Home /News /astrology /

साप्ताहिक राशीभविष्य: मकर, कर्क यांनी या आठवड्यात सांभाळून राहा; वृषभेसाठी उत्तम सप्ताह

साप्ताहिक राशीभविष्य: मकर, कर्क यांनी या आठवड्यात सांभाळून राहा; वृषभेसाठी उत्तम सप्ताह

चंद्र आज मिथुन राशीत असेल. आज मंगळ वृश्चिक राशीतील वास्तव्य संपवून धनू राशीत प्रवेश करणार असून. तिथे असलेल्या शुक्राशी योग करेल.

मुंबई, 16 जानेवारी- आज दिनांक 16 जानेवारी 2022 रविवार. तिथी पौष चतुर्दशी. चंद्र आज मिथुन राशीत असेल. आज मंगळ वृश्चिक राशीतील वास्तव्य संपवून धनू राशीत प्रवेश करणार असून. तिथे असलेल्या शुक्राशी योग करेल. सूर्य, शनी, बुध (वक्री) मकर राशीत तर, गुरू कुंभ राशीत असेल. राहू, केतू, वृषभ अणि वृश्चिक राशीत असतील. या ग्रह स्थितीनुसार पाहुया बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशीच्या दशमात सूर्य शनी, बुध तर भाग्यात मंगळ, शुक्र ही ग्रहस्थिती कार्यक्षेत्रात अनेक नवीन घडामोडी घडवून आणेल. नवीन व्यक्तींचा परिचय होईल. त्यातून आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. वडिलांशी मतभेद, त्यांच्या आरोग्य संबंधी काही चिंता निर्माण होतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. गुरू लाभ स्थानात शुभ फळ देईल. संतती सुख चांगले राहील. सप्ताहात उत्तम फळ मिळेल. वृषभ राशी स्वामी शुक्र, मंगळ ग्रहांसोबत अष्टम स्थानात येणार आहे. शारीरिक, स्त्रीरोगसंबंधी काही समस्या निर्माण होतील. वेळीच तपासणी करा.  शुक्र आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. खर्च होतील. भाग्य स्थानातील ग्रह शुभ असून, धार्मिक निष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील गुरू नवीन संधी मिळवून देईल. अधिकारी व्यक्तीशी भेट होईल. वातावरण चांगले राहील. शुभ सप्ताह. मिथुन राशी स्वामी बुध अष्टमात शनी आणि सूर्यासोबत कठीण परिस्थितीला समोर जावे लागेल. प्रकृती सांभाळून असावे. मानसिक ताण, श्वासांचे त्रास, डोळ्याचे त्रास संभवतात. अष्टमात ग्रह आर्थिक लाभ मिळवून देतील. भाग्यात आलेला गुरू लांबचे प्रवास योग आणेल. मंगळ शुक्र वैवाहिक जीवनात गैरसमज निर्माण करतील. धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संतती सुख चांगले राहील. सप्ताहात मिश्र फळ मिळेल. कर्क राशी स्वामी चंद्र सप्ताहाच्या सुरवातीला व्यय स्थानात आहे. मानसिक द्वंद्व चालू राहील. वारंवार येणार्‍या नैराश्याचा सामना करावा लागेल. अष्टमात गुरू सध्या मदत करणार नाही. पण लवकरच स्थिती बदलेल. षष्ठ स्थानात येणारे  मंगळ, शुक्र प्रकृतीची काळजी घ्यावी, असे सुचवत आहेत. मधुमेही व्यक्तींनी जपून राहावे. नोकरीमध्ये नवीन संधी मिळतील. पण काही दिवस शांत रहा असे ग्रह संकेत आहेत. सिंह राशी स्वामी रवी, शनीसोबत स्थिती असून, मानसिक ताण जाणवेल. कार्यक्षेत्रातील अडचणी, वरिष्ठांची नाराजी, वडिलांचे आरोग्य अशा समस्या निर्माण होतील. मात्र वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. पंचम मंगळ शुक्र अनुकूल आहेत. स्थान बदल घडवून आणेल. संतती सुख चांगले राहील. षष्ठ स्थानात रवी रोग अणि शत्रू पराजित होतील. आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. कन्या या सप्ताहात होणारे मंगळ भ्रमण चतुर्थ स्थानात असून, घरांमधे काही विशिष्ट घटना घडतील. जास्ती जबाबदारी येऊ शकते. नवीन खरेदी होईल. प्रकृती जपा. काहींना अचानक संतती चिंता सतावू शकते. षष्ठ गुरू हा पोटाच्या किंवा इतर आरोग्य समस्या निर्माण करेल. पण त्यापासून मुक्ती ही देईल. अकस्मात लाभ होतील. सप्ताहात अनुकूल फळ मिळेल. तूळ राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानात मंगळासोबत आहे. प्रवास, बहीण भावंडांची भेट, त्यापासून काही नवीन लाभ असे फळ देईल. आकर्षक व्यक्तिमत्त्व, वाणी बहाल करेल कलाकारांना उत्तम संधी मिळतील. पंचमात गुरू शैक्षणिकदृष्ट्या अतिशय शुभ फळ देणार आहे. चतुर्थ स्थानातील रवी, शनी वडील, नोकरी आणि प्रकृती यासंबंधी काही अडचणी निर्माण करतील. जपून असा रवी उपासना करत रहा. सप्ताह मध्यम जाईल. वृश्चिक राशीत मंगळ आता राशी बदल करणार असून,  धनू राशीत शुक्रासोबत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. पण खर्च होतील. आकर्षक व्यक्तिमत्त्व,ओजस्वी वाणी बहाल करेल. गुरू गृह सौख्याच्या पर्वाची सुरुवात करेल. तृतीय शनी रवी मोठ्या भावंडाची प्रकृती जपा असे सांगत आहेत. मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रवास सांभाळून करा. सप्ताहात मिश्र फळ मिळेल. पूर्वार्ध त्रासाचा जाईल. धनू राशीत भ्रमण करणार मंगळ शुक्र नवीन आणि आकर्षक व्यक्तीशी भेट घडवून आणतील. भावंडाची गाठभेट होईल. त्यांच्याशी संबंध सुधारतील. कर्ज काढण्याची निकड भासेल. मात्र शत्रूवर विजय मिळवून पुढे जाणार आहात. देश विदेशात प्रवास संभवतात. वाणीमध्ये माधुर्य येईल. साडेसाती आता शेवटच्या टप्प्यात आहे. उत्तर फळ देऊन जाईल. मकर राशीत शनी रवी बुध थोडे अस्वस्थ करणारे ग्रहमान आहे. वडील व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. नकारात्मक मानसिकता होईल. व्यय स्थानात आलेले मंगळ शुक्र खर्चात वाढ करणार आहेत. दवाखान्याची फेरी होऊ शकते. मात्र गुरू कृपा आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत यशस्वी होणार आहात. कुंभ राशी स्वामी शनि व्यय स्थानात रवीसोबत कायदेशीर बाबी पडून जपावे, कुठल्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करू नये असे सुचवत आहेत. आरोग्य समस्या वेळीच सोडवा. राशीतील गुरू मदत करेल. लाभ स्थानातील मंगळ, शुक्र मित्र मैत्रिणींना भेटणे, प्रवास असा अनुभव देतील. संतती सुख चांगले राहील. अनुकूल सप्ताह असून, आर्थिक स्थिती ठीक राहील. मीन सप्ताहात होणारे मंगळ भ्रमण दशम स्थानात होईल. स्त्रीवर्ग सहकार्य करणार आहे. मात्र कार्य क्षेत्रात सांभाळून रहा. नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील. व्यय स्थानात गुरू धार्मिक कार्य, त्यासाठी खर्च असे फळ देतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर होणार आहे. सूर्य बुध लाभ स्थानात उत्तर फळ देतील. सप्ताहात अनुकूल फळ मिळेल.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या