मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope : आरोग्याच्या समस्या उद्भवणार; कसा जाईल तुमचा आठवडा, साप्ताहिक राशिभविष्य पाहा

Weekly Horoscope : आरोग्याच्या समस्या उद्भवणार; कसा जाईल तुमचा आठवडा, साप्ताहिक राशिभविष्य पाहा

साप्ताहिक राशिभविष्य.

साप्ताहिक राशिभविष्य.

या आठवड्याच्या ग्रह स्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रविवार. आज मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी. विनायक चतुर्थी. या सप्ताहात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना म्हणजे शनी महाराज मकर राशीत मार्गी अवस्थेत आहेत. तसंच मेष राशीत राहू भ्रमण सुरू असून वृश्चिक राशीत बुधादित्य राज योग आहे. केतू तूळ राशीत भ्रमण करत आहे. मीन राशीमध्ये गुरू स्थित असून लवकरच शुक्र दिनांक 4 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल. मंगळ वृषभ राशीत असेल. बुध देखील 2 नोव्हेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करेल. चंद्र धनु राशीतून सप्ताहाच्या सुरवातीला भ्रमण करेल. वरील ग्रह स्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य. (लग्ना नुसार).

मेष

राशीतील राहू तुम्हाला चैन करण्यास प्रवृत्त करेल. आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीकडे लक्ष ठेवा. कुठलेही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. अहंकार आणि मनावरील ताण प्रकृतीला हानिकारक ठरेल. मात्र गुरू मनाचा धार्मिक गोष्टीकडे कल ठेवेल. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश देईल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. आर्थिक व्यय होईल. अष्टम स्थानात शुक्र आहे. प्रकृती जपा. एकूण सप्ताह आनंदी आहे.

वृषभ

राशीतील मंगळ स्वभावात एक प्रकारचा अधिकार आणेल. व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. व्यय राहू खर्चामध्ये वाढ करील. काही कारणास्तव दवाखान्याची पायरी चढावी लागेल. लाभातील गुरू संततीसाठी शुभ असून नवविवाहिता आनंदाची बातमी देतील. वैवाहिक जीवन सुखाचं राहिल. मात्र गैरसमजातून वाद टाळा. मन धार्मिक गोष्टीमध्ये गुंतवा. एखाद्या समारंभात भाग घ्याल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना फायद्याच्या ठरतील. सप्ताह अनुकूल.

मिथुन

राशीच्या षष्ठ स्थानात असलेले सूर्य बुध व्यावसायिक दृष्ट्या शुभ आहेत. प्रवास घडेल. कायदा पाळा. कार्यक्षेत्र गुरूच्या शुभ प्रभावात आहे. नवीन संधी मिळतील. वक्री शनी आता मार्गी अष्टम स्थानाकडे आहे. सावध राहण्याचा काळ आहे. मन शांत ठेवा. छोट्या मोठ्या गोष्टीनी विचलित होऊ नका. संतती चिंता निर्माण होईल. सप्ताह मध्यम फळ देईल .

कर्क

राशी स्वामी चंद्राचे षष्ठ स्थानातून भ्रमण आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. मित्रमैत्रिणी सोबत वेळ घालवाल. कार्यक्षेत्रात राहू नवीन संधी देईल. मात्र सहजपणे कोणतेही काम होणार नाही. शनीची तीव्रता थोडी कमी होईल. घर आणि व्यवसाय यात बदल होऊ शकतो. संधीकडे दुर्लक्ष नको. उत्तम गुरु बळ तुम्हाला सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल सप्ताह शुभ.

सिंह

राशी स्वामी रवी चतुर्थ स्थानात आहे. काम आणि व्यवसाय बाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गुरू बल नसल्याने सांभाळून निर्णय घ्या. भाग्यातील राहू धार्मिक स्थानाचे प्रवास घडवील. दशम मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. चंद्र शुभ प्रभाव देईल. आर्थिक लाभ होतील. एकूण सप्ताहाचे बल उत्तम आहे.

कन्या

राशी स्वामी बुध तृतीय स्थानात असून व्यवसाय वृद्धी, प्रवास यात शुभ फळ देईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढेल. अष्टम स्थानातील राहू काही प्रकृतीचे त्रास दाखवत आहे. कंबर आणि स्नायूमध्ये दुखापत असेल तर काळजी घ्या. स्त्रियांनी वेळीच काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल वैवाहिक जीवन सुखी राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवा. सप्ताह बरा जाईल.

तूळ

राशीस्वामी शुक्र तृतीय स्थानात येणार आहे. अष्टम मंगळ आहे ,प्रवास होतील. जोडीदाराशी गैरसमजातून वाद होतील. रवी बुध पोटाचे किंवा पायाचे त्रास निर्माण करतील. प्रकृती जपा शत्रुत्व होऊ देऊ नका मात्र नोकरी व व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. नातेवाईक भेट संभवते. राशीतील केतू अध्यात्मिक बाजूकडे कल ठेवेल. एकूण सप्ताहात मिश्र फळ मिळेल.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात आहे. वैवाहिक जीवन हा या आठवड्याचा केंद्र बिंदू राहिल. जोडीदारासाठी वेळ द्या. तृतीय स्थानात शनी

घरात सुखद वातावरण निर्माण करेल. आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी जपून रहा. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग येतील. सप्ताहात चंद्र भ्रमण अनुकूल आहे.

धनु

राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात आहेत. मंगळ षष्ठात आहे स्वभावात तेज येईल. घरामध्ये काही दुरुस्ती, सुधारणा करण्यास योग्य काळ. नवीन वास्तु योग येतील. वाहन जपून चालवा. आईवडील आनंदी राहतील. संतती काहीशी खर्चिक आणि चैनी बनेल. सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहिल. भावंडांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताह मध्यम आहे.

मकर

राशी स्वामी शनी आता मार्गी आहे. आर्थिक बाबतीत जपून रहा. शेअर मार्केट किंवा अनपेक्षित ठिकाणीं धनप्राप्ती होऊ शकते. मात्र व्यवहार जपून करा. भावंडं भेट होईल. संतती सुख भरपूर मिळेल. प्रवास योग येतील. विश्वास ठेवून कार्यक्षेत्रात यश मिळवाल. सप्ताहाचा पूर्वार्ध काही कटकटीचा असेल. उत्तरार्ध मात्र शुभ फल देईल.

कुंभ

मार्गी शनी आयुष्यात काहीशी नकारात्मक करेल. खर्चात वाढ होईल. शनी उपासना करणं गरजेचं आहे. साडेसाती सुरू झाली आहे. कुटुंबात गैरसमज निर्माण होतील. अष्टम सूर्य बुध धार्मिक स्थानाचे प्रवास घडवतील. प्रकृती जपा. आई वडील तुमच्यावर नाराज राहतील. बहिण भावंडं भेट होईल. त्यांच्यासाठी खर्च कराल. सप्ताह एकूण मिश्र फळ देईल.

मीन

राशी स्वामी गुरू राशीत आहे. सात्विक आणि अध्यात्मिक काळ आहे. काही काळ मंगळ वृषभ राशीत असल्याने स्वभाव तेज होईल. लवकर राग येईल. आर्थिक घडामोडी होतील. प्रवास योग, बंधू भेट संभवते. केतू काही कमरेचे स्नायूंचे विकार निर्माण करेल. जपून रहा. अती दगदग टाळा. सप्ताह मध्यम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs