मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

साप्ताहिक राशीभविष्य : या आठवड्यात कोणत्या राशींना होणार धनलाभ, कसा जाईल तुमचा आठवडा पहा...

साप्ताहिक राशीभविष्य : या आठवड्यात कोणत्या राशींना होणार धनलाभ, कसा जाईल तुमचा आठवडा पहा...

Weekly Horoscope : या आठवड्यात महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा तुमच्या राशींवर काय आणि कसा परिणाम होणार?

Weekly Horoscope : या आठवड्यात महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा तुमच्या राशींवर काय आणि कसा परिणाम होणार?

Weekly Horoscope : या आठवड्यात महत्त्वाचे बदल होणार आहेत, त्याचा तुमच्या राशींवर काय आणि कसा परिणाम होणार?

आज रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021. आज अश्विन शुद्ध पंचमी. ललिता पंचमी. नव दुर्गा मधल्या चतुर्थी आणि पंचमी ला ज्यांचे पूजन केल्या जाते त्या माता  कुष्मांडा आणि माता स्कंद मातेला त्रिवार नमन.

माता कुष्मांडा  ही सृजनाची देवी मानल्या जाते  . सुवर्ण वर्ण, चतुर्भुज, जिच्या उदरातून विश्व उत्पत्ती झाली आहे. जिने कमल धारण केले आहे अशी माता सर्व जगताचे कल्याण करो. स्कंद माता  ही  कार्तिकेयाची  माता आहे. तिच्या हातामधे बाल स्कंद असून त्रिशूल ,कमल इत्यादी आयुध आहेत. श्वेत वर्ण  ,सुंदर असे तिचे रूप आहे.  दिव्य अनुभुती प्राप्त करण्यासाठी   मातेचे मनःपुर्वक पूजन करावे.

या सप्ताहात होणारा महत्त्वाचा बदल म्हणजे गुरु शनि मकर राशीत मार्गी होणार आहे.  रवी बुध मंगळ  कन्येत असून शुक्रवार केतू वृश्चिकेत असणार आहेत. राहू वृषभ राशीत भ्रमण करीत आहे.पाहूया साप्ताहिक राशी भविष्य.

मेष

सप्ताहाची सुरवात  ही फारशी अनुकूल नाही. चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार असुन प्रकृती जपा .पैसा सांभाळून खर्च करा. अष्टमात चंद्र शुक्र आर्थिक बाबतीत  सतर्क राहण्याचा संकेत देत आहे  काही विचित्र  दुखणी त्रास देतील. नोकरीमध्ये आता थोडी अनुकूलता येणार असून त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. मातृ पितृत्व चिंता सतावू शकते. नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. उत्तरार्ध अनुकूल.

वृषभ

पंचमातील ग्रह स्थिती शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देणार आहे. काही कार्यालयीन घडामोडी होतील  अध्यात्मिक आवड निर्माण होईल. संतती काहीशी विचित्र वागेल. सप्ताह मध्य चिंतेचा जाईल. मात्र मार्गी शनि एकेक समस्या निकालात काढेल. पती पत्नी एकमेकांना समजून घेतील.  अनुकूल सप्ताह.

मिथुन

षष्ठ शुक्र आणि व्यय स्थानात राहू फारसे अनुकूल नाहीत. मधुमेही लोकानी जपा. रक्त दाब, पोटाची दुखणी  असणार्‍यांनी सप्ताह मध्यावर काळजी घ्यावी. शनि चंद्र  अष्टमात असा हा काळ परीक्षा घेणार आहे. घरात मात्र खूप खरेदी, सजावट कराल. सामाजिक कामांमधे पुढाकार घेऊन यशस्वी कामे करून दाखवाल. सप्ताहात मिश्र फळ देणारा ठरेल.

कर्क

राशीच्या सप्तमात मार्गी गुरू शनि व्यवसायात अचानक तेजी आणतील. तृतीय स्थान जागृत आहे. प्रवास, भेटीगाठी होतील. संभाषण चातुर्य कमालीचे वाढेल. महत्त्वाचा फोन येईल. भावंडां पासून फायदा संभवतो. संतती साठी काही खरेदी कराल. आनंद मिळेल. सप्ताहाच्या शेवटी सांभाळून राहण्याची गरज आहे. तुमच्या जोडीदारासाठी शुभ फळ देणारा ठरेल.सप्ताहात चांगला जाईल.

सिंह

आठवडा काहीसा तणावपूर्ण जाईल. 13 तारखेला षष्ठ स्थानात जाणारे ग्रह आरोग्य चिंता निर्माण करतील. शेवटी सगळे आरोग्याचे नियम पाळा. चतुर्थ शुक्र घर आणि वाहन प्राप्तीचे योग आणतील. स्थान बदल देखील संभवतो. आर्थिक लाभ होतील मात्र जपून व्यवहार करा. मिश्र फळ देणारा सप्ताह.

कन्या

राशीतील ग्रह थोडे अस्वस्थ मन करत आहेत. पंचमात मंगळ संतती साठी अडचणी निर्माण करेल. प्रकृती कडे दुर्लक्ष नको. काही सामाजिक कार्य घडवून आणणारा काळ आहे .सुरवातीला  प्रवास योग संभवतात. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. तुमच्या हाताने मोठे धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. शुभ काळ आहे.

तुला

राशीच्या धनस्थानात शुक्राचा शुभ प्रभाव आहे. मात्र अनेक ग्रह खर्च करायला लावतील असे वाटते. दवाखाना, कायदेशीर बाबी   यावर भर राहील.  अष्टमात राहू कृत्तिका नक्षत्रात काही विचित्र अशी चिंता लावेल.कदाचित त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. मात्र  व्यवसाय असणार्‍यांना आर्थिक लाभ होतील. कुटुंबात काही पूजा इत्यादी घडेल. सप्ताह मध्यम जाईल.

वृश्चिक

या राशीच्या व्यक्ती थोड्या गूढ आणि तापट असतात. राशीतील शुक्रवार त्यांना आसक्त आणि कला प्रेमी करेल. स्त्री वर्गाची  साथ मिळेल  व्यक्तिमत्त्व आकर्षक होईल. चैनीसाठी खर्च कराल. गुरु  शनि वारंवार प्रवास योग आणतील. व्यवसाय उत्तम राहील. उत्तरार्ध अनुकूल आहे. आर्थिक व्यवहार होतील. हाताला यश देणारा काळ आहे.

धनु

आठवड्याची सुरवात जरा तणावपूर्ण होईल. व्यय स्थानातील चंद्र शुक्र खर्च वाढवतील. परदेशी प्रवासासाठी बोलणी होतील. धन कुटुंब वाणी स्थानात मार्गी गुरू अतिशय चांगले फळ देईल.

आर्थिक अडचणी कमी होऊ लागतील. गुरुकृपा राहील. उत्तरार्ध कुठून तरी अडकलेले धन मिळू शकते. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. सप्ताह शुभ आहे.

मकर

सप्ताह मध्य राशीत येणारा चंद्र  नाजूक मनस्थिती करेल. शनि सोबत युती नकारात्मक मानसिकता होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. प्रकृती कडे लक्ष द्या. भावंडाची भेट होईल. मात्र भाग्याची साथ कायम राहील. संतती संबंधी काही चिंता उत्पन्न होईल. सप्ताहात मिश्र फळ देईल.

कुंभ

सप्ताहात अष्टमात असलेले ग्रह पायांची, हाडाची दुखणी निर्माण करतील. मध्यावर व्यय स्थानात चंद्र शनि दुखण्या वर खर्च दाखवित आहेत. कार्यक्षेत्रात बदल होतील. काही नवीन संधी चालून येईल. गृहसौख्य उत्तम राहील. धार्मिक पुजा, दान हातून घडेल. कौटुंबिक जीवनात सुख लाभेल.  उत्तरार्धात जपून रहावे

मीन

भाग्यात राशी स्वामी शुक्र आर्थिक लाभ, अनेक शुभ संधी प्राप्त करून देईल  सप्ताह जोडीदारासाठी शुभ फळ देणारा ठरेल .मात्र मंगळ काही गैरसमज करण्याची शक्यता आहे. जपुन बोला. पूर्वार्ध भाग्य शाली घटनांचा. पराक्रम आणि चिकाटी वाढेल. व्यवसायातून लाभ संभवतात. प्रगतीच्या नवीन संधी येतील. मुलांची चिंता कमी होईल. शुभ काळ.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs