Home /News /astrology /

Weekly Horoscope : 'या' आठवड्यात मोठ्या ग्रहांचे राशी बदल; तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

Weekly Horoscope : 'या' आठवड्यात मोठ्या ग्रहांचे राशी बदल; तुमच्या आयुष्यावर काय होणार परिणाम?

सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र स्वराशीत असून उत्तम फळ देईल.

आज दिनांक 01 मे 2022. वार रविवार. आज वैशाख शुक्ल प्रतिपदा. या सप्ताहात अनेक मोठ्या ग्रहांचे राशी बदल झाले. गुरू-शुक्राचा मीनमध्ये तर सूर्याचा मेष राशीत प्रवेश झाला. बुध वृषभ आणि राहू-केतू, मेष आणि तुळ राशीत भ्रमण करीत असून मंगळ कुंभ राशीत आहे. नुकताच झालेला सगळ्यात महत्त्वाचा ग्रह बदल म्हणजे शनीचा कुंभ राशीत प्रवेश. शनी-मंगळ एकत्र आले आहेत. सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र स्वराशीत असून उत्तम फळ देईल. 03 मे रोजी असणाऱ्या अक्षय तृतीया या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्ताच्या सर्वांना शुभेच्छा. या ग्रहस्थिती नुसार पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीत नुकताच आलेला राहू चंद्र ग्रहण योग आणि अमावस्या सुरवातीला जरा उद्विग्न मन:स्थिती करेल. शनी आणि मंगळाचा राशी बदल लाभ स्थानात झाला असून मित्रमंडळीकडून मदत मिळेल. संतती चिंता वाटेल. गुरू शुक्र लाभाचे अनेक मार्ग प्रशस्त करतील. धार्मिक बाबीसाठी खर्च होईल. राशीतील रवी अधिकारी वर्गाची भेट होईल असं सुचवत आहे. प्रवास योग आनंद देतील. सप्ताह उत्तम फळ देईल. वृषभ दशमातील मंगळ शनीसोबत येणार आहे. अचानक एखादी नवीन संधी चालून येईल. ज्यात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नाव होईल. आनंद देणारा हा काळ आहे. व्यय राहू आणि केतू आरोग्य सांभाळा, असे संकेत देत आहे. भाग्यातील ग्रहामुळे काही मोठ्या पूजा वगैरे होतील. रवी अधिकारी वर्गाकडून लाभ मिळवून देतील. प्रकृती जपून रहा. राशीतील चंद्रामुळे सप्ताह आनंदात जाईल. मिथुन राशी स्वामी बुध व्ययात चंद्रासोबत येणार आहे. अधिकार प्राप्ती, प्रमोशन, अकल्पित लाभ असा हा काळ आहे. गुरू-शुक्र आर्थिक लाभ घडवतील. मात्र प्रकृतीची तक्रार आता कमी होईल. भाग्यात प्रवेश करणारे मंगळ-शनी नवीन आनंदाच्या संधी मिळवून देतील. उत्तरार्ध अनुकूल असून उपासना करा. कर्क राशीच्या भाग्य स्थानात गुरू-शुक्र असून तुम्हाला अधिकारी वर्ग मदत करेल. प्रमोशनचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदारासाठी अनुकूल काळ आहे. प्रकृती सांभाळा. या काळात शिधा दान करा. प्रवास टाळणं योग्य राहील. दशम स्थानात आलेला राहू स्थान बदल करेल. गुरू बल उत्तम असल्यामुळे आनंदी राहाल. शनी-मंगळाचा अष्टम स्थानात प्रवेश होणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. सप्ताह चांगला जाईल. सिंह राशी स्वामी रवी भाग्यस्थानात असून अधिकारी वर्ग भेटेल. बढतीचे योग. सप्तमात येणारा शनी-मंगळ कुटुंबात ताण पसरवेल. शनी-मंगळ काही आर्थिक बाबतीत त्रास होतील असं सुचवत आहेत. दूरच्या नातेवाईकांना, मित्रांना भेटण्यासाठी  संधी येईल. राहू मन अस्थिर ठेवेल. सप्ताह मध्यम जाईल. कन्या राशी स्वामी बुध भाग्यस्थानात स्वतःची आणि जोडीदाराची भरभराट होईल. त्यांना अधिकार मिळेल. व्यवसाय धंद्यात चांगला लाभ होईल. संतती चिंता कमी होईल. गुरू महाराज शुभ फळ देतील. मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. आठवा राहू विचित्र काही त्रास होण्याची शक्यता दाखवतो. काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. षष्ठ शनी शत्रू पिडा होईल. सप्ताह मध्यम जाईल. तूळ राशी स्वामी शुक्र षष्ठ स्थानात प्रवेश करीत असून गुरूसोबत शुभ योग करेल. शनी-मंगळ पंचमात संततीसाठी उत्तम काळ. घर आणि वाहन खरेदी कराल. आर्थिक गणित जुळून येतील. रवी नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम आहे. आर्थिकदृष्ट्या बरा काळ. मन अस्वस्थ राहिल. सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ शनीसोबत असून पुढील काही दिवस सावध राहण्याचे आहेत. चतुर्थ स्थानात घर आणि वाहन यासंबंधी शुभ सूचना देतील. गृहकलह टाळा. संततीकडे लक्ष द्या. त्यांना उत्तम काळ आहे. या काळात काही समस्या निर्माण होतील. सप्तम चंद्र जोडीदाराला उत्तम असून सप्ताह शुभ जाईल. धनु राशी स्वामी गुरूसोबत येणारा शुक्र दूरचे प्रवास योग आणेल. भावंडाना शुभ फळ देईल. वाहन खरेदी होईल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. घरामध्ये काही बदल कराल. नवीन वास्तूयोग येतील. ह्या काळात काही नवीन सुरुवात करू शकता. सप्ताह सर्व तऱ्हेने शुभ संकेत देईल. आर्थिक दृष्ट्या भक्कम राहिल. मकर राशीतील शनी आता समाप्त होणार असून एक मोठा सुटकेचा श्वास घेता येईल. सप्ताहात मंगळ-शनी कुंभ राशीत एकत्र असून आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. तसंच खर्चदेखील होतील. गुरू शुक्र प्रवास योग आणतील. संततीकडे लक्ष द्या. चतुर्थ राहू स्थान बदलाचे योग आणेल. सप्ताह शुभ आहे. कुंभ राशीत प्रवेश करणारे शनी-मंगळ सावध राहण्याचे संकेत देत आहे. स्वभाव उग्र होईल. जोडीदाराशी जपून रहा. गैरसमज करू नका. आर्थिक बाजू भक्कम राहिल. उष्णतेचे विकार होतील. प्रकृती जपून राहा. उत्तम वस्तूंची खरेदी होईल. घरामध्ये शुभकार्य होण्याचे संकेत आहेत. सप्ताह आनंदात जाईल मीन गुरू महाराज शुक्रसोबत राशी स्थानात आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. पूर्वार्ध नवीन संधी मिळतील. जोडीदाराची भरभराट होईल. राशीतील रवी-बुध अधिकार प्राप्ती करून देतील अचानक अर्थ प्राप्ती होईल. अक्षयतृतीया आनंदात साजरी कराल. शुभम भवतू,!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या