आज दिनांक 23 जानेवारी 2022 रविवार. आजच्या ग्रहस्थिती नुसार चंद्र कन्या राशीत तर सूर्य शनी बुध मकर राशीत आहेत. शुक्र मंगल धनु आणि गुरू कुंभ राशीत भ्रमण करीत आहे. राहू केतू वृषभ आणि वृश्चिक राशीत असून आजची महत्त्वाची घटना म्हणजे मकर राशीत होणारा शनि अस्त. तसंच या सप्ताहात शुक्र मार्गी होईल. पाहूया हा आठवडा काय फळ घेऊन आला आहे. (लग्नानुसार)
मेष
राशी स्वामी मंगल भाग्यस्थानात शुक्रासोबत असून भाग्याचे, कुटुंबात आनंदाचे पर्व सुरू करणार आहे. स्वभाव काहीसा उत्तेजित राहिल. मित्रमैत्रिणी मदत करतील. आकर्षण वाढेल. अस्त शनि कार्यक्षेत्रात अडकलेली काम मार्गी लावेल. आर्थिक चिंता कमी होईल. सप्ताह रोग चिंतेचा आहे. नकारात्मकता दूर करण्यासाठी सूर्य उपासना करा.
वृषभ
राशी स्वामी शुक्र अष्टमात स्त्री रोग प्रजननसंस्थेच्या काही समस्या समोर येऊ शकतात. नवविवाहितांना गोड बातमी येऊ शकते. मात्र हा महिना जपण्याचा आहे. भाग्यातील अस्त शनि मार्गातील अडथळे दूर करेल. वडिलांशी संबंध सुधारतील. धार्मिक कार्य कराल. राशीतील राहू आता सौम्य झाला आहे तरी मानसिक स्वास्थ्य जपणे गरजेचे आहे. चंद्र भ्रमण शुभ आहे. सप्ताह चांगला जाईल. मंगळ जप आणि दान करावे.
मिथुन
अष्टमस्थ ग्रहांच्या पार्श्वभूमीवर प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी सुरू राहतील. धनु राशीतील मंगळ शुक्र अकस्मात घटना घडण्याची शक्यता निर्माण करतील. वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. त्यानुसार योग येतील. भाग्य स्थानातील गुरू संततीकारक आहे. नवीन जोडप्यांना संतान प्राप्तीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी थोडा आराम आहे. अष्टमात अस्त शनि काही रोग संबंधी त्रास निर्माण करेल. अचानक घडणार्या घटना चकित करतील. सप्ताह मिश्र फळ देईल
कर्क
राशी स्वामी चंद्र सप्ताहाच्या सुरवातीला तृतीय स्थानात आहे. प्रवास, मानसिक आंदोलने दर्शवतो. मनाला जपा. नैराश्यवादी विचार नको. अष्टमात गुरू आहे आध्यात्मिक प्रगती होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल. मंगल कधीतरी स्फोटक परिस्थिती निर्माण करेल. संतती चिंता लागून राहिल. मात्र एकूण सप्ताह गडबडीत तरीही ठीक जाईल. उत्तरार्ध अनुकूल.
सिंह
राशी स्वामी रवि शनिच्या राशीत आहे. एकूण बौद्धिक प्रगती करणारा सप्ताह आहे. बुध त्यात रविची साथ देईल. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील आणि पंचम स्थानात मंगळ शुक्र व्यक्तीनी जपून राहावं, ताण घेऊ नये असे सुचवत आहे. जोडीदाराला शुभ फळ देणारा काळ आहे. आईवडील तुमच्यावर खुश होणार आहेत. उत्तरार्ध अनुकूल.
कन्या
मंगळ चतुर्थ स्थानात शुक्रासोबत आहे, काही गैरसमज होतील. मात्र घरात छान खरेदी होईल. आईशी सांभाळून राहावे. प्रवास योग येतील. त्यात दगदग करू नका. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. छातीसंबंधी समस्या निर्माण होतील. सूर्य कार्यक्षेत्रात अधिकारी व्यक्तीशी भेट घडवून देईल. बदली, वास्तूसंबंधी निर्णय यात हा आठवडा चांगलं फळ देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल.
तुला
राशी स्वामी शुक धनु राशीत तृतीय स्थानात भ्रमण करणार असून वाहन प्राप्तीचे योग येतील. समारंभ, नातेवाईकांच्या भेटी होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहिल. मात्र अवाजवी खर्च वाढेल. संसर्गजन्य रोग होतील. शैक्षणिकदृष्ट्या शुभ काळ आहे. भावंड तुमच्यावर प्रसन्न आहेत. तसेच संतानसंबंधी समस्या सुटणार आहेत. राहू मात्र जपून राहण्याचे संकेत देत आहे. सप्ताह अनुकूल आहे.
वृश्चिक
धन स्थानातील मंगळ शुक्र अकस्मात घटना घडण्याची शक्यता निर्माण करतात. प्रकृतीची काळजी घ्या. रक्तदाब, पोटाची दुखणी, उष्णतेचे विकार यापासून सावध रहा. स्वभावधर्म रागीट आणि चिडचिडा होईल. काळजी घ्या. आर्थिक नियोजन नीट करा. मात्र गुरू शुभ आहे घर, वाहन खरेदी होणार आहे. घरात समारंभ घडतील. आत्मविश्वास वाढेल. सप्ताह अनुकूल आहे.
धनु
राशीतील मंगळ शुक्र आकर्षक व्यक्तीशी भेट घडवून देईल. अकस्मात लाभ होतील. नवीन ओळखी होतील. अतिशय फायदा करून देणारा हा आठवडा आहे. व्ययस्थानातील केतू प्रकृतीसंबंधी तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका असे सुचवत आहे. खर्च, प्रवास होतील. कायदा पाळा. शुक्राचे पाठबळ आणि गुरुकृपा यामुळे सप्ताहात अनुकूल फळ मिळेल.
मकर
राशीच्या धनस्थानातील गुरू आर्थिक स्थिती, पैतृक संपत्तीसंबंधी फळ देईल. परिवारातील सदस्य प्रेमानी वागतील. राशीच्या व्ययस्थानातील मंगळ शुक्र कायदेशीर बाबी, दवाखान्याची वारी दाखवत आहे. केतू भ्रमण मित्रमैत्रिणींसोबत संबंध बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. समारंभाचे आयोजन केले जाईल. राशीतील शनि, सूर्य मन थोडे अस्वस्थ करतील. आर्थिक बाजू ठिक राहिल. अचानक घडणार्या घटना चकित करतील. सप्ताह मध्यम आहे
कुंभ
व्यवसाय करणार्या व्यक्तीनी अत्यंत सांभाळून काम करावे. कामाच्या ठिकाणी अचानक काही नवीन संधी मिळतील. मुलाखत यशस्वी होईल. प्रकृती साथ देईल. व्यय स्थानात सूर्य शनी खर्चाचे नवीन मार्ग उघडणार आहेत. कायद्याचे बंधन पाळा. परदेशी प्रवासासाठी अनुकूल काळ आहे. आईवडील, कुटुंबीय यासाठी वेळ काढा. आर्थिक बाजू ठिक राहिल. सप्ताह शुभ.
मीन
जरी बारावा गुरू असला तरी तो धार्मिक कार्याकरता चांगले फळ देणार असून आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल. मंगल कार्याची नांदी होईल. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात यश मिळेल. घरांमध्ये समारंभ होईल. सप्ताह भाग्यशाली ठरेल. संतती सुख मिळेल. शैक्षणिक दृष्ट्या मध्यम जाईल.सप्ताहात मिश्र फळ मिळेल.
शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.