मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

सूर्याचा संक्रमण काळ या राशींचे भाग्य उजळणार! धनवृद्धीचे आहेत योग

सूर्याचा संक्रमण काळ या राशींचे भाग्य उजळणार! धनवृद्धीचे आहेत योग

सूर्याच्या राशी परिवर्तनाचा कोणाला होणार लाभ

सूर्याच्या राशी परिवर्तनाचा कोणाला होणार लाभ

सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडतो. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला धनु संक्रांत म्हणतात. या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 08 डिसेंबर : ज्योतिषशास्त्रात राशी बदलाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात सूर्य देव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्याचा शुभ आणि अशुभ प्रभाव सर्व राशींवर पडतो. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला धनु संक्रांत म्हणतात. यावेळी 16 डिसेंबर 2022 रोजी धनुसंक्रांती आहे. धनुसंक्रांतीचा प्रभाव इतर राशींवरही पडणार आहे. धनु संक्रांतीचा मिथुन, कन्या आणि धनु राशीवर काय परिणाम होईल, याविषयी पंडित इंद्रमणी घनश्याल यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

कन्या -

धनु राशीत सूर्य देवाचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव टाकेल. कन्या राशीच्या चौथ्या गृहात सूर्याचे भ्रमण होईल. ज्योतिषांच्या मते, चौथे स्थान भौतिक सुख आणि मातेचे घर मानले जाते, त्यामुळे तुमच्या भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. तुमच्या राशीत नवीन प्लॉट आणि घर मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित असाल तर तुमच्यासाठी हा काळ शुभ आहे.

मिथुन -

मिथुन राशीच्या लोकांसाठी धनुसंक्रांतीचा प्रभाव अनुकूल राहील. मिथुन राशीतील सातव्या भावात सूर्याचे संक्रमण होईल, तो वैवाहिक आणि मांगलिक सुखाचा कारक मानला जातो. या स्थितीत तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल आणि जीवनात सुख-शांती नांदेल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात.

धनु

ज्योतिषांच्या मते सूर्य धनु राशीच्या तिसऱ्या स्थानात जात आहे. तिसरे घर धैर्य आणि पराक्रमाचे मानले जाते. सूर्याच्या भ्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास बळकट होईल. शत्रूवर विजय मिळवाल. तुम्हाला व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आणि शुभ असेल.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark