मुंबई, 30 नोव्हेंबर : ज्या लोकांच्या कुंडलीत जन्माच्या वेळी चंद्र वृश्चिक राशीत असतो. त्या व्यक्तीची राशी वृश्चिक असते. जन्मकुंडली आणि राशिचक्रांचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो. प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि काही अवगुण असतात. प्रत्येक राशीच्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते आणि प्रत्येकाची खासियत व्यक्तिमत्वानुसार बदलते. ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीचे लोक सर्व राशींमध्ये सर्वात मेहनती आणि समर्पित मानले जातात. या राशीचे लोक त्यांच्या कामाबद्दल उत्साही असतात. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी वृश्चिक राशीच्या लोकांबद्दल सांगितले माहिती पाहुया.
वृश्चिक व्यक्तिमत्व आणि स्वभाव -
वृश्चिक राशीचे लोक आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक असतात. कोणतंही काम करायचं ठरवलं तर ते प्रामाणिकपणे पूर्ण करतात आणि काम पूर्ण झाल्यावरही ते सहजासहजी समाधानी होत नाहीत. या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते. या राशीचे लोक त्यांच्या फनी स्टाइलसाठी ओळखले जातात.
हे वाचा - उत्साही, हजरजबाबी तर असतातच! मिथुन राशीच्या लोकांचे हे गुण गर्दीतही वेगळे दिसतात
आपले काम आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे या लोकांना त्यांच्या बहुतेक कामात यश मिळते. या राशीचे लोक आदर्शवादी असतात आणि त्यांचे जीवन त्यांच्या मूल्य-तत्वांनुसार जगतात. हे लोक त्यांचे मित्र आणि जीवनसाथी यांच्याशी विश्वासू असतात. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात.
हे वाचा - प्रामाणिकपणा म्हटलं की वृषभ राशीचे लोक; त्यांचे हे गुण चारचौघात वेगळी छाप सोडतात
वृश्चिक राशीच्या लोकांचे अवगुण -
वृश्चिक राशीचे लोक आपल्या पद्धतीनं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांचं बहुतेक लोकांशी जुळत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, हे लोक दुराग्रही स्वभावाचे असतात आणि छोट्या-छोट्या गोष्टीतही त्यांचा संयम सुटतो. जीवनात अनेक वेळा यामुळे त्यांना नुकसानही सहन करावे लागते. अनेकवेळा वृश्चिक राशीच्या लोकांना छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही जवळ राहणाऱ्या लोकांचा हेवा वाटू लागतो. हे लोक स्वभावाने कठोर, हट्टी आणि गर्विष्ठ स्वभावाचेही असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rashibhavishya, Rashichark