केतू वृश्चिक राशीतून भ्रमण करतील. बुध कन्या राशीत असेल. पाहूया साप्ताहिक राशी भविष्य.

मेष

राशीच्या सप्तम स्थानात मंगळ रवि  आणि अष्टमात शुक्र केतू ही ग्रहस्थिती काहीशी स्फोटक होऊ शकते. डोकं शांत ठेवा. उष्णता वाढेल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही कारणाने भावंड नाराज होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. भेटवस्तू मिळतील. सप्ताहाच्या पूर्वार्धात प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने नाव मिळवाल. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. सप्ताह सुखद अनुभव देईल.

वृषभ

सप्ताहाच्या  सुरवातीला भरघोस आर्थिक  लाभ  होतील मिथुन चंद्र सर्व कौटुंबिक सुखे बहाल  करेल. षष्ठ मंगळ  रवि  थोडी रागीट प्रवृत्ती देईल. मामा  मावशी कडे भेट द्याल. नोकरीत उत्तम संधी मिळतील. जोडीदाराची साथ लाभेल. छान खरेदी कराल. सप्ताहात अनुकूल आहे.

मिथुन

सप्ताहाची सुरवात राशीत चंद्र भ्रमण होईल. बुध चंद्र  केंद्र योग व्यवसाय पूरक आहे.तसेच चंद्र मंगळ नव पंचम योग होईल. उत्तम आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख लाभेल. शुभ कार्य घडतील. आत्मविश्वास वाढेल. अष्टमात शनी गुरू  प्रगतीचा वेग  मंद ठेवतील. प्रकृतीची काळजी घ्या. मधुमेही लोकानी जपा. काहींना अस्वस्थता वाटेल. गुरु उपासना करावी.

कर्क

सप्ताहाची सुरवात ही जास्तीचे खर्च  दगदग, थकवा याने होईल. चतुर्थातील रवि मंगळ घरा संबंधी काही घडामोडी दाखवत आहेत. नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी होईल. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. गुरु शनि जोडीदाराला दीर्घ फळ देतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. तुमच्या साठी धार्मिक कार्य घडविणारा सप्ताह आहे .

सिंह

राशीच्या तृतीय स्थानात आलेले  रवि मंगळ  प्रवासाचे योग आणतील. भावंडाची गाठभेट होईल  काही संवादातून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक नियोजन, कौटुंबिक जबाबदारी, नीट पार पडेल. घरांमधे सुंदर वस्तूंची खरेदी होईल. नोकरीत उत्तम संधी मिळतील. व्यवसाय उद्योगात काही नवीन बदल घडतील. सप्ताह अनुकूल.

कन्या

दशमातील चंद्र भ्रमण सुरवातीला कामकाजाचा वेग वाढवेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या  कला प्रकारात रुची वाढेल. घरांमधे छान बदल कराल . दिवाळीची तयारी करताना प्रकृती जपा. मुलांकडे दुर्लक्ष करू नका.  राशीतील बुध उत्तम मार्ग  सुचवेल. बुद्धी चा उत्तम वापर कराल. खर्च बेताने करा. मिश्र फळ देणारा  सप्ताह  आहे .

तुला

राशीतील मंगळ सूर्य अणि व्यय स्थानातील बुध काहीशी विचित्र परिस्थिती निर्माण करतील. बुद्धी अणि विचार  नकारात्मक आणि संतापी होतील. शांत राहण्याचा प्रयत्‍न करा. कुटुंबासाठी खूप खर्च होईल. जोडीदाराला नाराज करू नका. गैरसमज निर्माण होतील. घरा साठी खरेदी कराल. पूर्वार्ध अनुकूल  आहे.

वृश्चिक

राशीतील शुक्र हातून काही सुंदर निर्मिती  करेल. खर्चिक आणि चैनी कडे कल होईल .धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. मात्र व्यय स्थानात मंगळ रवि  कायद्याची भीती  निर्माण करत आहेत. अनावश्यक खर्च टाळा. कुठल्याही  भानगडीत अडकू नका. प्रकृतीची कुरकुर सुरू राहील. मध्यम फल देणारा सप्ताह आहे.

धनु

सप्ताहात सुरवातीला  जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. खरेदीसाठी पैसा खर्च होईल. मात्र त्यात आनंद असेल. कौटुंबिक सुख लाभेल. थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील. शुक्र बुध व्यवसाय पूरक आहेत. आर्थिक दृष्ट्या लाभ होतील. नोकरीत शुभ समाचार मिळतील. ईश्वरी कृपा राहील. सप्ताह शुभ आहे.

मकर

राशीतील गुरू  मार्गी अवस्थेत असून एक वैचारिक प्रगल्भता देत आहे. नकारात्मक मानसिकता न होऊ देता या सप्ताहात  होणारा मंगळ सूर्य योग कार्यक्षेत्रातील प्रगती वाढवणारा ठरेल. अधिकार वाढेल. तसेच काम ही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. भाग्यात उच्चीचा बुध धार्मिक स्थळी यात्रा घडेल. मिश्र सप्ताह आहे.

कुंभ

व्यय स्थानातील गुरू शनि  तसेच भाग्य स्थानात सूर्य अध्यात्मिक  साधना  करण्यासाठी फार शुभ  ग्रहस्थिती आहे. कार्य क्षेत्रात काही नवीन घटना घडतील. लाभदायक फळे मिळतील. नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल  परदेश संबंधी  निर्णय होईल. स्त्री वर्ग सहकार्य करणार आहे. संतती संबंधी शुभ समाचार मिळतील. प्रवास योग आहेत. पूर्वार्ध अनुकूल.

मीन

अष्टमस्थ ग्रह काही विचित्र दुखणी मागे लागतील. घरा संबंधी बोलणी सुरू होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. शुक्र उत्तम लाभ देण्यास  सज्ज आहे. मुले तुम्हाला कामाला लावतील. सतत बदल अणि अस्थिरता असा हा सप्ताह आहे. ताण घेऊ नका. गुरूची उपासना करावी. शुभम  भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya