मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope : या राशीला घडेल आनंददायी प्रवास; कसा जाईल तुमचा आठवडा, साप्ताहिक राशिभविष्य पाहा

Weekly Horoscope : या राशीला घडेल आनंददायी प्रवास; कसा जाईल तुमचा आठवडा, साप्ताहिक राशिभविष्य पाहा

या आठवड्याच्या ग्रह स्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य.

या आठवड्याच्या ग्रह स्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य.

या आठवड्याच्या ग्रह स्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 4 डिसेंबर 2022 रविवार. आज मोक्षदा एकादशी. भागवत एकादशी. या सप्ताहात होणाऱ्या महत्वाच्या घटना म्हणजे शनि महाराज मकर राशीत आता मार्गी आहेत. तसेच मेष राशीत राहू भ्रमण सुरू असून वृश्चिक राशीत बुध सूर्य योग आहे . केतू तुला राशीत भ्रमण करीत आहे. मीन राशीमध्ये गुरू स्थित असून 2 डिसेंबर रोजी शुक्राचा धनु राशीत प्रवेश झाला आहे. मंगळ वृषभ राशीत तर चंद्र मीन राशीत उच्च अवस्थेत राहील. या आठवड्यात पौर्णिमा असून दत्त जयंतीच्या महा उत्सवाच्या सर्वांना मंगल शुभेच्छा. या ग्रह स्थिती नुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य.(लग्ना नुसार).

मेष

आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्ती मुळे पथ भ्रष्ट होण्याचे संकेत आहेत. कुठलेही ताण निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक ताण ,अहंकार आणि दगदग प्रकृतीला हानिकारक ठरेल. मात्र गुरू मनाचा धार्मिक गोष्टीकडे कल ठेवेल. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश देईल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. भाग्य स्थानात येणारा शुक्र व सुर्य अतिशय शुभ फल देईल. मंगळ पराक्रमाची वाढ करेल. कुटुंबाला जपा. एकूण सप्ताह आनंदी आहे.

वृषभ

राशीतून पुढे सरकणारा मंगळ स्वभावात एक प्रगल्भ समज आणेल. व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. व्यय राहू खर्चामध्ये वाढ करील. सप्तम स्थानातील शुक्र जोडीदाराला चमत्कारिक लाभ घडवेल.. लाभातील गुरू संततीसाठी शुभ असून नव विवाहिता आनंदाची बातमी देतील. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मात्र गैरसमजातून वाद टाळा. मन धार्मिक गोष्टीमध्ये गुंतवा. एखाद्या समारंभात भाग घ्याल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या महत्वाच्या घटना फायद्याच्या ठरतील. सप्ताह अनुकूल.

मिथुन

राशीच्या षष्ठ स्थानात असलेले सूर्य शुक्र संतती साठी खर्चिक बाबी समोर आणतील. प्रवास घडेल .कायदा पाळा. कुटुंब मंगळ गुरूच्या शुभ प्रभावात आहे. नवीन संधी मिळतील. शनि आता मार्गी झाला आहे . सावध राहण्याचा काळ आहे. मन शांत ठेवा . छोट्या मोठ्या गोष्टीनी विचलित होऊ नका. सप्ताह मध्यम फळ देईल .

कर्क

राशीस्वामी चंद्राचे लाभ स्थानातून भ्रमण आर्थिक दृष्ट्या उत्तम फळ देईल .लाभाचे नवीन मार्ग मिळतील.मित्र मैत्रिणी सोबत वेळ घालवाल.कार्यक्षेत्रात राहू नवीन संधी देईल.मात्र सहजपणे कोणतेही काम होणार नाही. शनीची तीव्रता थोडी कमी होईल. घर आणि व्यवसाय यात बदल होऊ शकतो. घरासाठी नवीन खरेदी होईल .संधी कडे दुर्लक्ष नको. उत्तम गुरु बळ तुम्हाला सर्व कठीण प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढेल . सप्ताह शुभ.

सिंह

राशीस्वामी रवि वृश्चिक राशीत सुखद वातावरण निर्माण करेल.काम आणि व्यवसाय बाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गुरू बल नसल्याने सांभाळून निर्णय घ्या. भाग्यातील राहू धार्मिक स्थानाचे प्रवास घडवील. मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. लाभ चंद्र शुभ प्रभाव देईल. आर्थिक लाभ होतील. एकूण सप्ताहाचे बल उत्तम आहे.

कन्या

राशीस्वामी बुध स्वस्थानात असून व्यवसाय वृद्धी, प्रवास यात शुभ फळ देईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढेल. अष्टम स्थानातील राहू काही प्रकृतीचे त्रास दाखवीत आहे. कंबर आणि स्नायूमध्ये दुखापत असेल तर काळजी घ्या. स्त्रियांनी वेळीच काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. चतुर्थ स्थानात शुक्र उत्तम फळ देईल. सप्ताह बरा जाईल.

तूळ 

राशीस्वामी शुक्र तृतीय स्थानात येणार आहे. जोडीदाराशी सुखद संबंध निर्माण होतील. रवि बुध पोटाचे त्रास निर्माण करतील. गुरू षष्ठात आहे. प्रकृती जपा शत्रुत्व होऊ देऊ नका. मात्र नोकरी व व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. नातेवाईक भेट संभवते.राशीतील केतू अध्यात्मिक बाजू कडे कल ठेवेल. एकूण सप्ताहात उत्तम फळ मिळेल .

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात भ्रमण करीत आहे . शारीरिक त्रास हा या आठवड्याचा केंद्र बिंदू राहील.त्यासाठी वेळ द्या. चतुर्थ स्थानात होणारा मार्गी शनि घरात अशांत वातावरण निर्माण करेल.आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी जपून रहा. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग येतील. सप्ताहात चंद्र भ्रमण अनुकूल आहे.

धनु

राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात आहेत. शुक्र राशीत प्रवेश करीत आहे. जोडीदाराच्या स्वभावात माधुर्य येईल. घरामध्ये काही दुरुस्ती,सुधारणा करण्यास योग्य काळ.नवीन वास्तु योग येतील.वाहन जपून चालवा. आईवडील आनंदी राहतील. संतती काहीशी खर्चिक आणि चैनी बनेल. सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहिलं. भावंडांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताह उत्तम आहे.

मकर

राशी स्वामी शनी मार्गी आहे. आर्थिक बाबतीत जपून रहा.शेअर मार्केट किंवा अनपेक्षित ठिकाणीं धनप्राप्ती होऊ शकते. मात्र व्यवहार जपून करा.भावंडं भेट होईल. संतातीसुख भरपूर मिळेल. प्रवास योग येतील. विश्वास ठेवून कार्य क्षेत्रात यश मिळवाल. सप्ताहाचा पूर्वार्ध काही कटकटीचा असेल.उत्तरार्ध मात्र शुभ फल देईल.

कुंभ

व्यय शनि मानसिकता काहीशी नकारात्मक करेल. खर्चात वाढ होईल.शनि उपासना करणे गरजेचे आहे.

कुटुंबात गैरसमज निर्माण होतील. सूर्य व भाग्यातील ग्रह धार्मिक स्थानाचे प्रवास घडवतील. प्रकृती जपा.शुक्र भ्रमण सुखद अनुभव देईल. बहिण भावंडं भेट होईल. त्यांच्यासाठी खर्च कराल. सप्ताह एकूण मिश्र फळ देईल.

मीन

राशीस्वामी गुरू राशीत आहे.सात्विक आणि अध्यात्मिक काळ आहे . मंगळ वृषभ राशीत असल्याने घरामध्ये कलह होईल. लौकर राग येईल. आर्थिक घडामोडी होतील. प्रवास योग, बंधू भेट संभवते. केतू काही कमरेचे स्नायूंचे विकार निर्माण करेल. जपून रहा. अती दगदग टाळा. शुक्र भ्रमण कार्यक्षेत्रात लाभ देईल. सप्ताह उत्तम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Religion, Zodiac signs