मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Venus Transit : शुक्राने बदलली रास; बारा राशींच्या आर्थिक आणि नातेसंबंधावर असा होणार परिणाम

Venus Transit : शुक्राने बदलली रास; बारा राशींच्या आर्थिक आणि नातेसंबंधावर असा होणार परिणाम

विवाह, प्रेम, कला, सुख-समृद्धी या गोष्टी शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. त्यामुळे शुक्राचं राश्यांतर या गोष्टींवर परिणाम करताना दिसतं.

विवाह, प्रेम, कला, सुख-समृद्धी या गोष्टी शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. त्यामुळे शुक्राचं राश्यांतर या गोष्टींवर परिणाम करताना दिसतं.

विवाह, प्रेम, कला, सुख-समृद्धी या गोष्टी शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. त्यामुळे शुक्राचं राश्यांतर या गोष्टींवर परिणाम करताना दिसतं.

मुंबई, 14 जुलै : एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह (Planet) राश्यांतर (Transit) करतो. ग्रहांच्या राशिपरिवर्तनाचा, ग्रहयोगांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळे ग्रहांचं राशिपरिवर्तन कोणत्या राशीला कसं फलदायी ठरू शकतं, याचा अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. नवग्रहांपैकी रवी, चंद्र, बुध, शुक्र आणि मंगळ हे ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशिपरिवर्तन करतात. परंतु, शनी, गुरू हे ग्रह एका राशीत दीर्घ काळ असतात. नवग्रहांपैकी शुक्र (Venus) ग्रहाने बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश केला आहे. विवाह, प्रेम, कला, सुख-समृ्द्धी या गोष्टी शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. त्यामुळे शुक्राचं राश्यांतर या गोष्टींवर परिणाम करताना दिसतं. शुक्राचं मिथुन राशीतलं भ्रमण बारा राशींसाठी (Zodiac Signs) महत्त्वाचं ठरणार आहे. त्याविषयी जाणून घेऊ या.

मिथुन ही वायुतत्त्वाची रास आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध (Mercury) हा शुक्राचा मित्रग्रह मानला जातो. राशिचक्रात मिथुन रास स्वच्छंदी समजली जाते. त्यामुळे या राशीचे अनेक गुणधर्म शुक्राशी मिळतेजुळते असतात. 13 जुलै रोजी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करत आहे. 7 ऑगस्ट 2022 पर्यंत शुक्र मिथुन राशीत असेल. त्यानंतर तो चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करील. मिथुन राशीतलं शुक्राचं भ्रमण काही राशींसाठी विशेष फलदायी ठरेल, असं अ‍ॅस्ट्रो जिंदगीचे संस्थापक आणि अ‍ॅस्ट्रोलॉजर नीरज धनखेर यांनी सांगितलं.

मेष ( Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचं मिथुनेतलं भ्रमण विशेष फलदायी ठरेल. येत्या आठवड्यांमध्ये तुमचं प्रेमजीवन अधिक चांगलं होईल. तुम्ही जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवाल. शारीरिक संबंधावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही जोडीदारासोबत चांगले मानसिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करा. नवविवाहित जोडप्याची अपत्याबाबतची अपेक्षा पूर्ण होऊ शकते. जे सर्जनशील प्रयत्नांचा पाठपुरावा करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा व्यक्तींना अनेक संधी मिळतील.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या व्यक्ती या कालावधीत प्रियजनांसोबत सुट्टीचा आनंद घेऊ शकतील. तुमचा स्वाभिमान वाढेल. आजूबाजूची माणसं तुमच्या व्यक्तिमत्त्वानं प्रभावित होतील. पैशांची बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय शोधण्याकरिता हा कालावधी उत्तम आहे. कलाकार आणि गायकांना थेट प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळेल.

मिथुन (Gemini) : शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल जाणवतील. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा कालावधी खूप चांगला ठरेल. नातं अधिक दृढ होईल. जे अविवाहित आहेत त्यांना नवीन व्यक्तींशी परिचय वाढवणं फायदेशीर ठरेल. तुमचे विचार आणि कल्पना लोकांसमोर मांडाल. घरात नवीन वस्तू खरेदी कराल.

कर्क (Cancer) : कर्क राशीच्या व्यक्तींनी शुक्राच्या या भ्रमणकाळात सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. जे विवाहित आहेत, त्यांना नातेसंबंधात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या आईच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याने तुम्हाला तणाव जाणवेल. त्यामुळे आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तिच्या गोष्टींना प्राधान्य द्या. प्रत्येक परिस्थितीत शांत राहा. जे अविवाहित प्रेमाच्या शोधात आहेत, त्यांनी नव्या ठिकाणी सहलीचं आयोजन करावं.

हे वाचा - ग्रहांच्या अशुभ परिणामांपासून बचावाचा सोपा उपाय; आठवड्यातील फक्त एक दिवस 'या' पदार्थाचं सेवन टाळा

सिंह (Leo) : शुक्राच्या या भ्रमणकाळात सिंह राशीच्या व्यक्तींचं सामाजिक जीवन समृद्ध होईल. तुमचं वैयक्तिक आणि व्यावसायिक नेटवर्क मजबूत करण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी दीर्घ काळापासून प्रयत्न करत असाल तर त्यात आता यश मिळेल. सहलींच्या माध्यमातून सकारात्मक अनुभव मिळतील. बऱ्याच कालावधीनंतर तुम्ही कुटुंबीयांसोबत सहलीला जाल. एखाद्या चांगल्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी मोलाचा ठरेल.

कन्या (Virgo) : शुक्राच्या या भ्रमणकाळात कन्या राशीच्या व्यक्ती सर्व जबाबदाऱ्या नियोजनबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पाडतील. तुम्हाला हवी ती वस्तू विकत घेण्याची ही योग्य वेळ आहे. कारण तुमच्याकडे खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे असतील. तुम्ही कोणतीही गोष्ट करायचं नियोजन केल्यास कुटुंबीयांचा त्याला पाठिंबा असेल. तुमचं प्रियकरासोबतचं नातं दृढ होईल. जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करेल.

तूळ (Libra) : सकारात्मक दृष्टिकोन आणि विनम्र भाषेमुळे घरगुती वातावरण आनंददायी असेल. ज्या व्यक्ती त्यांचे महत्त्वाचे प्रश्न इतरांना विचारण्यास उत्सुक आहेत, त्यांनी त्याबाबत कार्यवाही केली पाहिजे. तथापि, तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे भावनिक संबंध मजबूत असल्याची खात्री करा. हा कालावधी संशोधन आणि गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे.

वृश्चिक (Scorpio) : वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या कालावधीत सर्व गोष्टींकडे लक्ष देणं आणि सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. कौटुंबिक समस्या तुमच्यावर परिणाम करू शकतात. तुम्ही तुमचे विचार अचूकपणे आणि कमी शब्दांत इतरांपर्यंत पोहोचवाल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. काही जणांना अहंकारामुळे वादविवादांचा सामना करावा लागू शकतो. या कालावधीत आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं फायदेशीर ठरेल.

धनू (Sagittarius) : प्रभावी वागण्यामुळे माणसं तुमच्याकडे आकर्षित होतील. जे अविवाहित आहेत, त्यांना जीवनसाथी शोधण्यासाठी हा कालावधी उत्तम आहे. भागीदारीत नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल. नोकरदार वर्गाला पगारवाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तथापि, तुमच्या जोडीदाराच्या अतिउत्साही वर्तनामुळे थोडा ताण जाणवू शकतो.

हे वाचा - असा बॉस नको गं बाई! `या` राशींच्या व्यक्ती असू शकतात सर्वांत वाईट बॉस

मकर (Capricorn) : शुक्राच्या मिथुनेतल्या भ्रमणकाळात क्षुल्लक गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. यामुळे कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात अशांतता निर्माण होऊ शकते. स्पष्ट आणि पारदर्शकपणे संवाद साधल्यास तुमचे त्रास कमी होतील. कामाच्या ठिकाणी स्पर्धक तुमच्या योजनांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे तुम्ही सतर्क राहावं. तुम्ही तुमच्या महिला सहकाऱ्यांशी अयोग्य पद्धतीने संवाद साधला, तर तुमची प्रतिष्ठा अडचणीत येऊ शकते.

कुंभ (Aquarius): कुटुंबाविषयीचं प्रेम आणि सुसंवादामुळे समाधान मिळेल. तुमच्या योजना कुटुंबातल्या सदस्यांसोबत शेअर करण्यासाठी आणि आर्थिक व्यवस्थापन सुधारण्याकरिता पालकांकडे सल्ला मागण्याची ही चांगली वेळ आहे. विवाहित व्यक्तींना मुलांमुळे आनंद मिळेल. मालमत्तेशी संबंधित कोणताही आर्थिक निर्णय शुभ फलदायी ठरेल.

मीन (Pisces) : जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल, तेव्हा 'या गोष्टींचा माझ्याशी काय संबंध आणि हे माझ्यासाठी योग्य ठिकाण आहे की नाही,' असे प्रश्न मनात येतील. परंतु, गोचर काळात नोकरी बदलण्याबाबत कोणताही अविचारी निर्णय घेणं टाळा. प्रेमजीवनात अडचणी निर्माण होतील. महत्त्वाच्या व्यक्तीला वचनं देणं टाळा. कारण ती तुमच्याकडून पूर्ण होऊ शकणार नाहीत. कपल्सनी भूतकाळाकडे दुर्लक्ष करून भविष्याकडे वाटचाल करावी.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle