Home /News /astrology /

साप्ताहिक राशिभविष्य : प्रत्येक राशीसाठी आठवडा उत्तम; धनलाभाचा योग

साप्ताहिक राशिभविष्य : प्रत्येक राशीसाठी आठवडा उत्तम; धनलाभाचा योग

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

Rashibhavishya : तुमचा हा आठवडा कसा असणार?

आज रविवार दिनांक 22 ऑगस्ट 2021.आज श्रावण पौर्णिमा. नारळी पौर्णिमा. रक्षाबंधनाच्या सर्व  बंधू भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा. या आठवड्यातील ग्रह स्थितीनुसार पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यात बुध ग्रह राश्यांतर करत असून 26 ऑगस्ट रोजी तो स्वराशीत म्हणजे कन्या राशीत प्रवेश करेल. तिथे तो शुक्र ग्रहासोबत युती करेल. गुरू आणि  शनि वक्री अवस्थेतआहेत. मंगळ, सूर्य, बुध, सिंह राशीत असून शुक्र कन्येत आहे. राहू वृश्चिकेत तर केतू वृषभ राशीत भ्रमण करत आहेत. मेष राशीच्या धनस्थानातील राहू अचानक आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरेल. पंचमात असलेले ग्रह नाव मिळवून देतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. शुक्र रोग पिडा करेल. हेवेदावे वाढतील. दशम शनि, कार्यक्षेत्रात संथ प्रगती होईल. लाभ स्थानातील गुरू नवीन संधी मिळवून  देईल. विवाह जमतील. घरात धार्मिक कार्य ठरतील. एकूण आनंदी काळ आहे. वृषभ पंचमात येणारा बुध शुक्र लक्ष्मी योग करत आहे. संततीसाठी अत्यंत शुभ फळ देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. पौर्णिमेच्या आसपास भाग्यशाली घटना घडेल. आनंदी रहा. घरासाठी नवीन वस्तू खरेदी होतील. शुभ कार्य हातून घडेल. कौटुंबिक सुख लाभेल. उत्तम काळ. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात असलेले ग्रह प्रवास योग आणतील .कामाच्या ठिकाणी अचानक चांगले फळ मिळेल. पौर्णिमा  मात्र थोडी चिंतेची जाईल. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. भावंडाची गाठभेट होईल. धार्मिक कार्य  हातून पार पडेल. आर्थिक लाभ होतील. राशी स्वामी बुध चतुर्थात येणार आहे. घरात मंगल कार्य होईल. उत्तरार्ध अनुकूल. कर्क राशीच्या धनस्थानातील सूर्य मंगळ डोळ्याचे तसेच पोटाचे त्रास देतील. मात्र तुमचा कल सखोल अभ्यास करण्याकडे राहील. आर्थिक स्थिती ठिक राहील. खर्च संभवतात. तृतीय स्थानात येणारा बुध पराक्रमाची वाढ करेल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. पौर्णिमा आनंदाची जाईल. उत्तरार्ध अनुकूल. सिंह या राशीच्या व्यक्ती सध्या चर्चेचा विषय आहेत . धन स्थानात येणारा बुध तुम्हाला उत्तम बुद्धिमत्ता देईल. वाणी प्रभावी होईल. कौटुंबिक सुख  मिळेल. घरांमध्ये काही विशेष पूजा इत्यादी घडेल. कार्यक्षेत्रात प्रभाव पडेल. आर्थिक बाजू चांगली राहिल. आरोग्य सांभाळा. उष्णतेचे विकार, पित्त यापासून जपा. उत्तम काळ आहे. कन्या या आठवड्यात राशीतून प्रवेश करणारा बुध शुक्राचा नीच भंग योग करेल. शुक्राचे उत्तम फळ मिळेल. गुरू नोकरी व्यवसाय यासाठी प्रयत्‍न कराल तर यश देईल. उच्च बुद्धिमत्ता, तेजस्वी व्यक्तिमत्त्व प्राप्त होईल. धार्मिक कार्य घडेल. कौटुंबिक जीवनात, संतती संबंधी शुभ कार्य घडेल. आठवडा अगदी व्यस्त जाईल. तुला व्यय स्थानात प्रवेश करणार बुध परदेश संबंधी अनुकूल समाचार देईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवून देईल. व्हिसा इत्यादी संबंधित बाबी पूर्ण होतील. नवीन खरेदी होईल. प्रकृती थोडी ठिक राहिल. आर्थिक बाजू जपा. पण घरात शुभकार्य घडतील. आत्मविश्वास वाढेल. उत्तरार्ध अनुकूल. वृश्चिक राशीच्या दशमातील ग्रह कार्यालयीन कामकाज वेगात पार पाडतील. नवीन संधी मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा आठवडा. केलेल्या कामाचं फळ मिळेल. मित्र अणि मैत्रिणींसोबत आनंदात वेळ जाईल. प्रकृती जपा. भावंडाची भेट होईल. अनुकूल काळ. धनु दशमातील ग्रह बुध हा काही नवीन घडामोडी घडवून आणेल. रखडलेलं काम ताबडतोब मार्गी लागेल. पैतृक संपत्ती संबंधी निर्णय होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. भावंडाची भेट होईल. संबंध मधुर राहतील. शनि संथ गतीने घरात प्रगती  करेल. आर्थिक घडामोडी घडतील. पौर्णिमा आर्थिक लाभाची ठरेल. अनुकूल काळ. मकर राशीतील शनि चंद्र अजूनही सावधगिरीचा इशारा देताहेत. मानसिक आंदोलने होतील. उत्तरार्ध मात्र  भाग्यकारक घटना दर्शवत आहे. आर्थिक लाभ, मौल्यवान वस्तू खरेदी, संभवते. संतती चिंता थोडी कमी होईल. ईश्वरी कृपा होण्यासाठी आत्ता काळ. नकारात्मक विचार काढून टाकावेत. कुंभ राशीतील वक्री गुरू संथ गतीने प्रगती घडवून आणेल. बरेच दिवस रेंगाळणारी  कामं लवकर आटोपून घ्या. अष्टमात येणारा बुध  विचित्र मानसिक स्थिती, काही प्रकृतीचे त्रास करेल. जोडीदाराची काळजी घ्या. उत्तरार्ध अनुकूल. पोर्णिमा मात्र खर्चाची आहे. काही भेटवस्तू खरेदी कराल. गुरू कृपा राहिल. मीन जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक बाजू चांगली राहिल. पायांचे विकार, मधुमेह, इत्यादीपासून सावध राहा. तुमच्या बुद्धी चातुर्याने त्यावर विजय मिळवाल. गुरुकृपा होण्यासाठी काही उपासना करावी. धार्मिक गोष्टीवर खर्च वाढेल. मुलांसाठी खरेदी करावी लागेल. पौर्णिमा शुभ आहे. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या