आज दिनांक 27 नोव्हेंबर 2022. आज रविवार मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी. विनायक चतुर्थी.आज चंद्राचे भ्रमण धनु राशीतून असेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
तृतीय स्थानातील मंगळ प्रवास आणि भावंडांशी कलह निर्माण करेल. भाग्येश गुरू व्यय स्थानात आहे. भाग्य चंद्र धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी वेळ द्याल. मैत्रीसाठी विशेष काही करणारा दिवस आहे. चांगला दिवस.
वृषभ
मंगळ वृषभ राशीत स्वभाव आक्रमक करेल. राग आवरा. जास्तीचं काम पडेल. कुटुंबात कलह टाळा. डोळ्याचा त्रास होईल. अष्टम चंद्र मानसिक दृष्ट्या कठीण. दिवस मध्यम जाईल.
मिथुन
राशीच्या सप्तम स्थानात चंद्र परिस्थितीत बदल घडवून आणेल. मित्रमंडळी भेटतील. प्रकृती ठिक राहिल. संतती आनंदी राहिल. शुक्र भ्रमण गृहसौख्य देईल. दिवस बरा आहे.
कर्क
सहाव्या स्थानात प्रवेश करणार चंद्र शुभ आहे. मात्र मंगळ काही काळ नोकरी व्यवसायात काळजी घेण्याचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. शुक्र संतती सुख, सुंदर व्यक्तिमत्व देईल. दिवस शुभ.
सिंह
पंचम स्थानात चंद्र जास्तीच्या जबाबदारीची तयारी ठेवा असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून घरात काही धार्मिक पूजा इत्यादी जोडीने कराल. दिवस शुभ.
कन्या
चतुर्थ स्थानातील चंद्र आर्थिक पाठबळ देइल. घरात मनासारखं होईल. मंगळ काम निमित्त भ्रमण प्रवास घडवून आणेल. घरातही वेळ द्या. अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.
तूळ
जोडीदारासंबंधी चिंता, अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. आर्थिक नुकसान होईल. पोटाची काळजी घ्या. चंद्र भ्रमण घरात वेळ घालवा असं सुचवत आहे.
वृश्चिक
राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात आणि राहू षष्ठ स्थानात असून पारिवारिक किंवा आर्थिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. संततीसोबत काही वेळ घालवा. घरासाठी दिवस उत्तम.
धनु
आज चंद्र घराबाबत काही तणाव निर्माण करणार असून प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. रक्तदाब असणाऱ्यांनी काळजी घ्या. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. दिवस मध्यम.
मकर
राशीत शनी आणि पंचम मंगळ हा संततीसाठी त्रासदायक ठरेल. व्यय चंद्र आहे आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. नातेवाईक भेट होईल. मध्यम दिवस.
कुंभ
शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. मंगळ आणि चंद्र घरामध्ये काही शुभ घटना होण्याची शक्यता. सामाजिक दृष्ट्या दिवस मध्यम.
मीन
लाभ स्थानातील शनी आणि द्वितीय राहू आर्थिक बाबीत जपून राहण्याचा संकेत देत आहे. कार्यक्षेत्रात लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू शुभ फल देईल. चंद्र प्रवास आणि संपर्क घडवेल. दिवस मध्यम.
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs