आज दिनांक 12 डिसेंबर 2021 वार रविवार मार्गशीर्ष शुक्ल नवमी. आज चंद्र मीन राशीत भ्रमण करणार आहे. गुरु कुंभ राशीत तर मंगळ रवि केतू वृश्चिक राशीत आहेत. शनि मकर राशीत, वृषभ राशीत राहू आणि बुध धनु राशीत आहे. या आठवड्यात रवि राशी बदल करणार असून दिनांक 16 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजून 58 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल. सूर्य बुध राजयोग निर्माण करतील .या ग्रहस्थितीनुसार पाहुया या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य.
मेष
राशीच्या भाग्य स्थानात येणारा रवि भाग्याचे नवीन दरवाजे उघडणार आहे. धार्मिक गोष्टी साठी खर्च होईल. घरात शुभ कार्य घडेल. धर्म निष्ठा, उपासना याबद्दल आवड निर्माण होईल. ज्ञान प्राप्तीसाठी उत्तम काळ. लाभातील गुरू अनेक मार्गानी लाभ मिळवून देईल. मात्र अष्टम स्थानात मंगळ केतू प्रकृतीसंबंधी तक्रारी, अपघात यापासून जपा असे सुचवत आहेत. प्रवासात सावध रहा. मंगळ दान करणं योग्य राहील.
वृषभ
राशीच्या अष्टमात येणारा सूर्य बुध फारसे अनुकूल फळ देणार नाही. पोटासंबंधी त्रास असतील तर काळजी घ्या. गुरु कार्य क्षेत्रात नवीन जबाबदारी आणेल. भाग्य स्थानातील शनि अजूनही मार्ग प्रशस्त करणार नाही. मंगळ केतू जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता किंवा त्यांच्या प्रकृतीसंबंधी चिंता दर्शवत आहे. अहंकार सोडून द्या. ईश्वरी उपासना करा.
मिथुन
या राशीच्या व्यक्तीसाठी हा आठवडा जोडीदारासोबत मौजमजा करण्याचा आहे. आरोग्यावर अनुकूल परिणाम होतील. भाग्य स्थानातील गुरू उत्तम संधी मिळवून देईल. षष्ठ स्थानात मंगळ केतू शत्रू पिडा करतील मात्र विजय तुमचाच होईल. व्यय राहू आणि अष्टम शनि काळजी घ्यावी असे सुचवत आहेत. शनि दान करावं.
कर्क
या राशींचे लोक भावना प्रधान असतात. राशी स्वामी चंद्र शुभ असुन मन आनंदी राहील. षष्ठ स्थानात येणारा रवि नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध करून देईल. मुलाखतीतून यश मिळेल. आर्थिक बाजू जपा. काहींना अचानक कर्ज काढण्याची निकड भासेल. आईकडील व्यक्ती भेटतील. मित्रमैत्रिणींसोबत आनंदात वेळ जाईल.
सिंह
राशी स्वामी रवि पंचमात बुधासोबत असेल. सार्वजनिक जीवनातील महत्त्वाचा काळ, संततीसंबंधी शुभ वर्तमान मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. धार्मिक कार्य, पूजा इत्यादी घडेल. सप्तम स्थानात गुरू वैवाहिक जीवनात सुखद अनुभव देईल. नवीन स्थळे येतील. व्यावसायिक व्यक्तींना शुभ फळ देणारा काळ आहे. शत्रू पराजित होतील. आनंदी सप्ताह.
कन्या
षष्ठ गुरु अणि चतुर्थ रवि बुध नवीन वास्तूसंबंधी शुभ समाचार देतील. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसाय उत्तम राहील. आई वडीलांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. त्यांच्यासाठी काही करावं असं वाटेल. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. पंचम स्थानात शनि व भाग्य स्थानात राहू धर्माबद्दल अनास्था निर्माण होईल. संतती चिंता लागून राहील. सप्ताहात अनेक लाभ होतील.
तुला
शुक्र मकर राशीत चतुर्थ स्थानात घरासाठी खरेदी, नवीन वास्तू यासाठी अतिशय उत्तम राहील. तृतीय स्थानात रवि बुध प्रवास योग आणेल. धन स्थानात मंगळ खर्चाचे प्रमाण वाढेल. बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. कोणाला दुखावून चालणार नाही. आर्थिक स्थिती जपून रहा. गैरसमज पसरतील. मात्र गुरू कृपा राहील. अष्टमात राहू प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
वृश्चिक
राशी स्वामी मंगळ स्वराशीत असून केतू सोबत काही गैरसमज निर्माण करेल. बोलणे प्रखर होईल. धन स्थानातील सुर्य बुध आर्थिक स्थिती चांगली ठेवेल. तेजस्वी व्यक्तिमत्त्व होईल. प्रकृती चांगली राहील. संतती संतती साठी शुभ फळ देईल. अकस्मात घटना घडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल.
धनु
राशीत आलेला सूर्य अणि बुध तेजस्वी व्यक्तिमत्त्व बहाल करेल. वाणीमध्ये तेज येईल. अधिकार प्राप्तीचे योग आहेत. शुक्र शनि आर्थिक स्थिती ठिक ठेवेल. तृतीय गुरू प्रवास योग आणि जनसंपर्क वाढवेल. नोकरीच्या ठिकाणी फार काम राहणार आहे. नवीन संधी मिळतील. सप्ताहात मिश्र फळ मिळेल.
मकर
शनि स्वराशीत आहे. थोडे मानसिक द्वंद्व चालू राहील. नैराश्यवादी स्वभाव होईल. धार्मिक निष्ठा वाढेल. व्यय स्थानात सूर्य डोळ्यांचे विकार देईल. कायद्याच्या चौकटीत राहून कामे सुरळीत पार पाडा. परदेश प्रवाससंबंधी नवीन संधी येतील. मुलांची चिंता वाटेल. गुरु कृपा राहील. शनिचे दान आणि जप करा.
कुंभ
राशी स्वामी शनि व्ययस्थानात, साडेसाती आणि राहू चतुर्थ स्थानात घरामध्ये काही अडचणी निर्माण करेल. स्थान बदल घडवून आणेल. संतती सुख चांगले राहील. एकत्र प्रवास, मौजमजेसाठी खर्च कराल. राशीतील गुरू सर्व चिंता हरण करेल. कार्यक्षेत्रातील मंगळ केतू तुमच्याबद्दल चर्चा घडवून आणेल. जपून रहा.
मीन
बारावा गुरू, दशमातील रवि बुध उत्तम मार्ग सुचवेल. कार्यक्षेत्रातील प्रगती सुरू राहील. पूर्वार्ध अनुकूल आहे. भाग्य स्थानातील मंगळ केतू घरात शुभ कार्याचे नियोजन करेल. संततीसाठी अतिशय शुभ फळ देणारे ग्रहमान आहे. तृतीय राहू तुमच्या मध्ये धैर्य निर्माण करेल. बहिण भावाशी संवाद साधाल. पण गैरसमज वाढू देऊ नका. सप्ताह आनंदात जाईल.
शुभम भवतु!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs