मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Weekly Horoscope : आठवडा शुभ जाईल पण...; पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope : आठवडा शुभ जाईल पण...; पाहा तुमचं साप्ताहिक राशिभविष्य

Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार या आठवड्याचे बारा राशींचं भविष्य.

Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार या आठवड्याचे बारा राशींचं भविष्य.

Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहस्थितीनुसार या आठवड्याचे बारा राशींचं भविष्य.

आज दिनांक 03 एप्रिल 2022 रविवार. आज चंद्र मेष राशीत भ्रमण करेल. या आठवड्यातील ग्रहस्थिती गुरू शुक्र कुंभ राशीत आहेत. रवी बुध मीन राशीत तर राहू मेष, केतू तूळ राशीत आहेत. शनी मंगळ मकर राशीत आहेत. या आठवड्यात मंगळ दिनांक 07 एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. शनि मंगळ युती संपून गुरू मंगळ एकत्र येतील.पाहूया या आठवड्याचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीत नुकताच आलेला राहू चंद्र ग्रहण योग सुरवातीला जरा उद्विग्न मन:स्थिती करेल. मंगळाचा राशी बदल लाभ स्थानात होणार असून मित्र मंडळीकडून मदत मिळेल. गुरू शुक्र लाभाचे अनेक मार्ग प्रशस्त करतील. व्यय रवी बुध कायद्याचे बंधन पाळा असं सुचवत आहे. प्रवास योग आनंद देतील. सप्ताह उत्तम फळ देईल. वृषभ दशमातील गुरू मंगळ शुक्रासोबत येणार आहे. अचानक एखादी नवीन संधी चालून येईल. ज्यात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नाव होईल. आनंद देणारा हा काळ आहे. व्यय राहू आणि केतू आरोग्य सांभाळा असे संकेत देत आहे. भाग्यातील ग्रहामुळे काही पूजा वगैरे होतील. रवी बुध अधिकारी वर्गाकडून लाभ मिळवून देतील. प्रकृती जपून रहा. सप्ताह आनंदात जाईल. मिथुन राशी स्वामी बुध दशमात रवि सोबत आहे. अधिकार प्राप्ती, प्रमोशन, अकल्पित लाभ असा हा काळ आहे. गुरू मंगळ शुक्र आर्थिक लाभ घडवतील. मात्र प्रकृतीची तक्रार सुरू राहिल. भाग्यात प्रवेश करणार शुक्र गुरू नवीन आनंदाच्या संधी मिळवून देतील. उत्तरार्ध अनुकूल असून उपासना करा. कर्क राशीच्या भाग्य स्थानात रवी बुध असून तुम्हाला अधिकारी वर्ग मदत करेल प्रमोशनचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदारसाठी फारसा अनुकूल काळ नाही. प्रकृती सांभाळा. या काळात शिधा दान करा. प्रवास टाळणं योग्य राहिल. दशम स्थानात आलेला राहू स्थान बदल करेल. गुरू बल कमी असल्यामुळे जरा जपून रहा. मंगळाचा अष्टम स्थानात प्रवेश होणार आहे. सप्ताह चांगला जाईल. सिंह राशी स्वामी रवी अष्टमात बुधासोबत असून पोटासंबंधी विकार देतील. सप्तमात येणारा शुक्र गुरू मंगळ कुटुंबात आनंदीआनंद पसरवेल. शनी मंगळ काही आर्थिक बाबतीत त्रास होतील असं सुचवत आहेत. दूरच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संधी येईल. राहू मन शांत ठेवेल. सप्ताह उत्तम जाईल. कन्या राशी स्वामी बुध रवि बरोबर जोडीदाराची भरभराट होईल. त्यांना अधिकार मिळेल. व्यवसाय धंद्यात चांगला लाभ होईल. संतती चिंता सतावेल. गुरू महाराज शुभ फल देतील. मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. आठवा राहू विचित्र काही त्रास होण्याची शक्यता दाखवतो. काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. शत्रू पिडा होईल. सप्ताह मध्यम जाईल. तूळ राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात प्रवेश असून गुरू सोबत शुभ योग करेल. तिथेच येणारा मंगळ संतती साठी उत्तम काळ. घर आणि वाहन खरेदी कराल. आर्थिक गणित जुळून येतील. रवी बुध नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम आहे. आर्थिक दृष्ट्या बरा काळ. मन अस्वस्थ राहिल. सप्ताह मध्यम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरू सोबत युती करणार असून पुढील काही दिवस सावध राहण्याचे आहेत. चतुर्थ स्थानात शुक्र गुरू घर आणि वाहन या संबंधी शुभ सूचना देतील.संतती कडे लक्ष द्या. त्यांना उत्तम काळ आहे. या काळात काही समस्या निर्माण होतील. सप्ताह शुभ जाईल. धनु राशी स्वामी गुरू सोबत येणारा शुक्र मंगळ दूरचे प्रवास योग आणेल. भावंडाना शुभ फळ देईल .महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. घरामध्ये काही बदल कराल. नवीन वास्तूयोग येतील.ह्या काळात काही नवीन सुरवात करू नका. सप्ताह सर्व तऱ्हेने शुभ संकेत देईल. आर्थिक दृष्ट्या भक्कम राहिल. मकर राशीतील शनी मंगळ युती आता समाप्त होणार असून एक मोठा सुटकेचा श्वास तक्ता येईल. सप्ताहात मंगळ गुरू आणि शुक्र एकत्र असून आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. तसेच खर्च देखील होतील. संततीकडे लक्ष द्या. चतुर्थ राहू स्थान बदलाचे योग आणेल. सप्ताह शुभ आहे. कुंभ राशीत प्रवेश करणार मंगळ सावध राहण्याचे संकेत देत आहे. स्वभाव उग्र होईल. जोडीदाराशी जपून रहा. गैरसमज करू नका. आर्थिक बाजू भक्कम राहिल. उष्णतेचे विकार होतील. प्रकृती जपून राहा. उत्तम वस्तूंची खरेदी होईल. सप्ताह आनंदात जाईल. मीन गुरू महाराज शुक्रसोबत व्यय स्थानात आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. पूर्वार्ध नवीन संधी मिळतील. जोडीदाराची चिंता राहिल. राशीतील रवी बुध अधिकार प्राप्ती करून देतील अचानक अर्थ प्राप्ती होईल. नवे वर्ष आणि गुढीपाडवा आनंदात साजरा कराल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या