मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly horoscope : हा आठवडा चिंतेचा; कोणाच्या राशीत काय आहे पाहा

Weekly horoscope : हा आठवडा चिंतेचा; कोणाच्या राशीत काय आहे पाहा

weekly horoscope : कसा जाणार हा आठवडा, पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य.

weekly horoscope : कसा जाणार हा आठवडा, पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य.

weekly horoscope : कसा जाणार हा आठवडा, पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य.

आज रविवार दिनांक 28 नोव्हेंबर 2021 तिथी कार्तिक कृष्ण नवमी. या सप्ताहात होणारे महत्त्वाचे गोचर म्हणजे मंगळाचा वृश्चिक या स्वराशीत होणारा प्रवेश. 4 डिसेंबर रोजी उत्तर रात्री मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि सूर्य बुध केतूसोबत चतुर्ग्रही योग निर्माण होईल. गुरू कुंभ  तर शनि मकर राशीत, राहू वृषभ राशीत आणि शुक्र धनु राशीत भ्रमण करतील. चंद्र कन्या राशीत सप्ताहाच्या सुरुवातीला असेल. या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी अमावास्या आहे आणि वर्षातले शेवटचे खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. पण भारतातून हे ग्रहण दिसणार नाही  त्यामुळे वेध पाळण्याची गरज नाही.

पाहूया साप्ताहिक राशी भविष्य (लग्नानुसार).

मेष

राशी स्वामी मंगळ अष्टमात प्रवेश करणार आहे. अष्टम स्थानातील ग्रहाधिक्य हा चिंतेचा विषय आहे. अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करावा लागेल. प्रकृती सांभाळून असावं. वाहन जपून चालवावं. तसंच लागणं, पडणं, अग्नी भय आदीपासून अत्यंत सावध राहावं. अमावस्येच्या  सुमारास तीव्र परिणाम होतील. गैरसमज पसरतील. मात्र गुरू कृपा आहे. त्यामुळे मार्ग निघेल. शुभ शुक्राचे भाग्य स्थानात भ्रमण प्रवास योग आणेल. आर्थिक बाजू चांगली राहिल. शिधा दान करावं. मंगळाचा जप करणं योग्य राहिल.

वृषभ

सप्तम स्थानात मंगळ रवि बुध केतू भ्रमण जोडीदाराची चिंता निर्माण करेल. वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होतील. व्यवसाय धंद्यात अनेक नवीन घडामोडी घडतील. जरा सांभाळून असावं. अष्टमात शुक्र काही विशिष्ट समस्या असेल तर नीट तपासणी करावी. दशमातील गुरू  नोकरीत उत्तम फळे देईल. अनावश्यक खर्च टाळा. कुठल्याही प्रकारच्या कायद्याचे उल्लंघन करू नका. अमावास्या चिंतेची.

मिथुन

षष्ठ स्थानात आलेले ग्रह शत्रू वर विजय मिळवून देतील. व्यय स्थानातील राहू परदेशी जाण्याची संधी मिळवून देणार आहे. उष्णतेचे विकार होऊ शकतात. रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी जपून राहावं. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसाय उत्तम राहिल. जोडीदाराशी उत्तम सूर जुळतील. त्यांच्यासाठी खरेदी कराल. अमावास्या काळात ईश्वरी उपासना करावी. जप आणि दान करणं योग्य राहिल.

कर्क

राशीच्या पंचमात येणारा मंगळ रवि बुध केतूसोबत राजयोग करेल. उच्च शिक्षणात यश, नवीन विद्या घेण्याची इच्छा निर्माण होईल. संतान संबंधी शुभ घटना घडतील. पण काही चिंता निर्माण होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे विकार असतील तर दुर्लक्ष नको. षष्ठ स्थानात शुक्र फारसा अनुकूल नाही. अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. आर्थिक चिंता दूर होतील. अमावास्या संतान चिंतेची. दान करावं.

सिंह

राशी स्वामी रवि मंगळ, बुध केतूसोबत चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. घर आणि नोकरी हे चिंतेचं प्रमुख कारण असणार आहे. नोकरीमध्ये जास्तीची जबाबदारी येईल. गृह चिंता सतावू शकते. कलहामुळे टाळा. मात्र वास्तू किंवा वाहन यासंबंधी काही प्रगती होईल. नवीन वास्तू प्रवेश होऊ शकतो. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. इतरांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. अमावास्या गृह चिंतेची. उत्तरार्ध अनुकूल.

कन्या

तृतीय मंगळ भ्रमण भावंडांना काही त्रास किंवा त्यांच्याशी मतभेद दर्शवत आहे. प्रवास, मौजमजेसाठी खर्च, काही महत्त्वाचा निर्णय, फोन किंवा  संपर्क होईल. धार्मिक कार्य घडेल. घरासाठी खरेदी होईल. कौटुंबिक संमेलन होईल. सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडाल. तिथे मात्र सांभाळून काम करा. गुरु कृपा मिळण्यासाठी जप आणि दान करणं योग्य राहिल. पूर्वार्ध अनुकूल.

तुला

धन स्थानातील मंगळ रवि बुध केतू  आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर सज्ज रहा असं सुचवत आहेत. अनेक मार्गानी धन प्राप्तीचे योग आहेत मात्र तितकाच खर्च ही होईल. कोणालाही कठोर बोलू नका. गैरसमज वाढू देऊ नका. राशीतील सर्व ग्रह पुढे निघून गेल्यामुळे आता परिस्थिती बदलेल. शांततेत आठवडा घालवा. अमावास्या काळात ईश्वरी उपासना करावी.

वृश्चिक

राशी समूहातील महत्त्वाची रास. बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरीमध्ये नवीन घडामोडी होतील. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू होईल. राशीत आलेले मंगळ केतू अकस्मात घटना, आजारपण आणतील. तुमच्याबद्दल चर्चा होईल. कौटुंबिक जीवनात कलह होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागेल. उष्णतेचे विकार, ताप संसर्ग इत्यादीपासून जपा. आर्थिक स्थिती ठिक राहिल. अमावास्या काळात प्रकृतीकडे लक्ष असू द्या. अन्नदान करा.

धनु

हा आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. राशीतील शुक्र आनंदी ठेवेल. तेजस्वी व्यक्तिमत्त्व, सौंदर्य बहाल करेल. मात्र 4 तारखेला व्यय स्थानात येणारा  मंगळ आणि रवी बुध केतू अनामिक भीती निर्माण करतील. कायद्याचं बंधन पाळा. दवाखान्याची फेरी होऊ शकते. त्यासाठी खर्चदेखील वाढेल. आर्थिक स्थिती बरी राहिल. उत्तरार्ध जरा त्रासाचा राहिल. अमावास्या हूरहूर लावणारी आहे. परदेश गमन होऊ शकेल. दान करावं.

मकर

राशीत शनि, धनस्थानात गुरू ही स्थिती  समाधानकारक राहिल. मंगळ रवि अणि केतू वृश्चिकेत लाभ स्थानात अनेक मार्गांनी लाभ घडवतील. मित्र मैत्रिणींना भेटणं शक्य होईल. प्रवास योग येतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. धार्मिक कार्य घडेल. अमावस्येच्या सुमारास मुलांची चिंता वाटेल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. शनि उपासना करावी.

कुंभ

दशम स्थानात जागृत झाले असल्यामुळे कार्य क्षेत्रात नवीन घडामोडी होतील. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. वातावरण किंचित तापू शकते. आईवडील, घर याकडे विशेष लक्ष पुरवावं लागेल. नवीन खरेदी होईल. जोडीदाराला नाराज करू नका. अमावास्या काळात थोडी काळजी घ्या. वाद नको. मात्र व्यवसाय उत्तम राहील. स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. ईश्वरी उपासना करावी.

मीन

राशी स्वामी गुरू व्यय स्थानात, तृतीय राहू  आणि भाग्य स्थानात मंगळ रवि ही ग्रहस्थिती मीन व्यक्तींना उत्तम फळ देईल. घरात अनेक घडामोडी होतील.तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. आर्थिक बाजु चांगली राहील. शुक्र कुटुंबात आनंदाचे वातावरण ठेवेल. भाग्यशाली रास. अमावास्या काळात शिधा दान करणे फार फायद्याचे राहील. आठवडा गडबडीत तरीही आनंदात जाईल.

शुभम भवतु !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark, Zodiac signs