मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope : पितृपक्षाचा हा सप्ताह कसा जाईल? पाहा या आठवड्याचे राशिभविष्य

Weekly Horoscope : पितृपक्षाचा हा सप्ताह कसा जाईल? पाहा या आठवड्याचे राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य (फोटो सौजन्य - Canva)

साप्ताहिक राशिभविष्य (फोटो सौजन्य - Canva)

या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार आठवड्याचे भविष्य.

आज दिनांक 18 सप्टेंबर 2022 रविवार. आज भाद्रपद कृष्ण नवमी. या सप्ताहात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना म्हणजे शनी महाराज मकर राशीत वक्री अवस्थेत आहेत. तसंच मेष राशीत राहू भ्रमण सुरू असून कन्या राशीत बुधादित्य राज योग आहे . केतू तूळ राशीत भ्रमण करत आहे. मीन राशीमध्ये गुरू स्थित असून लवकरच म्हणजे 24 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. मंगळ वृषभ राशीत असेल. या सर्व ग्रहस्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे भविष्य. (लग्नानुसार). या सप्ताहात अमावास्या दिनांक 25 रोजी आहे. सर्व पितृदेवतांचे श्राद्ध कर्म या दिवशी करावे आणि आशीर्वाद प्राप्त करावा. मेष राशीतील राहू तुम्हाला नवीन वस्तू खरेदी करण्यास प्रवृत्त करेल. आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीकडे लक्ष ठेवा. कुठलेही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. अहंकार आणि मनावरील ताण प्रकृतीला हानिकारक ठरेल. मात्र गुरू मनाचा धार्मिक गोष्टीकडे कल ठेवेल. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश देईल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. षष्ठ स्थानात शुक्र आहे. प्रकृती जपा. एकूण सप्ताह आनंदी आहे. वृषभ राशीतील मंगळ स्वभावात एक प्रकारचा अधिकार आणेल. व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. व्यय राहू खर्चामध्ये वाढ करेल. काही कारणास्तव दवाखान्याची पायरी चढावी लागेल. लाभातील गुरू संततीसाठी शुभ असून नवविवाहिता आनंदाची बातमी देतील. वैवाहिक जीवन सुखाचे राहिल. मात्र गैरसमजातून वाद टाळा. मन धार्मिक गोष्टीमध्ये गुंतवा. एखाद्या समारंभात भाग घ्याल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या महत्त्वाच्या घटना फायद्याच्या ठरतील. सप्ताह अनुकूल. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात असलेले सूर्य बुध घरासाठी खर्चिक बाबी समोर आणतील. प्रवास घडेल. कायदा पाळा. कार्यक्षेत्र मंगळ गुरूच्या शुभ प्रभावात आहे. नवीन संधी मिळतील. वक्री शनी आता अष्टम स्थनाकडे आहे. सावध राहण्याचा काळ आहे. मन शांत ठेवा. छोट्या मोठ्या गोष्टींनी विचलित होऊ नका. संतती चिंता निर्माण होईल. सप्ताह मध्यम फळ देईल. कर्क राशीस्वामी चंद्राचे राशी स्थानातून भ्रमण. आर्थिकदृष्ट्या उत्तम फळ देईल. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. मित्रमैत्रिणी सोबत वेळ घालवाल. कार्यक्षेत्रात राहू नवीन संधी देईल. मात्र सहजपणे कोणतेही काम होणार नाही. शनीची तीव्रता थोडी कमी होईल. घर आणि व्यवसाय यात बदल होऊ शकतो. संधीकडे दुर्लक्ष नको. उत्तम गुरू बळ तुम्हाला सर्व कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल सप्ताह शुभ. सिंह राशी स्वामी रवी द्वितीय स्थनात आहे. काम आणि व्यवसायबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. गुरू बल नसल्याने सांभाळून निर्णय घ्या. भाग्यातील राहू धार्मिक स्थानाचे प्रवास घडवेल. दशम मंगळ सावधगिरीचा इशारा देत आहे. राशीतील चंद्र शुभ प्रभाव देईल. आर्थिक लाभ होतील. एकूण सप्ताहाचे बल उत्तम आहे. कन्या राशी स्वामी बुध स्वस्थानात असून व्यवसाय वृद्धी, प्रवास यात शुभ फळ देईल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आर्थिक आणि सामाजिक प्रभाव वाढेल. अष्टम स्थानातील राहू काही प्रकृतीचे त्रास दाखवत आहे. कंबर आणि स्नायूमध्ये दुखापत असेल तर काळजी घ्या. स्त्रियांनी वेळीच काळजी घेतल्यास त्याचा फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. सप्ताह बरा जाईल. तूळ राशीस्वामी शुक्र व्यय स्थानात येणार आहे. जोडीदाराशी गैरसमजातून वाद होतील. रवी बुध पोटाचे किंवा पायाचे त्रास निर्माण करतील. गुरू षष्ठात आहे. प्रकृती जपा शत्रुत्व होऊ देऊ नका मात्र नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. नातेवाईक भेट संभवते. राशीतील केतू अध्यात्मिक बाजू कडे कल ठेवेल. एकूण सप्ताहात मिश्र फळ मिळेल. वृश्चिक राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात आहे. वैवाहिक जीवन हा या आठवड्याचा केंद्र बिंदू राहिल. जोडीदारासाठी वेळ द्या. चतुर्थ स्थानात वक्री शनी घरामध्ये अशांत वातावरण निर्माण करेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी जपून रहा. जोडीदाराला अधिकार प्राप्तीचे योग येतील. सप्ताहात चंद्र भ्रमण अनुकूल आहे. धनु राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात आहेत. मंगळ षष्ठात आहे. स्वभावात तेज येईल. घरामध्ये काही दुरुस्ती, सुधारणा करण्यास योग्य काळ. नवीन वास्तु योग येतील. वाहन जपून चालवा. आईवडील आनंदी राहतील. संतती काहीशी खर्चिक आणि चैनी बनेल. सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहिल. भावंडांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. सप्ताह मध्यम आहे. मकर राशी स्वामी शनी वक्री आहे. आर्थिक बाबतीत जपून रहा. शेअर मार्केट किंवा अनपेक्षित ठिकाणी धनप्राप्ती होऊ शकते. मात्र व्यवहार जपून करा.भावंडं भेट होईल. संततीसुख भरपूर मिळेल. प्रवास योग येतील. विश्वास ठेवून कार्यक्षेत्रात यश मिळवाल. सप्ताहाचा पूर्वार्ध काही कटकटीचा असेल. उत्तरार्ध मात्र शुभ फल देईल. कुंभ वक्री शनी मानसिकता काहीशी नकारात्मक करेल. खर्चात वाढ होईल. शनी उपासना करणं गरजेचं आहे. कुटुंबात गैरसमज निर्माण होतील. अष्टम सूर्य बुध धार्मिक स्थानाचे प्रवास घडवतील. प्रकृती जपा. आईवडील तुमच्यावर नाराज राहतील. बहिण भावंडं भेट होईल. त्यांच्यासाठी खर्च कराल. सप्ताह एकूण मिश्र फळ देईल. मीन राशीस्वामी गुरू राशीत आहे. सात्विक आणि अध्यात्मिक काळ आहे. काही काळ मंगळ वृषभ राशीत असल्याने स्वभाव तेज होईल. लवकर राग येईल. आर्थिक घडामोडी होतील. प्रवास योग, बंधू भेट संभवते. केतू काही कमरेचे स्नायूंचे विकार निर्माण करेल. जपून रहा. अती दगदग टाळा. सप्ताह मध्यम आहे. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या