मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशीभविष्य: महत्त्वाचं राशीपरिवर्तन अनेकांना देणार शुभ फळ, वाचा तुमचा आठवडा कसा जाईल

साप्ताहिक राशीभविष्य: महत्त्वाचं राशीपरिवर्तन अनेकांना देणार शुभ फळ, वाचा तुमचा आठवडा कसा जाईल

आज होणारे महत्त्वाचे  राशी परिवर्तन म्हणजे वृश्चिक राशीत मंगळाचा प्रवेश.जो पंच महा पुरुष योगापैकी रुचक योगाचे निर्माण करेल. त्याचा तुमच्या राशीवर कसा आणि काय होणार परिणाम?

आज होणारे महत्त्वाचे राशी परिवर्तन म्हणजे वृश्चिक राशीत मंगळाचा प्रवेश.जो पंच महा पुरुष योगापैकी रुचक योगाचे निर्माण करेल. त्याचा तुमच्या राशीवर कसा आणि काय होणार परिणाम?

आज होणारे महत्त्वाचे राशी परिवर्तन म्हणजे वृश्चिक राशीत मंगळाचा प्रवेश.जो पंच महा पुरुष योगापैकी रुचक योगाचे निर्माण करेल. त्याचा तुमच्या राशीवर कसा आणि काय होणार परिणाम?

आज दिनांक 5 डिसेंबर 2021 तिथी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा. श्री दत्त गुरूंच्या जन्माचा हा पवित्र महिना सर्वाना शुभत्व  प्रदान करो  ही सदिच्छा. आज होणारे महत्त्वाचे  राशी परिवर्तन म्हणजे वृश्चिक राशीत मंगळाचा प्रवेश.जो पंच महा पुरुष योगापैकी रुचक योगाचे निर्माण करेल. राशीत मंगळ उच्चीचा होणार आहे. अणि अनेक राशींना शुभ फळ देईल. या आठवड्याच्या उत्तरार्धात शुक्र आणि बुधाचे राशी परिवर्तन होईल.  दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजून 31 मिनिटांनी शुक्र आपली मित्र राशी मकर  तर बुध 10 डिसेंबरला सकाळी 6 वाजून 14 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. सूर्य मंगळ केतू बुध वृश्चिकेत तर गुरू कुंभ राशीत असेल. शनि मकर तर राहू वृषभ राशीत असणार आहेत. या ग्रह स्थिती नुसार पाहूया या सप्ताहात काय घडणार आहे ते. (लग्ना नुसार)

मेष

राशी स्वामी मंगळ अष्टमात प्रवेश करणार आहे. सावधगिरीचा इशारा आहे. सूर्य मंगळ केतू ही ग्रहस्थिती अचानक येणारे प्रश्न, आत्यंतिक उष्ण प्रकृती, त्यामुळे होणारे आजार, वाहन चालवताना होणारे  छोटे मोठे  अपघात  इत्यादी दर्शवत आहे.  लांबचे प्रवास योग येतील. जपून रहा. खर्च वाढेल. मात्र गुरू कृपा आहे  तसेच शुक्र ही शुभ फळ देणारा असून आर्थिक बळ राहील. दशमातील शनि कार्य क्षेत्रात प्रगती सुरू राहील. पूर्वार्ध अनुकूल आहे. कौटुंबिक आणि आर्थिक सुख मिळणार आहे. या महिन्यात केलेली दत्त गुरूंची उपासना फलदायी ठरेल.

वृषभ

राशी स्वामी शुक्र भाग्य स्थानात प्रवेश करणार आहे.अतिशय शुभ आठवडा आहे. खूप खरेदी, उंची वस्त्रे, दागिने यावर खर्च होणार आहे. प्रवास, कौटुंबिक समारंभ होतील. तुम्ही सर्वात जास्त लक्ष वेधून घेणार आहात. प्रसिद्धी मिळेल. सप्तम स्थानात मंगळ, जोडीदाराची काळजी घ्यावी लागेल. इतरांशी संबंध सुधारतील.पण व्यावसायिक निर्णय सांभाळून घ्या. मतभेद होण्याची शक्यता आहे. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा आठवडा, एकुण उत्तम जाईल.

मिथुन

राशी स्वामी बुध  आता पुढील राशीत जाण्यास सज्ज आहे. द्विधा मनस्थितीत राहाल. सप्तम स्थानात बुध राश्यांतर जोडीदाराला शुभ राहील. षष्ठ स्थानात होणारे ग्रह आधिक्य प्रकृतीची काळजी घ्यावी असे सुचवत आहे. कोणाशीही वाद करू नका. आर्थिक व्यवहार जपून करा. परदेश प्रवास योग येतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. अजूनही व्यय राहू आणि अष्टम शनीची चिंता आहेच. मात्र गुरू सांभाळून घेण्यास तत्पर आहेत. गुरूची उपासना करावी.

कर्क

राशी स्वामी चंद्र सप्ताहाच्या सुरवातीला फारसा अनुकूल नाही. तसेच आठवा गुरू, चतुर्थात प्रवेश केलेला  मंगळ ही ग्रहस्थिती काळजी घ्यावी असे संकेत देत आहे.  गृह चिंता सतावू शकते. सप्तम स्थानात शनि देखील  जोडीदाराला  शुभ नाही. प्रकृती जपा. पोटाचे विकार त्रास देतील. नोकरीमध्ये नवीन संधी येतील. पण फारसे  काही घडणार नाही. सप्तम स्थानात येणारा शुक्र मात्र  काही तरी  विशेष  संधी, खास व्यक्तीची भेट घडवून आणेल. विवाहासाठी उत्तम स्थळ येईल. निर्णय घेतलात तर नजीकच्या काळात शुभ मंगल होईल. मिश्र फळ देणारा सप्ताह आहे.

सिंह

राशी स्वामी रवि चतुर्थ स्थानात वास्तु संबंधी निर्णय घेण्यास मदत करेल. नवीन घर, किंवा सजावट करायची असेल तर शुभ काळ. तिथेच असलेले मंगळ बुध आदी ग्रह त्याला हातभार लावतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. मधुमेही व्यक्तीनी जपून राहावे  ताण जाणवत असेल तर उपाय करावे. अविवाहित व्यक्तींना उत्तम काळ असून प्रयत्‍न सुरू ठेवले तर उत्तम जोडीदार मिळेल. गुरु उपासना करावी.

कन्या

राशी स्वामी बुध हा उत्तरार्धात चतुर्थ स्थानात प्रवेश करणार आहे. सध्या मंगळ सूर्य  बुध तृतीय स्थानात आहेत वाणी मध्ये माधुर्य येईल. जनसंपर्क वाढेल. भावंडाची भरभराट होईल.

घरांमधे काही सुंदर खरेदी, सजावट करता येईल.आर्थिक स्थिती उत्तम राहील. गृहसौख्य उत्तम राहील. उत्तरार्ध अनुकूल नाही. मानसिक आरोग्य जपा. संतती  चिंता सतावू शकते. अस्वस्थता वाटेल. गुरु उपासना करावी. सप्ताह अनुकूल आहे.

तुला

राशी स्वामी शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे. चतुर्थ स्थानातील शनि सोबत  मकर राशीत येणारा शुक्र शुभ फळ देणारा ठरेल. घरांमधे मंगल कार्य, खरेदी, समारंभाचे आयोजन असा हा सप्ताह आहे. मात्र कुटुंब वाणी स्थानात मंगळ सूर्य , उग्र स्वभाव होईल .वाणी कठोर होईल .कोणाला दुखावून चालणार नाही. आर्थिक बाजू डळमळीत होईल. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. आई वडीलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. संतती सुख उत्तम राहील. नवीन जोडप्यांना  संतान प्राप्तीचे योग आहेत .शुभ आठवडा.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ स्वराशीत येत आहे. स्वभावधर्म तेजस्वी, कर्म करणारा ,अधिकार युक्त असा होणार आहे. काही मोठी काम तुमच्या हाताने होणार आहेत. राहू व्यवसाय पूरक आहे.फक्त थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. आरोग्य ठीक राहील. उष्णतेच्या विकाराने त्रास होण्याचे संकेत आहेत. शुक्राचा शुभ प्रभाव वाढेल. बहिण भावंडांच्या आयुष्यात शुभ घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. कार्य सिद्धी होईल. शुभ आठवडा.

धनु

राशी स्वामी गुरू  कुंभ राशीत भावंडांची भरभराट करणार आहे. व्यय स्थानातील ग्रह नुकसान, आजार यापासून जपा असे सुचवत आहेत. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. उष्णतेचे विकार त्रास देतील. मात्र परदेश प्रवास संबंधी निर्णय होईल. धन आगमन होईल. शुक्र उत्तम फळ देईल. उंची वस्त्र. दागिने, वस्तू खरेदी होतील. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. पूर्वार्ध अनुकूल आहे.

मकर

राशी स्वामी शनि स्वराशीत तर धन कुटुंब वाणी स्थानात गुरू शुभ फळ देणार आहेत. ओजस्वी वाणी, आर्थिक सुयश, कौटुंबिक सौख्याच्या पर्वाची सुरवात झाली आहे. व्यय स्थानात  शुक्र आता परिवर्तन करेल आणि उच्च फळ देईल. अकस्मात लाभ होतील. मित्र मैत्रिणींना भरपूर वेळ द्याल. जुने मित्र भेटतील. आईशी मतभेद टाळा. संतती सुख चांगले राहील. गुरु कृपा आहेच. मात्र उपासना करावी.

कुंभ

व्यय स्थानात राशी स्वामी शनि साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात आहात. जपून रहा. राशीतील गुरू सहकार्य करणार आहे. दशमातील मंगळ शुभ संकेत देत आहे. जास्तीची जबाबदारी येईल. गृहसौख्य राहील पण वाद टाळा. आई वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पुढे येणार्‍या मोठ्या खर्चाची तरतूद करून ठेवा. अर्थात शुक्राचा मकर राशीत प्रवेश परदेश प्रवास संबंधी निर्णय करेल. सप्ताहात शुभ फळ मिळेल.

मीन

राशी स्वामी गुरू जरी व्यय स्थानात असला तरी तो शुभ फळ देईल. घरांमधे मंगळ कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. पराक्रमाची वाढ होईल. भाग्य स्थानातील ग्रह अनेक मार्गानी शुभफल देतील. घरत होणारे  धार्मिक समारंभ आनंद देतील. प्रकृती ठीक राहील. आर्थिक बाजु चांगली आहे. लाभ स्थानात येणारा शुक्र संतती संबंधी आनंदाची बातमी आणेल. रखडलेले काम मार्गी लागेल  गुरू चा जप व दान करणे योग्य राहील.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya