Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य : या आठवड्यात ग्रहांची स्थिती बदलणार; कोणत्या राशीवर काय होणार परिणाम?

साप्ताहिक राशीभविष्य : या आठवड्यात ग्रहांची स्थिती बदलणार; कोणत्या राशीवर काय होणार परिणाम?

Weekly Horoscope : या आठवड्यात महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा तुमच्या राशींवर काय आणि कसा परिणाम होणार?

आज रविवार दिनांक 3 ऑक्टोबर, 2021 द्वादशी श्राद्ध. चंद्र आज सिंह राशीत असून रवी कन्या राशीत असेल. या आठवड्यातील महत्त्वाचे बदल म्हणजे बुध वक्री अवस्थेत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तो सूर्यासोबत राजयोग करत असून गुरू आणि शनि मकर राशीत आहेत. कन्या राशीत दिनांक 5 आणि 6 रोजी चार ग्रह एकत्र येणार आहेत. हा एक महत्त्वाचा योग असून 6 तारखेला सर्वपित्री अमावास्या आहे. आज आपण जाणून घेऊया पितृ दोष आणि त्याचे उपाय  याबद्दल. पितृदोष आणि त्याचे उपाय अनेक लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतो. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. आपल्या घराण्यात अवेळी झालेले अपमृत्यू , पूर्वजांचे वाईट कर्म, सर्प दोष. ब्राह्मण हत्या इत्यादी कारणांमुळे हा दोष निर्माण होतो. पत्रिकेत विशिष्ट स्थानी म्हणजे लग्न, द्वितीय, पंचम, नवम स्थानात राहू, केतू, चंद्र राहू, सूर्य राहू असे ग्रह योग पाप ग्रहांनी दृष्ट असतील तर पितृदोष निर्माण होतो. त्यामुळे अपंगत्व, आजारपण, कर्ज, लग्न न जमणं, संतान न होणं, पती पत्नी विभक्त होणं, मतीमंदत्व, गृहकलह, अकस्मात वाईट घटना घडणं असं परिणाम दिसून येतात. जाणकार व्यक्तीकडून त्याचं परिमार्जन करून घ्यावं. हे दोष मुख्यत्वे राहू केतूमुळे येतात. तेव्हा शिवाची आराधना करणं फायद्याचं ठरतं. तसंच पूर्वजांचे श्राद्ध कर्म करणं, दर्श अमावास्या दिवशी नियमित शिधा दान करणं, ब्राह्मण भोजन किंवा पांढरे वस्त्र दान करणं तसंच घरातील वातावरण शुचिर्भूत ठेवणं, घरात धूप जाळणं, आचरण शुद्ध ठेवणं असे उपाय नित्य आणि सातत्याने केल्याने त्याचे परिणाम कालांतराने कमी होऊ शकतात. कुल दैवतांची उपासना करणंही गरजेचं असतं. अमावास्या चार वाजून तीस मिनिटांनी संपत आहे, तेव्हा सर्वानी त्याआधी श्राद्ध कर्म, पान वाढणं इत्यादी उरकून घ्यावं. सर्वाना हा काळ सुसह्य जावो हीच प्रार्थना. पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य. मेष राशीच्या अष्टमात होणारी शुक्र केतू युती आरोग्याची काळजी घ्या असं सुचवित आहे. षष्ठ स्थानात कन्या राशीत रवी बुध शुभ फळ देतील. शत्रू पराजित होतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. वरिष्ठ खुश होतील. मातृ पक्ष  मदत करेल. अमावस्येच्या सुमारास प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार होऊ शकतात. संततीसंबंधी थोडी चिंता वाटेल. गुरू कृपा राहिल. आर्थिक बाजू चांगली राहिल. सप्ताहात मिश्र फळ मिळेल. वृषभ राशी स्वामी शुक्र सप्ताहात सुरुवातीला प्रसन्न करणार आहे. वृश्चिक राशीत जोडीदाराला उत्तम फळ देईल. अकस्मात विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील. संततीसाठी थोडा कठीण काळ आहे. कुटुंबातील व्यक्तीची काळजी घ्या. भाग्य स्थानातील गुरू धार्मिक प्रवृत्ती वाढवेल. लांबचे प्रवास योग आणेल. सप्ताह अनुकूल. मिथुन आज राशी स्वामी बुध स्वराशीत प्रवेश करत आहे. घराचे योग येतील. नवीन आकर्षक खरेदी कराल. षष्ठ स्थानात शुक्र केतू प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. मधुमेही व्यक्तींनी जपून राहावं. शत्रूवर विजय मिळेल. अष्टमात शनि मार्गी होत आहे. कठीण काळ आता लवकरच संपेल. अमावास्या गृह कलहाची. दान करा. कर्क राशी स्वामी चंद्र प्रवास योग आणेल. मात्र मंगळ सूर्य तृतीय स्थानात, नको ते धाडस करू नका. जोडीदाराकडून लाभ होईल. भावंडाची गाठभेट घडेल. कौटुंबिक जीवनात, संततीकडून आनंदाचं वर्तमान  मिळेल. ग्रह मिश्र फळ देतील. प्रवासात नुकसान संभवतं. अमावास्या काळात भावंडांची चिंता वाटेल. शिधा दान करावं . सिंह या सप्ताहात धन स्थानातील ग्रहाधिक्य आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग खुले करेल. कौटुंबिक पातळीवर तुम्ही आग्रही राहाल. नावलौकिक होईल. धार्मिक कार्य घडेल. कर्ज किंवा पैशांची देवाणघेवाण जरा जपून करा. घरासाठी उंची वस्तू खरेदी कराल. नोकरीसाठी प्रयत्‍न केला तर यश मिळवून देणारा आठवडा आहे. दान करा. कन्या राशीत होणारी अमावास्या विचित्र मानसिक चिंता, हूरहूर लावेल. स्वतःची प्रकृती जपा. तसंच जोडीदाराची काळजी घ्या. गुरू कृपा सर्व चिंता निवारण करेल. पोटासंबंधी विकार त्रास देतील. कलाकारांना शुभ फळ देणारा सप्ताह आहे. वस्त्र आणि अन्न दान करा. तुला व्यय स्थानात चार ग्रह आणि धन स्थानात शुक्र अशी ग्रह स्थिती जेवढे मिळेल त्याच्या दुप्पट खर्च होईल असे सुचवत आहे. परदेश प्रवास योग येतील किंवा त्यासंबंधी बोलणी सुरू होतील. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. अमावास्या काळात ईश्वरी उपासना करा. वृश्चिक राशीतील शुक्र आणि लाभ स्थानात बुध स्त्री वर्गाकडून फायदा दर्शवत आहे. चेहर्‍यावर तेज आकर्षक व्यक्तिमत्त्व प्राप्त होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. लांबचे प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धीचा वापर करून प्रश्न सुटणार आहे. अमावास्या संतती चिंतेची. जप, दान करा. धनु कार्यक्षेत्रात अचानक काही विचित्र घडामोडी होतील. कान आणि डोळे उघडे ठेवा. कोणी तुमच्या विरोधी कारवाया करत आहे का याकडे लक्ष द्या. आर्थिक बाजू चांगली राहील. व्यय स्थानात येणारा शुक्र चैनीसाठी खर्च वाढवेल. प्रकृती बरी राहील. सप्ताह बरा जाईल . मकर राशीतील शनि आता मार्गी अवस्थेत येत आहे. शुभ घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. भाग्य स्थानात चार ग्रहांची उपस्थिती नवीन संधी मिळवून देईल. धार्मिक निष्ठा वाढेल. भाग्यात सूर्य मंगळ अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. अमावास्या काळात ईश्वरी उपासना करावी. कुंभ येणारा आठवडा  प्रकृतीची अत्यंत काळजी घ्यावी लागेल असं सुचवतो आहे. अष्टमात होणारी चतुर्ग्रही घातक सिद्ध होऊ शकते. प्रवास, दगदग टाळा. कोणाशी शाब्दिक वाद नको. मात्र व्यवसाय पूरक आठवडा आहे. काही प्रमाणात मानसिक ताण होईल. काळजी घ्या. अन्नदान करा. मीन जोडीदाराला फारसा अनुकूल सप्ताह नाही. काळजी घ्या. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश प्राप्तीचे योग आहेत. राहू  पराक्रमात वाढ करेल. धार्मिक कार्य ठरेल. भाग्यात येणारा शुक्र शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील. अनुकूल सप्ताह. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या