मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Sarva Pitru Amavasya Weekly Horoscope : सर्वपित्री अमावस्येनंतरचा तुमचा आठवडा कसा जाईल; पाहा साप्ताहिक राशिभविष्य

Sarva Pitru Amavasya Weekly Horoscope : सर्वपित्री अमावस्येनंतरचा तुमचा आठवडा कसा जाईल; पाहा साप्ताहिक राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज पितृपक्षाचा शेवटचा दिवस. सर्वपित्री अमावस्या. कोणत्या राशीला अमावस्या कशी जाईल पाहा राशिभविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 25 सप्टेंबर 2022. वार रविवार. आज पितृमोक्ष अमावस्या. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा, तर्पण करून श्राद्ध कर्म करण्याचा हा दिवस आहे. पितृभ्यो नमः.

सप्ताहात होणाऱ्या महत्त्वाच्या ग्रह बदलांकडे बघता अतिशय महत्त्वाचा असा हा आठवडा असणार आहे. बलशाली शनी मकर राशीत वक्री अवस्थेत आहे. गुरू मीन राशीत वक्री स्वगृही बलवान आहे. नुकतंच शुक्राचे कन्या राशीत पदार्पण झाले असून सप्ताहाच्या अंती शुक्र अस्त होईल. बुध कन्या राशीत उदित होईल. मंगल वृषभ राशीत असून राहू केतू मेष आणि तुळेत असणार आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र कन्या राशीत चतुर्ग्रही योग निर्माण करेल. या सर्व ग्रहस्थितीनुसार पाहूया बारा राशींचे साप्ताहिक भविष्य.

मेष

राशीतील राहू हा स्वभावात अहंकार आणेल. मन थोडेसे चलबिचल राहिल. शुक्र व गुरू शुभ फल देण्यास तयार आहेत. उत्तम व्यक्तिमत्व, प्रभावशाली बोलणे याने तुमची छाप पडेल. दागदागिने उंची वस्त्र खरेदी कराल. धर्म स्थळांच्या यात्रा, परदेशप्रावस होईल. बंधू भगिनींना शुभ काळ. शनी मित्रमैत्रिणीकडून लाभ मिळवून देईल. सप्ताह सुरुवातीला काहीसा संथ वाटेल. उत्तरार्ध आनंदी जाईल. अमावस्या पितृ स्मरण करून शांततेत घालवा.

वृषभ

राशीत प्रवेश केलेला मंगल सर्वार्थाने शुभ असून पंचम शुक्र आयुष्यातील अनेक रंग भेटवील. उंची वस्त्र, आभूषण, गृहसौख्य व संतातीसुख मिळेल. तसंच सुंदर व्यक्तिमत्व प्राप्त होईल. वाहनसुख मिळेल. दशम स्थानात वक्री शनी कार्यक्षेत्रात जपून राहण्याचे संकेत देत आहे. आई वडिलांच्या प्रकृतीला जपा. आर्थिकदृष्ट्या शुभ काळ आहे. परदेशसंबंधी घटना घडतील. पोटाचे विकार होतील. सप्ताह बरा जाईल.

मिथुन

राशीच्या चतुर्थ स्थानातील शुक्र अवस्तव खर्च करायला लावेल. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. शनीचा अष्टम स्थानातील प्रवास जपून राहण्याचे संकेत देत आहे. सूर्य अधिकारी व्यक्तीची भेट करून देईल. तेज प्रदान करेल. शनी धार्मिक कार्यात सहभाग किंवा लांबचे प्रवास योग आणेल. सप्ताहाची सुरवत काहीशी नकारात्मक होईल मात्र नंतर उत्तम फळ मिळेल. अमावस्या आईवडिलांना घातक. काळजी घ्या.

कर्क

या आठवड्यात अष्टम शनीचा प्रकोप काहीसा कमी होईल. भाग्यातील गुरूची उत्तम साथ आता कर्क व्यक्तींना मिळेल. विवाहाचे प्रस्ताव यायला सुरुवात होईल. परदेशसंबंधी बोलणी, कागदपत्र तयार करण्यास उत्तम काळ आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा. डोळ्याची काळजी घ्या. अमावस्या काहीशी अशुभ असली तरी नंतर आठवडा शुभ फळ देईल.

सिंह

राशी स्वामी रवी कन्या राशीत असून लाभाचे अनेक मार्ग प्रशस्त करेल. गुरू कृपा कमी आहे. जप व दान करणं गरजेचं आहे. कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येतील. त्यांचा फायदा घ्या. धर्माविषयी अनास्था निर्माण होऊ देऊ नका. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. गैरसमज टाळा. सप्ताहाच्या उत्तरार्धात अनुकूल घटना घडतील. अमावस्या आर्थिक चिंतेची.

कन्या

उत्तम आरोग्यासाठी आवश्यक अशा योग आणि ध्यान यांचा आयुष्यात समावेश करा. अष्टम मंगळ राहू कमरेचे त्रास देतील किंवा अचानक उद्भवणारी दुखणी त्रस्त करतील. गुरूबळाची साथ आहे. जोडीदार प्रसन्न राहिल. काहीतरी शुभ कार्यक्रम जोडीने कराल. संताती चिंता वाटेल. राशीतील शुक्र आनंदी घटना घडवेल. तुमचा सर्वत्र नाव लौकीक वाढेल. उत्तम सप्ताह.

तूळ

राशी स्वामी शुक्र व्यय स्थानात ही फारशी अनुकूल परिस्थिती नाही. प्रकृती जपा. मधुमेही व्यक्तींनी काळजी घ्या. गुरू बल कमी आहे. जपून असा. संततीकडे काटेकोर लक्ष असू द्या. जोडीदाराशी सांभाळून राहा. गैरसमज वाढण्याचे संकेत आहेत. राशीतील केतू स्वभावात विरक्ती आणेल. नामजप आणि दान याने फायदा होईल. अमावस्या प्रकृती चिंता देईल. सप्ताह मध्यम.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळाचा वृषभ राशीत प्रवेश जोडीदाराला त्रासदायक राहिल. रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी सावध राहा. शत्रू पिडा होईल. गृह सौख्य, मातृपितृ सुख यात कमी येईल. मात्र गुरू कृपा सर्व संकटातून मार्ग काढेल. संतती आनंदी राहिल. वैवाहिक सुखाचे नवीन पर्व सुरू होईल. सप्ताहाची सुरुवात मध्यम राहिल. अमावस्या काळात जपून रहा.

धनु

राशी स्वामी गुरू मीन राशीत गृह सौख्य, नवीन वास्तू, वाहन सुख देईल. शुक्र दशमात मधुमेही व्यक्तींनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. बहिण भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता. गैरसमज टाळा. चुकीचं बोलणं घात करेल. जोडीदाराला अधिकार प्राप्ती होईल. व्यवसाय उत्तम राहिल. सप्ताहाची सुरवात काहीशी संथ होईल. अमावस्या पितृ चिंतेची.

मकर

राशीतील शनी महाराज पुन्हा अडचणीची वाट दाखवतील. आर्थिक व्यवहार जपून करा. शेअर बाजारात नुकसान होईल. भाऊ बहिणींना सुखद काळ. धार्मिक स्थळांचे प्रवास होतील. संतती काही कलाक्षेत्रात चमकेल. शत्रू पासून सावध रहा. घरामध्ये कटकटीपासून जपा. सप्ताह मध्यम राहिल.

कुंभ

राशी स्वामी शनी वक्री अवस्थेत काहीशी नकारात्मक मानसिकता करेल. आर्थिक नुकसान होईल. मात्र दूरच्या प्रवासाचे बेत ठरू शकतात. त्यात भरपूर खर्च कराल. पैतृक संपत्तीचा लाभ होईल. संतती शिक्षण क्षेत्रात उत्तम चमकेल. सप्ताहात उत्तरार्ध शुभ जाईल. अमावस्येचा काळ अतिशय जपून राहण्याचा आहे.

मीन

राशीतील गुरू, व्यय शनी द्विधा मनस्थिती करेल. आर्थिक उलाढाली होतील. मंगळ कर्ज देऊ किंवा घेऊ नका असं सुचवत आहे. कुटुंबात कलह होईल. मात्र अनेक कलाकारांना हा आठवडा उत्तम जाईल. यश मिळेल. नाव होईल. कमरेच्या दुखण्यापासून जपून रहा. सप्ताहात नुकसानीचा योग आहे. अमावस्येला काळजी घ्या.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs