Home /News /astrology /

साप्ताहिक राशिभविष्य : या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आठवडा; आर्थिक लाभ होणार

साप्ताहिक राशिभविष्य : या व्यक्तींसाठी शुभ ठरणार आठवडा; आर्थिक लाभ होणार

Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य.

आज दिनांक 29 मे 2022.वार रविवार. तिथी वैशाख कृष्ण चतुर्दशी/अमावस्या. या आठवड्यातील होणारे ग्रह गोचर म्हणजे दिनांक 30 रोजी बुध सकाळी वृषभ राशीत उदित होईल. तिथे असलेल्या सूर्यासोबत बुधादित्य राजयोग करेल. गुरू मंगळ मीन राशीत विराजमान असतील. मेष राशीत राहू व तुला राशीत केतू गोचर झाले आहे. शनी कुंभ राशीत असून चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र मेष राशीत असेल. या आठवड्यात दिनांक 30 रोजी सोमवती अमावस्या आहे . श्री शनौश्चर जयंती साजरी केली जाईल. या ग्रहस्थितीनुसार पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. (लग्नानुसर) मेष राशीत प्रवेश केलेल्या राहूमुळे मेष व्यक्ती काहीसे अहंकारी होतील. मन विचलित राहिल. शिव आराधना करावी. लाभ स्थानातील शनी कार्यक्षेत्रात अनेक संधी उपलब्ध करून देण्यात मदत करतील. शुक्र उच्च फळ देईल. गुरू धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आणेल. सप्तम केतू जोडीदाराच्या प्रकृतीविषयी आशंका निर्माण करेल परदेशसंबंधी कागदपत्र बनतील. एकूण आठवडा हा वृषभ चंद्र प्रवेशातून आर्थिक लाभ देणारा ठरेल. वृषभ राशीच्या व्यय स्थानात राहू व षष्ठ केतू आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल. उदित बुध स्त्रीवर्गाकडून लाभ मिळवून देईल. संततीसुख मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी व्यक्ती त्रासदायक ठरू शकते. धार्मिक निष्ठा तीव्र होतील. अधिकारी व्यक्तीची भेट होईल. अमावस्या जपून राहण्याची आहे. सप्ताह मध्यम फळ देणारा ठरेल. मिथुन चंद्र सूर्य बुध भ्रमण व्यय स्थानात झाले आहे. अतिशय कठीण असा हा बदल आहे. पंचम केतू संततीसंबंधी वार्ता देईल. नवीन कला शिकण्याची इच्छा होईल. दशमातील गुरू परदेश प्रवास, भाग्यकारक घटना घडवून आणेल. रवी बुध अधिकार प्राप्ती करून देतील. फक्त सावध रहा. सप्ताह उत्तम जाईल. कर्क दशमात प्रवेश केलेला राहू कार्य स्थळ किंवा घरात बदल घडवून आणेल. एखादी नवीन व्यक्ती अडथळे आणेल. लाभातील रवी बुध शुभ असून वडिलांकडून लाभ देतील. प्रवास योग आनंद देतील. गुरू आता मंगळासोबत निघाला आहे. पुढील वर्ष हे शुभ संकेत घेऊन येईल. जोडीदाराची काळजी घ्या. चंद्र भ्रमण घरामध्ये काही विशेष घटना घडवेल. सप्ताह शुभ. सिंह राशी स्वामी रवी बुधासोबत दशम स्थानात असून राजयोग होत आहे. आर्थिक लाभ होतील. पोटाचे त्रास होऊ शकतात. चंद्र भ्रमण शुभ असून जवळ पास प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात काही बदल संभवतात. जोडीदाराला काही मोठे लाभ होऊ शकतात. लवकरच आयुष्यात बदल घडण्याचे संकेत आहेत. अमावस्या आहे. कार्यक्षेत्रात काम करत रहाल. सप्ताह शुभ. कन्या हा सप्ताह सर्व दृष्टीने संथ आणि काही विशेष ना घडता जाईल. रोजची कामं कंटाळवाणी वाटतील. आर्थिकदृष्ट्या मात्र आठवडा चांगला जाईल. जवळपास फिरायला जाण्याचे योग येतील. संतती ही तुमची प्राथमिकता असेल. सप्तम गुरू तुम्हाला विवाह योग आणेल. चर्चा होईल. विजय तुमचाच होणार आहे. काळजी घ्या. सप्ताह अनुकूल. तूळ षष्ठ स्थानातील मंगल प्रवास, घरासाठी काही खर्च असा योग आणेल. अविवाहित व्यक्तींना आकर्षक व्यक्ती भेटेल. संतती सुख मिळेल. राशीतील केतू स्वभावात बदल घडवेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांना वेळ द्या. सप्ताहाच्या शेवटी घर आणि वाहन यासंबंधी नवीन प्रस्ताव येतील. आर्थिकदृष्ट्या सप्ताह अनुकूल राहिल. वृश्चिक षष्ठ राहू आणि व्यय केतू गोचर परदेश संबंधी घडामोडी घडतील. संतती सुख लाभेल. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने आता काळ बरा आहे. नवीन घर, वाहन यासंबंधी लवकर निर्णय घ्या. काहीही अनावश्यक खर्च करू नका. चंद्र भ्रमण सप्तम स्थानात आहे. जोडीदाराशी संबंध बिघडतील. काळजी घ्या. सप्ताह मध्यम. धनु या आठवड्यात गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेला मानसिक आणि शारीरिक त्रास कमी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल पण अनेक मार्गांनी पैसा येईल. चतुर्थ गुरू, षष्ठ सूर्य बुध अतिशय शुभ असून भाग्याची वाढ करतील. पराक्रम आणि चिकाटीने तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवाल. सप्ताहात अनेक शुभ फल मिळतील. मकर चतुर्थ स्थानात आलेला राहू हा स्थान परिवर्तन, घरामध्ये मोठे बदल करण्यासाठी अनुकूल आहे. रवी बुध भावंडं भेट घडवेल. महत्त्वाचे फोन, निरोप येतील. वाणी तेजस्वी होईल. शनी मंगळाचा प्रकोप आता काहीसा कमी होईल. आर्थिक लाभ, कुटुंबात वाढ संभवते. अमावस्या संतती चिंतेची. सप्ताह आनंदी जाईल. कुंभ तृतीय राहू आणि भाग्यात केतू तुम्हाला पराक्रमी बनवेल. भावंडांशी संबंध ताणले जातील. धार्मिक आस्था वाढतील. राशीचे धन स्थानातील गुरूमंगळ स्वभावात सौम्यता आणतील. कुटुंब स्थानात येणारा बुध शुभ घटनांचे संकेत देईल. आर्थिक लाभ होतील. प्रकृतीचे त्रास जाणवतील. जपून रहा. अमावस्या मिश्र फळ देईल. मीन राशी स्वामी गुरू उदित आहे. एकूण शरीर तेजस्वी होईल. सूर्य बुध डोळ्याची काळजी घ्या, अधिकारी व्यक्तींना नाराज करू नका असे सुचवत आहे. सध्याचा काळ हा फार मोठ्या बदलांचा आहे. कुठलेही निर्णय घाईने घेऊ नका. विशेषतः नोकरीसंबंधी सावध रहा. आर्थिक स्थिती ठिक राहिल. अमावस्या व एकूण सप्ताह मध्यम जाईल. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या